यस आय'म द चेंज नामक एका राष्ट्रीय फिल्म समारोहासाठी माझा "Dreams Matter" हा लघुपट निवडला गेला होता आणि आज तो मुंबई मध्ये दाखविला गेला. विषय दिल्यावर १०१ तासात फिल्म बनवायची आणि तीही पाच मिनिटा पेक्षा कमी वेळाची अशी बंधने होती. मला विषय दिला होता : People with Special Needs. इथे फिल्म दिली आहे. हा माझा पहिलाच प्रयत्न आहे. संकल्पना, संपादन, चित्रीकरण मी एकट्यानेच केले. आता short films बनविण्यात मला जाम इंटरेस्ट यायला लागलाय.
प्रतिक्रिया
8 Oct 2013 - 6:04 pm | विटेकर
आवडेश !!
लगे रहो .पुढील वाटचालीस शुभेच्छा !
8 Oct 2013 - 6:31 pm | बहुगुणी
तुमच्या इथल्या इतर लिखाणाप्रमाणेच हा विषयही सामाजिक बांधिलकीचा आहे हे नोंद घेण्यासारखंच आहे.
8 Oct 2013 - 6:34 pm | चाणक्य
हार्दिक अभिनंदन. आजच घरी गेल्यावर बघतो.
8 Oct 2013 - 6:40 pm | अग्निकोल्हा
हा विषय मानवी जिद्दिसोबत आपण कसा रिलेट करुन ही फिल्म बनवली हे जरा विस्कटुन सांगता काय ?
9 Oct 2013 - 1:36 am | अग्निकोल्हा
अगदी मलासुध्दा हातपाय धडधाकटपणा असुन मी कधी चँपिअन बनलेलो नाही.
पण People with Special Needs...! ही टॅग लाइन केवळ विनरवर कशीकाय फोकुस (केंद्रित) होउ शकते हाच खरा प्रश्न आहे... एकटा हंसराज म्हणजे People with Special Needs...! न्हवे. इट इस वेरी वास्ट एंड जिनेरिक टर्म येट फिल्म फोक्सेस ओनली ऑन हंसराज लोन. सिरीअस्ली गॉट कंफ्योसन बिटवीन द ट्रु सब्जेक्ट ऑफ शॉफि. वाज इट "Dreams Matter" ऑर "People with Special Needs...!"
असो, ४च दिवसात आपण खडक काम केलय हे नक्कि.
9 Oct 2013 - 3:31 am | स्पंदना
"शिखरावर नजर असणाराच वरपर्यंत पोहोचु शकतो" आणि people with special needs स्वतःच एक प्रश्नचिन्ह म्हणुन उभे ठाकलेले असतात. त्या अवघड प्रवासात जर तुम्ही अशी शिखरे पाहुन काही स्फुर्ती घेत असाल तर अगदी घ्यावा लागणारा प्रत्येक अवघड श्वासही सुलभ होउन जातो.
फक्त विनर दाखवणे हे बाकिच्या कष्टांना विसरुन काहीतरी आपणही घडवु, आपल्यालाही असे बनता येइल हा विचार मनात सुरु करण्याचा एक मार्ग आहे.
तरीही....हंसराज ओपन कॅटॅगीरीतुन एमपीएस पास होउन तहसीलदार बनतो यात त्याच्या special need चा कोणताही हातभार नसावा. तेथे त्याची स्वतःची बुद्धीमत्ताच कामी आली.
किती हसरा उमदा चेहरा! सुधीरजी तुम्ही शेवटी दाखवेपर्यंत त्याच स्पेशल असण लक्षातही नाही आलं.
जियो हंसराज..जियो सुधीरजी!
8 Oct 2013 - 7:39 pm | रेवती
छान विषय आहे. फिल्म आवडली.
8 Oct 2013 - 8:06 pm | सुधीर कांदळकर
विषयाची निवड, मांडणी, सर्वच छान. १०१ तासाची मर्यादा लक्षात घेतली तर उत्कृष्ट हा शब्द थिटा पडेल.
अभिनंदन.
8 Oct 2013 - 8:08 pm | स्वाती दिनेश
हंसराजची जिद्द खरोखरीच वाखाणण्यासारखी आहे.तुमचे चित्रिकरण व सादरीकरणही आवडले.
स्वाती
8 Oct 2013 - 10:30 pm | मुक्त विहारि
नि:शब्द....
कशाला द्याद द्यावी तेच समजत नाही....
केवळ एक-दोन तासात योग्य तो विचार करून ठाम निर्णय घेण्याच्या तुमच्या क्षमतेबद्दल की
ह्या हंसराज पाटील ह्यांच्या जिद्दी बद्दल...
शेवटी सामान्य माणुस जे करतो तेच केले...वाचनखूण साठवली....
8 Oct 2013 - 10:51 pm | आतिवास
आवडली.
अभिनंदन.
तुमच्या इतर फिल्म्सही पाहायला आवडतील.
8 Oct 2013 - 10:54 pm | यशोधरा
असेच म्हणते.
9 Oct 2013 - 12:41 am | एस
त्यांच्या कुटुंबियांचे आणि तुमचेही अभिनंदन. हॅट्स ऑफ्...
9 Oct 2013 - 1:00 am | आशु जोग
लाइक
9 Oct 2013 - 2:21 am | अमित खोजे
सुंदर - स्फूर्तीदायक आहे
9 Oct 2013 - 9:40 am | ज्ञानोबाचे पैजार
विषयाची निवड जरी तुमच्या हातात नसली तरी मिळालेल्या विषयाची काहि तासात इतकी प्रभावी मांडणी व ते करताना एक वेगळा विचार देणयाचा तुमचा प्रयत्न आवडला.
हा व्हीडिओ पाहिल्या नंतर मी धडधाकट असुनही एक "People with Special Needs" आहे याची प्रकर्षाने जाणीव झाली.
श्री हंसराज यांच्या जिद्दीचे त्यांच्या पराक्रमाचे मनापासुन कौतुक व तुम्हाला मनापासुन शुभेच्छा.
9 Oct 2013 - 9:56 am | प्रकाश घाटपांडे
सुंदर, हंसराज पाटील यांची जिद्द आमच्या पर्यंत पोहोचवल्याबद्दल धन्यवाद. मुतालिक साहेब तुमचे हा छंद जोपासा. समाजोपयोगी आहे.
9 Oct 2013 - 1:43 pm | सौंदाळा
+१
9 Oct 2013 - 3:30 pm | नंदन
असेच म्हणतो.
9 Oct 2013 - 3:50 pm | प्यारे१
+११११
9 Oct 2013 - 8:28 pm | चैदजा
+१११११
13 Oct 2013 - 10:43 pm | अत्रुप्त आत्मा
++++++++१११११११११
9 Oct 2013 - 2:05 pm | मदनबाण
घरला गेल्यावर नक्की बघेन.
9 Oct 2013 - 3:30 pm | सुहास झेले
अभिनंदन... कौतुक करू तितके थोडेच आहे :) :)
9 Oct 2013 - 4:06 pm | सार्थबोध
मोठे काम…...
9 Oct 2013 - 5:44 pm | सुखी
सुरेख
9 Oct 2013 - 9:27 pm | मनिष
फारच छान. हंसराज पाटील यांचा प्रवास आणि जिद्द छान टिपली आहे तुम्ही! खूपच स्फुर्तीदायक आहे ही फिल्म!
9 Oct 2013 - 9:36 pm | पैसा
असा विषय घेऊन, शिवाय इतक्या थोड्या वेळात आणि थोडक्यात सगळं आलं पाहिजे या नियमांना धरून इतकी चांगली फिल्म बनवलीत! तुम्हाला जास्त वेळ मिळाला तर तुम्ही आणखी खूप काही करू शकाल!
10 Oct 2013 - 10:30 am | सुमीत भातखंडे
घरी जाऊन बघीन फिल्म
12 Oct 2013 - 3:02 pm | सुधीर मुतालीक
समस्त मिपाकरांचे महाप्रचंड आभार. आपणा सर्वांच्या प्रतिसादांनी हुरूप आलाय पुन्हा असा काही प्रयत्न करण्यासाठी !!
12 Oct 2013 - 8:59 pm | विनोद१८
सुधीर मुतालीक तुमचा पहिलाच प्रयत्न म्हणून अभिनन्दन व एक चान्गला विषय सादर केल्याबद्दल धन्यवाद !
आता सुरवात केलीच आहे तर येउद्या असेच उत्तम चित्रपट, शुभेच्छा.
विनोद१८