(दर वर्षी आम्ही 2 लाखाहून जास्त माणसांचे बळी भारतात घेतो. )
शूर वीर डास आम्ही
बांधुनि कफन डोक्यावरी
तुटून पडतो शत्रुंवरती
त्यांचे रक्त पिऊनी
देतो विजयी आरोळी.
डेंगू मलेरियाच्या दिव्यास्त्रांनी
करतो हल्ला माणसांवरती
पाठवतो त्यांना यमसदनी.
घाबरून आमच्या फौजेला
मच्छरदानीत लपणार्या
भित्र्या भागुबाई माणसांशी
काहो करता तुलना आमुची.
करू नका अपमान आमुचा
पावसाळा आता दूर नाही.
रक्ताची आहे भूक आम्हा
रक्त पिऊनी माणसांचे
देऊ विजयी आरोळी.
प्रतिक्रिया
31 May 2022 - 10:00 am | पाषाणभेद
छान आहे.
31 May 2022 - 10:35 am | जेम्स वांड
विषय किंवा बांधणी शून्य मार्क
शब्दसंपदा अन त्याहून झळकणारा दिल्लीकर टोन मात्र लैच खास,
(स्वतः ग्रामीण बाज असलेला हेल अभ्यासक) वांडो