प्रकटन

सुशांत सिंह राजपूत भाग २

मदनबाण's picture
मदनबाण in जनातलं, मनातलं
20 Apr 2021 - 6:40 pm

काही निवडक चॅनल्स आणि मंडळींनी सुशांतसाठी चालु केलेला प्रामाणिक लढा अजुनही सुरु ठेवलेला आहे. हल्लीच आर ठाकरे आणि कंगना यांच्याकडून सुशांत ने आत्महत्या केली असल्याचे सांगितले गेल्याचे माझ्या पाहण्यात आले आहे.
असो... वरुण कपूर चा चॅनल मी बराच काळ फॉलो करत आहे. [ सुशांत गेल्या पासुन ] आणि त्याचा या विषयात असलेला प्रामाणिकपणा मला विशेष भावला आहे.
सुशांत विषयी अनेक व्हिडियो त्याने या केलेले आहेत, परंतु हल्लीच त्याचे २ व्हिडियो मला विशेष वाटले आहेत.
१] इम्तियाज खत्री [ याचा उल्लेख मागच्या धाग्यात झालेला आहे.]
२] नार्कोटिक्स विभागाचे सिंघम अर्थातच समीर वानखेडे

समाजप्रकटन

संदर्भांच्या शोधात

जे.पी.मॉर्गन's picture
जे.पी.मॉर्गन in जनातलं, मनातलं
20 Apr 2021 - 11:06 am

आज बरोब्बर दोन महिने झाले पांढर्‍यावर काळं करून. किंबहुना व्यक्त होण्यासाठी विषयच सापडत नव्हता. आजकालची परिस्थिती बघता "किंबहुना" या एका शब्दावर एक लेखमाला लिहिली जाऊ शकेल हा भाग अलाहिदा!

क्रीडाप्रकटनविचारलेखविरंगुळा

हरिद्वारचा कुंभमेळा आणि भाजप

उपयोजक's picture
उपयोजक in जनातलं, मनातलं
17 Apr 2021 - 8:57 pm

हरिद्वारमधे कुंभमेळ्यात झालेले पहिले शाही स्नान हे सध्या सुशिक्षितांच्या रागाचे निमित्य ठरत आहे. करोनाची दुसरी लाट दररोज शेकडो बळी घेत आहे,दिवसेंदिवस बळींचा आकडा वाढत आहे. असे असूनही कुंभमेळ्याला परवानगी मिळालीच कशी? अगदी वर्तमानपत्रात पूर्ण पान जाहिरात दिली गेली होती दोन दिवसांपूर्वी. येत्या २७ एप्रिलला चौथे शाही स्नान आहे आणि ते करण्याविषयी विचार सुरू आहे. ३० एप्रिलला मेळ्याची अधिकृत समाप्ती आहे. बहुतेक आखाडे शाही स्नानावर ठाम आहेत.

संस्कृतीधर्मप्रकटनविचार

आवाज बंद सोसायटी - भाग ४

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जनातलं, मनातलं
16 Apr 2021 - 1:02 pm

यामागील भाग:
http://www.misalpav.com/node/48651 :: आवाज बंद सोसायटी - भाग १
http://www.misalpav.com/node/48652 :: आवाज बंद सोसायटी - भाग २
http://www.misalpav.com/node/48658 :: आवाज बंद सोसायटी - भाग ३

परिणाम

समाजजीवनमानप्रकटनविचारलेखसल्लामाहितीआरोग्य

लस आणि शेरलॉक

Bhakti's picture
Bhakti in जनातलं, मनातलं
14 Apr 2021 - 4:40 pm

“अहो उद्या आपला लसीचा दुसरा डोस आहे” रजनीकाकू उत्साह –भीती मिश्रित आवाजात अशोककाकांना आठवण करून देत होत्या.
“हो हो,अग पण बातम्या येत आहेत की लस संपली आहे.काय माहित आपल्या सेन्टरवर काय परिस्थिती असेल.”अशोक काकांना लस मिळेल की नाही धास्ती वाटत होती.
“मीना वहिनींना फोन करतेय तर त्यांचा फोनच लागतं नाही,मागच्यावेळी आम्ही दोघींचा लसीसाठी नंबर येऊ पर्यंत चांगला टाइमपास झाला होता,यावेळीही त्या असत्या तर तसाच वेळ गेला असता.” रजनीकाकूंना उद्या वेळ कसा जाईल याचा प्रश्न पडला होता.
उद्या लस मिळेल का याचा विचार करत दोघेही रात्री लवकर निजले.

मुक्तकविडंबनप्रकटन

आवाज बंद सोसायटी - भाग ३

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जनातलं, मनातलं
12 Apr 2021 - 2:28 pm
समाजजीवनमानआरोग्यराहणीऔषधोपचारप्रकटनलेखसल्लामाहितीआरोग्य

कोविड- अनुभव वगैरे..

पाटिल's picture
पाटिल in जनातलं, मनातलं
12 Apr 2021 - 11:19 am

माझा ताजा ताजा अनुभव शेअर करतो.

मी एका कोविड पेशंटच्या कॉन्टॅक्टमध्ये आलो होतो‌ त्यामुळे मला महानगरपालिकेकडून कंपलसरी टेस्ट करून घेण्याचा सल्ला मिळाला. काहीही लक्षणं नव्हती तरीही सल्ल्यानुसार प्रीकॉशन म्हणून, २५ मार्चला मी महानगरपालिकेच्या कोविड टेस्टींग सेंटरला जाऊन पोचलो. तिथली गर्दी, आणि कशाचा कशाला संबंध नसलेली व्यवस्था बघून मला अजिबात धक्का बसला नाही. कारण 'अपेक्षा हे सगळ्या दु:खांचं मूळ कारण आहे', हे तत्व डोक्यात फार पूर्वीच फिट्ट बसवून घेतलेलं आहे.

मांडणीप्रकटनअनुभवआरोग्य

आवाज बंद सोसायटी

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जनातलं, मनातलं
10 Apr 2021 - 7:42 pm

लेख वाचण्याआधी खाली दिलेली विडीओक्ल्पीप क्रृपया प्रथम 'ऐका'.

ध्वनी प्रदूषण

तर मंडळी, असले आवाज ऐकून माझी देखील अवस्था तुमच्या सारखीच झालेली असते.

समाजजीवनमानतंत्रप्रकटनविचारलेखआरोग्य

सध्या मी काय पाहतोय ? भाग ४

मदनबाण's picture
मदनबाण in जनातलं, मनातलं
10 Apr 2021 - 7:35 pm

स्कॅम १९९२ ही वेब सिरीज मला विशेष आवडण्याची अनेक कारणे असतील, पण यातील प्रतीक गांधी यांचा अप्रतिम अभिनय आणि याच्या जोडीलाच असलेले अफलातुन संवाद हे २ घटक मला फारच भावले.
ही वेब सिरीज हिट झाली हे काही वेगळ्याने सांगायची गरज नाही,पण मला अचानक ही सिरीज आठवण्याचे कारण म्हणजे याच घटनेवर अभिषेक बच्चन यांचा [ अर्थातच अभिनय नसलेला ] द बिग बुल चित्रपट आला... :))) कोण पाहणार हा चित्रपट ? बरं... आधीच या घटनेवर हिट वेब सिरीज येउन गेली असताना त्याच विषयावर चित्रपट तो देखील अभिषेक बच्चनला घेउन काढण्याचा "मटका" कोणी आणि का खेळला असावा ? असा मला प्रश्न पडलाय. :)))

मौजमजाप्रकटनमाध्यमवेधविरंगुळा

आज काय घडले... फाल्गुन व. १ बुक्कराय यांचे निधन !

Ashutosh badave's picture
Ashutosh badave in जनातलं, मनातलं
10 Apr 2021 - 10:24 am

आज काय घडले...

फाल्गुन व. १

बुक्कराय यांचे निधन !

शके १२९९ च्या फाल्गुन व. १ रोजी सर्व हिंदुस्थानांत मुसलमानांचा धुमाकूळ सुरू असतांना दक्षिणेस तुंगभद्रेच्या तीरावर माधवाचार्यांच्या साह्याने विजयनगरच्या वैभवशाली हिंदुसाम्राज्याची स्थापना करणाऱ्या हरिहर आणि बुक्क या बंधूंपैकी बुक्कराय यांचे निधन झाले.

इतिहासप्रकटन