तुला काय ठाऊक सजणी, तुझ्यावर कोण कोण मरतंय ...
तुला काय ठाऊक सजणी
तुझ्यावर कोण कोण मरतंय
आख्खं गाव तुझ्यासाठी
रात्रंदिवस झुरतंय
माळावरचा दगडू पैलवान
भल्या-भल्यांना भरवतो हीव
तुझ्यासाठी त्याचा सजणी
टांगणीला गं लागलाय जीव
सुताराचा चकणा म्हादू
तुझ्यावर लईच मरतो
तुला बघत पटाशीचं काम
कानशीनं की करतो
डोईवर घेऊन शेण-बुट्टी
ठुमकत गं तू निघते
दीवाण्यांची टोळी तुझ्या
मागं मागं फिरते
प्रत्येकाला तुझाच राणी
गुलाम बनून रहायचंय
तुला मात्र माधुरी बनायला
म्हमईला जायचंय .