लेख वाचण्याआधी खाली दिलेली विडीओक्ल्पीप क्रृपया प्रथम 'ऐका'.
तर मंडळी, असले आवाज ऐकून माझी देखील अवस्था तुमच्या सारखीच झालेली असते.
माझ्यासोबत घडलेला एक प्रसंग सांगतो. एकदा आमच्या कॉलनीत, माझ्या घरासमोरच एका जणाने एक घर भाड्याने घेवून तेथे गायन क्लास सुरू केला. गायन, वादन, संगीत आदी कलांबद्दल मला आकस नाही. उलटपक्षी, मी अनेक गाणी, पोवाडे, लावण्या इत्यादी लिहील्या आहेत. पण समोरच्या त्या गायन आणि वाद्यांच्या वादनाचा जाणवण्याइतपत त्रास होऊ लागला होता. शेजारी एखादा जण गायन करत असेल त्यात अन दररोज आठ, नऊ तास अनेक विद्यार्थ्यांनी गायन, वादन करणे यात फार फरक आहे. एकतर रहिवासी भागात गायन क्लास, तो सुद्धा ध्वनीरोधक - साऊंडप्रूफ नसलेल्या घरात चालू असल्याने माझ्या उद्वेगात भर पडत गेली. तेथील वाद्य, गायन आदींचा केवळ मलाच त्रास होत होता असे नाही, तर आजूबाजूच्या रहिवाशांनादेखील तो त्रास होत होता पण कुणीही त्याबद्दल संकोचाने आक्षेप घेतला नाही. त्यांचा हा एकप्रकारे निष्काळजीपणाच होता. क्लासच्या संचालक आणि घरमालक यांना या आवाजाच्या प्रदूषणाचे, त्याच्या परिणामांचे काहीच सोयर सुतक नव्हते. त्यांच्या मते त्यांनी चालविलेला हा क्लास त्यांच्या उच्च अभिरूचीचे लक्षण होते.
मला ध्वनी प्रदूषणाचे नियम आणि कायदे माहित होते, त्यात आपले मिपाकर सदस्य श्री. वकील साहेब यांनी भर घातली. सरतेशेवटी, श्री. वकील साहेब यांच्या सल्याने मी पोलीसांत तक्रार दाखल करण्याची कल्पना गायन क्लासच्या संचालक, त्यांच्या घरमालकाला दिली. अर्थातच पोलीसस्टेशनमध्ये जाण्याची गरज पडली नाही आणि गायन क्लासच्या संचालकाशी, त्याच्या घरमालकाशी बोलल्यानंतर त्यांनी ती जागा रिकामी केली आणि कॉलनीत शांतता प्रस्थापित झाली.
आजकाल आपल्याकडे जल आणि वायू प्रदूषणाबद्दल बरीचशी जागरूकता झालेली आहे. कमीतकमी त्याची चर्चा तरी होते. पण आपल्या समाजात ध्वनी प्रदूषणाबद्दल जागरूकता कमी आहे. मोबाईलवरील स्पिकरवर गाण्याचा आवाज वाढवला आणि दुसर्याने त्यावर आक्षेप घेतला तर आवाज वाढवणार्याला त्याचे काहीच वाटत नाही. आवाजाबद्दल बेफिकीरीची प्रवृत्ती समाजात वाढत आहे. आवाज हे माध्यम हवेसारखे दिसत नसल्याने त्याची घनता, तीव्रता लगेचच जाणवत नाही. आपले कानही आपण बंद करू शकत नाही. काही आवाज आपली इच्छा नसली तरी बळजबरी आपल्याला ऐकावेच लागतात. त्या आवाजाने आपल्या कानांवर, शरीरावर व मनावर परिणाम केल्यानंतरच त्या आवाजाबद्दल चांगले किंवा वाईट मत आपण बनवतो. कित्येक व्यक्तींना आवाजाचेही (ध्वनी) प्रदूषण असते हेच माहीत नसते. हे दुर्दैवी आहे.
सततच्या आवाजाच्या गोंधळाने आपली चिडचिड होते. आजूबाजूचे आवाज नकोसे होतात. शांततेची आवश्यकता भासते. अवाजवी, गरजेचा नसलेला आवाज हा देखील प्रदूषणात मोडतो आणि मानवी स्वास्थ्यावर त्याचे परिणाम होतात.
ध्वनी प्रदूषणाबद्दल इतरांचे प्रबोधन करणे आपले कर्तव्य आहे. लहान मुलांमध्ये याबाबत जागरूकता लहान वयातच आणली असता ते मोठे झाल्यानंतर सभ्य नागरीक बनू शकतील. ध्वनी प्रदूषणाबद्दल आपल्याला जागरूक करणे या हेतूने हे सादरीकरण बनवले आहे. हे लिखाण मुक्त स्रोत परवान्यासारखे लिहीले आहे असे समजून आपण त्यात भर टाकाल व हे लिखाण जास्तीत जास्त व्यक्ती, संस्थांपर्यंत पोहोचण्याकामी आपण सहकार्य कराल ही मला आशा आहे. येत्या काळात आवाजाचा भस्मासूर आपल्या कानांना गिळंकृत करण्याच्या आधी आपण सजग राहून त्याचा नायनाट करूया.
जय हिंद, जय महाराष्ट्र!
(क्रमश:)
प्रतिक्रिया
10 Apr 2021 - 7:57 pm | मुक्त विहारि
आमच्या सोसायटीत, गोंदवलेकर महाराजांच्या भक्तांनी, ध्वनि प्रदूषणाचा उच्छाद मांडला आहे...
सध्या लाॅकडाऊन आहे, तरीही भक्तजण झांजा कुटणे सोडत नाहीत...
एरवी तर नुसता धुडगूस असतो...
10 Apr 2021 - 8:09 pm | श्रीगुरुजी
जरा आश्चर्य वाटले. श्री गोंदवलेकर महाराजांच्या भक्तमंडळांचा भर शांतपणे नामस्मरण करण्यावर आहे. टाळा कुटणे ह जरा आश्चर्यकारक आहे.
10 Apr 2021 - 8:10 pm | मुक्त विहारि
https://misalpav.com/node/31723
10 Apr 2021 - 8:20 pm | मुक्त विहारि
पौर्णिमा आणि दर शनिवारी नुसता धुडगूस असतो...
घरात बसणे कठीण होते ....
10 Apr 2021 - 8:23 pm | चौकटराजा
एक मित्रत्वाचा सल्ला- या भक्त मंडळींना , तबला कुटणाऱ्या संगीत क्लासेस मालकांना थेट टीका करत अप्रोच होऊ नका ! हल्ली कुणाच्या ही भावना पटापट दुखतात मग माफी मागा असा घोष सुरू होतो . सबब फारच त्रास होत असेल तर ध्वनी विषयक कायद्याचा सल्ला घ्या ! त्याचा संदर्भ देऊन सोसायटीकडे या कायद्याचे पालन आपण करू असा ठराव टाका . कोणत्याही प्रचलित कायद्याविरुद्ध सोसायटीत ९९ टक्के मतदानानेही ठराव पास करता येत नाही .याची जाणीव व्यवस्थापन कमिटीला लेखी द्या कारण बर्याच वेळा अशा गोष्टीमागे कमिटीतील लोकांचाच वरदहस्त असतो .
10 Apr 2021 - 8:33 pm | मुक्त विहारि
केस ठोकली तर बदनामी गोंदवलेकर महाराजांचीच होणार...
10 Apr 2021 - 9:15 pm | चौकटराजा
भक्त मंडळी मुळे ईश्वर कधी बदनाम होत नाही . पन्थ होतो. ईश्वर फार मोठा आहे तो आजवर कोणत्याही परम भक्ताला देखील घावलेला नाही !! अणुरणिया थोकडा व आकाशाहून ही मोठा .माणसाच्या कवेत सापडत नाही वा चिमटीत पकडता येत नाही !!
10 Apr 2021 - 9:23 pm | मुक्त विहारि
रामनगर येथील, रामाच्या मंदिरात, ध्वनि प्रदूषण करणारी मंडळी जात होती... बदनामी झाली आणि आता मंदिर शांत झाले...
फायदा समाजाला झाला.
10 Apr 2021 - 8:45 pm | मुक्त विहारि
सल्ल्या बद्दल मनापासून धन्यवाद ...
11 Apr 2021 - 1:46 am | साहना
+१
माफी वगैरे ठीक आहे काही लोकांना अक्षरशः मारहाण झालेली सुद्धा पाहिली आहे.
10 Apr 2021 - 8:44 pm | चौकस२१२
घरोघरी मातिच्या चुली ... तुम्हाला महाराजांच्या शिष्यांचा त्रास इथे रविवारी "प्रभूचे गुणगान " मंडळी समोर असतात.. हालेलूया .. करीत ...वैताग येतो आंणि बुधवारी प्रभू प्रेमी मंडळींचे "कम्युनिटी किचन " तिथे फुकट किराणा माल वाटतात , त्याच दिवशी सकाळी आठवड्याचा कचरा घायला नागपालिकेची गाडी येते आणि बाहेर आपले कचऱ्याचे डबे ठेवलेले असतात तिथेच हे फुकटे आपली गाड्या लावतात ... त्यामुळे ट्रक , कचऱ्याचा डबा उचलू शकत नाही .. तक्रार केली तर कम्युनिटी किचन वाले म्हणतातात ती आमची जबाबदारी नाही ...शेवटी फुकट्यांना जाऊन सगळ्यांसमोर सांगितले .. पुढल्या बुधवारी कचरा डबा नेचर स्ट्रीप वर ना ठेवता रस्त्यावर ठेवावा काय .. कि फ्रांस मध्ये जसे वैतागले शेतकरी शेणाचा ट्रक संसदे पुढे नेऊन उपडा करतात तसे "प्रभूच्या द्वारी " करावे ?
10 Apr 2021 - 8:51 pm | मुक्त विहारि
सगळी प्रार्थना स्थळे बंद करावीत
धर्म घरात आणि कायद्याचे राज्य बाहेर
गणपती उत्सव, गुढीपाडव्याची मिरवणूक (ही घातक प्रथा, डोंबिवलीकरांनी सुरू केली) नवरात्र, काही विचारू नका
ह्या पृथ्वीतलावर जगण्यासाठी सगळ्यात नालायक प्राणी म्हणजे, माणूस... असेच वाटायला लागले आहे...
10 Apr 2021 - 9:11 pm | चौकटराजा
ते अल्प भू धारक वगरे सोडा . इटली त काहीशी गुन्हेगारी आहे पण एरवी देश शान्त. येता का म्हातारपणी फ्लोरेन्स ला रहायला ...? तिथे भारतीय पर्यटक खूप येतात ! चर्च वर भोंगे , मग आपले प्रति लाउड स्पीकर असे तिथे काहीही नाही . मात्र खायचे लै वांधे असतात , तिथे लोक कायम पीत असतात ! नो भावना दुखविणे नो प्रतिहल्ले! भारतीयाना मस्त जेवण देण्याचा जाईन्ट काढू !!!
10 Apr 2021 - 9:18 pm | मुक्त विहारि
ऑस्ट्रेलिया बाबतीत पण असेच ऐकून आहे ...
भारतीयाना मस्त जेवण देण्याचा जाईन्ट काढू !!
कल्पना उत्तम आहे ....
प्रभाकर पेठकरांना किचन देऊ, तुम्ही गल्ल्यावर, मी वेटर म्हणून काम करीन... टिप घेतली नाही तर, गिर्हाइकांना पण आनंद...
शांततेची किंमत, असे म्हणून टिप स्वीकारायची नाही ...
11 Apr 2021 - 12:11 am | Rajesh188
पुढे सुखाचे दिवस येणार असे वाटते आहे.
11 Apr 2021 - 6:55 am | मुक्त विहारि
आपण आलात?
तुमचीच वाट बघत होतो...
त्या आपल्या प्रश्र्नांची उत्तरे कधी देणार आहात?
तुम्ही थापा मारता हे वाचलेले आहेच, आता पळपुटे पणा तरी करू नका ...
11 Apr 2021 - 7:06 am | मुक्त विहारि
1. साधू हत्याकांडाचे काय झाले? ही मारहाण भाजपने केली का?
2. सामान्य माणसाला घरी बोलावून मारहाण केली. ही मारहाण भाजपने केली का?
ह्या प्रश्र्नांची उत्तरे तुमच्या कडून बाकी आहेत....
11 Apr 2021 - 6:31 am | कंजूस
यासाठी अंतिम निर्णय रेजिस्ट्रार- उपनिबंधक ( सहकारी संस्था) यांचेकडे असतो. वकील किंवा पोलीसांकडे जाऊ नये. फक्त गुन्हा फौजदारी स्वरुपाचा असल्यास पोलीस ताबडतोप हस्तक्षेप करतात.
१) चेअरमन/सेक्रीटरी अमुक अमुक सोसायटी या नावे दोन ओळींची तक्रार आणि कार्यवाही न झाल्यास मी उपनिबंधक यांचेकडे जाणार आहे एवढेच लिहावे.
(तक्रार - नियमाप्रमाणे अमुक सभासद हा त्याची सदनिका फक्त रहिवासाकरिता वापरत नसून ***अशासाठी करत आहे.)
२) नंतर रजिस्ट्रारला पत्र लिहून कमिटीला दिलेल्या पत्राची कॉपी जोडावी.
-------
तुम्ही रेजिस्ट्रारच्या कार्यालयात गेलात आणि त्यांच्याशी बोललो एवढ्यावरही पळापळ सुरू होते. कारण यांचा दणका भारी असतो.
11 Apr 2021 - 7:15 am | तिमा
http://www.misalpav.com/node/40842
11 Apr 2021 - 7:24 am | उपयोजक
कधी बंद होतील का? की अल्पसंख्यक म्हणून ध्वनीप्रदूषणातही त्यांना सूट दिली आहे?
11 Apr 2021 - 8:47 am | प्रकाश घाटपांडे
https://www.mpcb.gov.in/noise-pollution याठिकाणी ध्वनी प्रदूषण व इतर प्रदूषणांची माहिती आहे. मंडळाला अधिकार ही आहेत. ध्वनिप्रदुषणामुळे रक्तदाब, कर्ण बधिरता,डोकेदुखी इत्यांदिंना आमंत्रण तर मिळतेच पण मानसिक स्वास्थ्य बिघडून चिडचिड वाढते हे वैज्ञानिक दृष्ट्या सिद्ध झाले आहे. ठाण्याचे डॉ महेश बेडेकर ध्वनीप्रदूषण विरोधी प्रबोधनाचे काम करतात. हा त्यांचा विडिओ पहा
https://youtu.be/2VcsBdvhPMs
11 Apr 2021 - 8:53 am | मुक्त विहारि
माहिती बद्दल धन्यवाद
11 Apr 2021 - 10:42 am | सुरसंगम
प्र.घा. या बेडेकरांनी आव्हाढच्या दहीहंडी उत्सवाचं सगळं रेकॉर्ड करून कोर्टात याचिका दाखल केली होती.
काही शष्प फरक पडला नाही. कार्यक्रम चालूच आहे दरवर्षी.
11 Apr 2021 - 11:22 am | मुक्त विहारि
काय बोलणार?
11 Apr 2021 - 11:34 am | उपयोजक
घरी बोलवून चाबकाने मारतो. त्यामुळे न्यायाधीश घाबरले असतील का?
11 Apr 2021 - 3:21 pm | प्रकाश घाटपांडे
याचिकेमुळे ध्वनीप्रदूषण कायद्याच्या अंमलबजावणीस गती मिळाली. एकदम फरक पडणार नाही. प्रथम प्रबोधन केले पाहिजे. ध्वनीप्रदूषणाला मिळालेले ग्लॅमर कमी होत गेले कि लोकांना शांततेचे महत्व लक्षात येउ लागेल. ही मोठी लांब प्रक्रिया आहे.
11 Apr 2021 - 9:02 am | प्रकाश घाटपांडे
फायर ऑडिट असते तसे आता रहिवासी भागात नॉईज ऑडिट व्हायला पाहिजे. ध्वनीप्रदूषण हे केवळ प्रदूषण नसते. ती एक चक्क नशा असते. अंगात माझिया भिनलाय ढोलिया या काव्य पंक्तीत ही नशा व्यक्त केली आहे. समूह ढोलवादनात सामूहिक नशा मिळते. म्हणूनच एवढी मंडळे फोफावली आहेत. वैद्यकीय विषयातील तज्ञ या बद्दल अधिक सांगू शकतील
11 Apr 2021 - 9:20 am | मदनबाण
ध्वनी प्रदूषण हे अत्यंत तापदायक आहे. लॉक डाउन मध्ये मला चांगली शांतता अनुभवता आली हाच काय तो त्याचा मला झालेला विशेष फायदा. मुख्यत्वे या लॉक डाउनमुळे माझ्या घराच्या समोर एक चायनीज टेंम्पो लागतो तो काही दिवस बंद झालाय याचा फार म्हणजे फार आनंद झाला आहे. या चायनीज वाल्याचा मला लयं त्रास होतो. आधी त्याची लाल रंगाची लोखंडी गाडी होती, मध्येच कधी तरी पालिकेने येउन ती मोडली तर त्या पठ्ठ्याने अर्धा तासात एक मिनी टेंम्पो आणला आणि त्यात परत चायनीज बनवुन विकणे सुरु केले. रात्री बारा-साडेबारा पर्यंत त्याच्या कढईचा आवाज येतो,त्याचे चायनीज खाणार्याला लोहाची कमतरता भासणार नाही याची काळजी घेउन तो ती कढई ताकद लावुन त्यात चायनीज परतत असतो. मग कधी बेवडे,टल्ली झालेले लोक येउन त्याच्या गाडीवर राडा करतात्,आय-मायच्या शिव्या आणि फालतुची बोंबाबोंब होते. एकदातर दोन गटात हाणामारी होउन वास्तव टाईप डोक्यात दगड घालण्याचा प्रकार होता होता राहीला.
याचा सगळा परिणाम माझ्या झोपेवर होतो कारण हा जवळपास रोजचाच ताप असतो. :(
जाता जाता :- हल्लीच मी कुठल्या तरी शास्त्रज्ञाचा व्हिडियो पाहिला होता, तो वन्य प्राण्यांचे / किटकांचे आवाज रेकॉर्ड करतो. दर वर्षी हा त्याचा उपक्रम असतो आणि त्यांचा निष्कर्ष असे सांगतो की हे प्राण्यांचे / किटकांचे आवाज कमी होत चालले आहेत कारण त्यांची संख्या वेगाने कमी होत चालली आहे.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Chupke Se... :- Saathiya
11 Apr 2021 - 9:39 am | मुक्त विहारि
प्रचंड सहमत आहे....
11 Apr 2021 - 11:36 am | उपयोजक
व्रुम व्रुम व्रुम असा शिमगा करत जाणार्यांना वाहतूक पोलिस दंड का करत नाहीत हे कोणी सांगेल का?