फ्री बर्ड्स
च्र्यांग च्र्यांग च्र्यांग च्र्यांग
च्र्यांग च्र्यांग च्र्यांग च्र्यांग
आयला किती वेळ नुसते उडत रहाणार?
हो ना चला रे खाली एखाद्या फ़ांदीवर बसू.
फ़ांदी? कसली फ़ांदी?
अरे हा म्हातारा अजूनही जुन्या काळात उडतो आहे.
त्याच्या काळात म्हणे खाली हिरवीगार जंगले होती
त्यांत झाडे होती. झाडांना फ़ांद्या होत्या?
च्र्यांग च्र्यांग... आई झाडे म्हणजे काय? फ़ांदी म्हणजे काय?
अरे त्या टॊवरवर तो लोखंडी क्रेन पक्षी दिसतोय नां?
त्याचे हवेत पसरलेले हात म्हणजे फ़ांदी.
च्र्यांग च्र्यांग चल आई. मला आवडते फ़ांदीवर बसायला.