भारतीय लोकशाही, ६५ च युद्ध, कारगिल आणि शत्रूचा पण पॉइण्ट ऑफ व्ह्यू
पिलू मोदी हे नाव आज कुणाच्या फारस स्मरणात नाही. पण पेशाने स्थापत्य विशारद असणार्या या अष्टपैलु माणसाने भारतीय राजकारणावर पण काही काळ आपला ठसा उमटवला होता. पिलू मोदी हे त्यांचे समकालीन राजकारणी व तत्कालीन पाकिस्तानी बडे प्रस्थ झुल्फीकार अली भुट्टो यांचे जवळचे मित्र होते. त्यानी कॉलेज मध्ये एक्त्रच प्रवेश घेतला होता इतकेच नव्हे तर ते रूम मेट्स म्हणून पण एकत्र राहीले होते. अशा या त्यांच्या घनिष्ट मित्राला जनरल ज़ीया यानी लष्करी उठाव करून तुरुंगात टाकले व स्वताहा त्या देशाचे सर्वेसर्वा बनले. लष्करी हुकुमशाहाना कायम च जनाधार असणार्या नेत्याचे भय असते.