चूझिंग द इझी ऑप्शन

वेल्लाभट's picture
वेल्लाभट in जनातलं, मनातलं
18 Sep 2013 - 11:41 am

"हे बघ, तू रोज व्यायाम कर, व्यवस्थित, चांगलं खा; तुला फिट होण्यापासून काहीही अडवू शकत नाही." मी मित्राला म्हटलं. "रोज?????" प्रचंड संकट समोर आल्यागत भाव चेह-यावर आणून त्याने विचारलं. "बरं एक दिवसा आड कर रे, पण कन्सिस्टंटली कर." मी काठिण्य पातळी कमी केली, आणि लगेच त्याच्या चेह-यावर हसू फुललं. इतक्यात बाजूला उभा असलेला एक मित्र वडापाव चा घास घेत म्हणाला, "त्यापेक्षा डाएट कर ना! त्या सचिन ने केलं ना आमच्या सोसायटीतल्या... नो व्यायाम नो नत्थिंग. फक्त गोड बिड नाही खायचं, बाहेरचं नाही खायचं असं थोडंसं पाळायचं आणि ते देतात ती आयुर्वेदिक औषधं घ्यायची. एक्क्का महिन्यात रिझल्ट आला बोल!" तो मित्र अजूनच खूश झाला. "हा..... हे बेस्ट आहे यार. सोपं आहे. असंच करतो; नंबर व्हॉट्सॅप कर त्या डाएटिशियन चा."

माझ्या तोंडावर आलेलं की बाबा त्यापेक्षा असा विचार कर की जाड असणं हे वाईट नाहीच आहे मुळी. विषयच संपला. बी हॅप्पी द वे यू आर. सगळ्यात सोप्पं!; पण मी बोललो नाही.

ही सहज प्रवृत्ती आहे मानवाची. ईझी ऑप्शन शोधण्याची. याच विचारातून आजवर बरीच 'डेव्हलपमेंट' झालीय मानवाच्या आयुष्यात, जगात; पण याच विचारामुळे आता मानवाची हानी होतेय असं माझं मत आहे. नेहमीच सोपा पर्याय निवडल्याने आपण अनेक थक्क करणा-या परिणामांपासून वंचित राहतो. हे केवळ व्यायामाला लागू नसून प्रत्येक गोष्टीला लागू आहे. मग पैसे घ्या, चीजवस्तू घ्या, आनंद घ्या.

आजकाल प्रत्येक गोष्टीत 'इएमआय' चा पर्याय आहे. घर, गाडी, फ्रीज, वॉशिंग मशीन, मोबाईल, कॅमेरा, घड्याळ, पासून ते थेट किराणा पर्यंत सगळं आपण इएमआय वर घेऊ शकतो. इझी ऑप्शन. परवा एक सहकर्मचारी मला म्हणाला, "कॅमेरा घ्यायचाय रे. चांगला कुठला?" मी म्हटलं, "१०-१२ पर्यंत चांगला पॉईंट अँड शूट येतो आरामात. तुझं बजेट किती आहे?" "बजेट बिजेट असं काही नाही रे..(हे म्हणताना चेह-यावर सुपीरिऑरिटी चे भाव ओसंडून वहात होते) तसंही मी इएमआय ने घेणारंय" हे उत्तर होतं. मी खरं तर दोन अडीच लाखांचा एखादा कॅमेरा सुचवणार होतो, पण नाही सुचवला. सोपा पर्याय निवडण्याचं हे आणखी एक रूप. आपल्या अवाक्याबाहेरच्या आणि बहुतांश वेळा गरजेच्या नसलेल्या गोष्टी साध्य करण्याचा, मिळवण्याचा हव्यास.

काय करणार. समजावणार तरी कसं? कारण इझीली होत असतील तर गोष्टी डिफिकल्ट का करा उगाच? असा प्रश्न येतो. पण खरं तर त्या गोष्टी होत नाहीत; त्या होतायत असं फक्त वाटतं. आणि पुढे तुम्हाला कळतच नाही की तुम्ही तुमचा वेळ / पैसा / उत्साह / आत्मविश्वास कधी गमवून बसता ते. And the cycle continues.
पण एक मात्र माझं स्पष्ट मत आहे. नेहमीच सोपा पर्याय निवडण्याची ही सवय पुढे माणसांच्या अधोगतीचं मुख्य कारण ठरेल.

खरं तर हा विषय कसा मांडावा हे मला सुचत नव्हतं, पण मांडायचा तर होताच. 'कसा मांडावा, हा विचार करू की सरळ जे म्हणायचं ते लिहू', असं म्हणून मी सोपा पर्याय निवडला. जे म्हणायचं होतं ते लिहिलं. आता हा सोपा पर्याय योग्य होता किंवा नाही हे तुम्ही सूज्ञांनी सांगावं.

समाजजीवनमानराहणीविचार

प्रतिक्रिया

स्पंदना's picture

18 Sep 2013 - 12:39 pm | स्पंदना

:) ह इझी वे आउट! ;)

अग्निकोल्हा's picture

18 Sep 2013 - 1:27 pm | अग्निकोल्हा

तरिही संदेश अतिशय उचित दिलेला आहे. मलाही नेहमीच लोकांच्या "सगळ काही सोपं करणं" चे भयानक कुतुहल वाटत आलयं. सिक्स इझंट अ‍ॅ जॉक अ‍ॅट ऑल.

lakhu risbud's picture

18 Sep 2013 - 5:08 pm | lakhu risbud

छान लिहिले आहे. ह्या इझी वे चूज करण्याच्या सवयी मुळेच साहित्यातील रुची कमी होते.
कोण ते एवढं जाड पुस्तक वाचत बसणार ? त्यातील अर्थ समजावून त्याबद्दल विचार करणार ? असा दृष्टीकोन असतो.
सकस अभिरुची ,चांगला श्रोता,सुजाण वाचक होण्यासाठी पण कष्ट घ्यावे लागतात.

अरे कामामध्येच फार डोके लावावे लागते त्यामुळे आत्ता या बाकींच्या गोष्टींसाठी वेळ नाही,काहीतरी इझी सांग

अशी वृत्ती होते.

विटेकर's picture

18 Sep 2013 - 5:36 pm | विटेकर

लेख लिहित बसायचं नाही .. प्रतिसादात सांगायचे .. फारतर इ एम आय सरखे. २-४ हप्त्यात ..

मुक्त विहारि's picture

18 Sep 2013 - 8:58 pm | मुक्त विहारि

काय बोलणार?