'कट्यार काळजात घुसली' चित्रपट प्रदर्शित होऊन दीड दोन महिने झाले असतील, फेसबुक आणि वर्तमानपत्रात खूप वाहवा मिळवली, मुख्य नाटक बद्दल काही विशेष माहिती नव्हती आणि हा चित्रपट पाहायचाय ह्यावर दुमत नसल्यानी मी चित्रपट समीक्षा वाचायचे टाळले, आणि आज तो दिवस आला...संगीत-चित्रपट पहायचा आनंद मिळाला, अगदी सुरुवाती पासून शेवट पर्यंत!
तुलनात्मक सांगायचं झालं तर संगीतनाट्या/संगीतनात्या वर आधारित असलेला 'बालगंधर्व' पेक्षा 'कट्यार' जास्त आवडला!सुरुवातीलाच 'कट्यार' आणि 'संगीत' ह्या दोन विभिन्न गोष्टींचा मिलाफ का ह्याचे स्पष्टीकरण असलेला प्रसंग आहे, तिथेच अर्धी बाजी मारली आहे कथानकानी.
सचिनची दाढी सोडली तर अख्या चित्रपटात नावं ठेवायला फारच कमी जागा आहेत.गायचा अभिनय करणे हा एक मोठा अवघड प्रकार आणि तिघांनी ( शंकर महादेवन जरी गात असला तरी चित्रपाटात गायचा अभिनयच करायला लागला असेल ) सहज-सुंदरपणे हाताळलाय. टेक्नीकलीही अप्रतिम! भारतीय संगीताचा इतिहास समजावून सांगायला सुरुवातीला पेन्सिल ने काढलेली चित्रे, नंतर रंगीत चित्रे, कट्याराचे 3डी रेंडरिंग, कथानकातील एक महातवाचा भाग... रात्रीचे चित्रीकरण... काजवे असले अवघड प्रकार अतिशय सफाईदारपणे हाताळले आहेत.
माझ्या बाबतीत रहमानचे चित्रपट पहाताना 'शहारे येणे' हा प्रकार ठरलेला असतो, 'कट्यार'च्या बाबतीतही तोच अनुभव आला, विशेषतः सुरुवातीला शंकर-सचिन मग सचिन-सुबोध जुगलबंदी आणि एक सीन तर असा आहे ज्यात सुबोध भावे विना वाद्य गाणं गातो (वाटलं तर ऑडीशन म्हणा असा काहीसा सीन) केवळ अप्रतिम!
अमृता खानवीलकरनेही चांगला अभिनय केलेला आहे, विशेषतः मध्यंतरानंतर सर्वच जणांना अभिनयाची समान संधी मिळाली आहे. बाकी जितके कौतुक करावे 'कट्यार'चे तितके कमीच. 'सूर निरागस', 'दिल की तपिश' ही सर्व गाणी गेले दोन महिने जवळपास रोज ऐकली आहेत, त्यामुळे तीच गाणी मोठ्या पडद्यावर अभिनया सकट बघायची संधी दुबईत असूनही मिळाली आज, मराठी सिनेमा नवी शिखरं गाठत आहे ह्याचे समाधान मिळतं हा चित्रपट पाहून! 'कट्यार'च्या टीम चे हार्दिक अभिनंदन आणि दुबईत हा चित्रपट ज्यांमुळे प्रदर्शित झाला त्यांचे आभार.
दुबईत स्पेशल शो असल्यानी सचिन पिळगावकरनी खुद्द येऊन आम्हा रसिक प्रेक्षकांशी संवाद साधला, सुबोध भावेचा पहिला वहिला दिग्दर्शन केलेला चित्रपट आहे, हे सांगावं लागतं ह्या शब्दात स्तुतीसुमनेही उधळली.
#सशुश्रीके
प्रतिक्रिया
21 Dec 2015 - 6:20 pm | शान्तिप्रिय
उत्तम परिक्षण.
हा चित्रपट म्हणजे भारतालाच नव्हे तर अखिल विश्वाला मिळालेली २०१५ सालातिल एक सुन्दर भेट आहे.
27 Dec 2015 - 1:10 pm | विश्वव्यापी
सहमत
21 Dec 2015 - 6:35 pm | आदिजोशी
हा सिनेमा माझ्या माहितीनुसार Gallop Events नी दुबईत दाखवायचा घाट घातला होता. ह्या कंपनीच्या संचालिका आणि त्यांचे यजमान दोघे गिरगावकर आणि माझे मित्र आहेत.
21 Dec 2015 - 6:36 pm | आदिजोशी
हा सिनेमा माझ्या माहितीनुसार Gallop Events नी दुबईत दाखवायचा घाट घातला होता. ह्या कंपनीच्या संचालिका आणि त्यांचे यजमान दोघे गिरगावकर आणि माझे मित्र आहेत.
21 Dec 2015 - 7:24 pm | पर्ण
@ आदिजोशी पर्नल मराठे या इथल्या त्याच बाई आहेत Gallop Events च्या MD मानसी खरे आहेत... आमची खास मैत्रीण..
22 Dec 2015 - 8:28 am | खेडूत
असो.
कांही कारणाने एखाद्याने सदस्यनाम घेतलेले असते. आपण असे नाव असे उघड करू नये! त्यासाठी व्यनि नामक सुंदर सुविधा आहे.
22 Dec 2015 - 6:44 pm | आदिजोशी
अहो मला माहिती आहे. त्यांची आयडी/नाव लिहायची इच्छा असेल नसेल म्हणून मुद्दाम लिहिलं नव्हतं. छ्या...!!!
22 Dec 2015 - 7:22 pm | अजया
आमची चुचु!बाकी कोणाला वळखत नाही ;)
22 Dec 2015 - 2:33 am | देव मासा
म्हणजे Gallop Events ने संगीतमय कट्यारीने दुबईकरांचे कान टोचले, इथे मुंबईत राहुन आम्हाला या चित्रपटाची तिकिटे उपलब्ध झाली नाहीत ,जवळपास सगळ्याच थेटरात शो हाऊसफुल होते , Gallop Eventsने प्यासे कुवे के पास आ नही सकते , तो कुवे को प्यासे के पास लेजाने का स्तुत्य उपक्रम किया है .
दाढीच काय म्हणत होता ते ..जमली नाही की झेपली नाही ...आहो या पुर्वी तुम्ही त्यांच्या बालकालाकरातील भुमिका पाहिल्या असतील ,
पिळगावकर हरहुन्नरी माणुस ,
22 Dec 2015 - 2:33 am | देव मासा
म्हणजे Gallop Events ने संगीतमय कट्यारीने दुबईकरांचे कान टोचले, इथे मुंबईत राहुन आम्हाला या चित्रपटाची तिकिटे उपलब्ध झाली नाहीत ,जवळपास सगळ्याच थेटरात शो हाऊसफुल होते , Gallop Eventsने प्यासे कुवे के पास आ नही सकते , तो कुवे को प्यासे के पास लेजाने का स्तुत्य उपक्रम किया है .
दाढीच काय म्हणत होता ते ..जमली नाही की झेपली नाही ...आहो या पुर्वी तुम्ही त्यांच्या बालकालाकरातील भुमिका पाहिल्या असतील ,
पिळगावकर हरहुन्नरी माणुस ,
22 Dec 2015 - 10:29 pm | पर्नल नेने मराठे
सगळ्याना धन्यवाद.
माहेर व सासर दोन्ही नावाने ओळखणारे बरेच आहेत इथे.
देवमासा व इतर प्रतिसाद दिलेले सभासद आमचे मित्र व हितचिन्तक असल्याने आमचे नाव घेउन जरा जास्तच कौतुक झालय, कोणत्याही इतर सौस्था/मंडळाशी बरोबरी करण्याचा ह्या कौतुकामागे ह्या मित्र व हितचिन्तकान्चा व खुद्द आमचाही उद्देश नाही. गैरसमज दुर झाला असे समजते.
चुचु
22 Dec 2015 - 10:52 pm | PHULPAKHAROO
पण मी म्हणते कीमंडळआाचा विषयच कशाला इकडे ? उदात्तमनाने गॅलोप चे कैतुक करा. त्यांचा उपक्रम स्तुत्य आआहे. नसती धुणी ईकडे कशाला ना?
23 Dec 2015 - 12:03 pm | रागीट माऊ
हो बरोबर खारू ... मंडळानी काम केलं हि असेल ... पण आत्ता कशाला त्याचं परत कौतुक ... आत्ता इथे कौतुक फक्त गॅलोप च व्हायला हवं ...इच्छा नसल्यास चुचू च कौतुक करू नका :p ... आम्ही आहोत तिचं कौतुक करायला ;) ...
22 Dec 2015 - 10:54 pm | पर्ण
ग्यालोप व मानसीचे कौतुक सोडून मंडळ कुठे आणलेत मध्येच??