उत्क्रांती मोबाईलची- मोटोरोला.

नानबा's picture
नानबा in जनातलं, मनातलं
15 Feb 2013 - 10:16 pm

मी नुकत्याच टाकलेल्या उत्क्रांती-मोबाईलची या विषयाची माहिती घेत असताना एक लक्षात आलं की हा विषय फार खोलात जाऊन वाचण्यासारखा आणि रंजक आहे. म्हणून म्हटलं थोडं अजून लिहावं.

आधीच्या धाग्यात generalised मोबाईलची उत्क्रांती लिहीली होती. या धाग्यापासून एकेका ब्रँडचा उदय कसा झाला, कुठून सुरूवात करून आज कुठल्या पदावर तो ब्रँड आहे यावर लिहावं म्हणतोय. वाचक सांभाळून घेतीलच. धाग्याव्यतिरिक्त जास्तीची माहिती कुणाकडे असल्यास वाचायला नक्की आवडेल. :)

तर मोबाईलचा पहिला हँडसेट ज्यांनी काढला त्या मोटोरोला पासूनच सुरूवात करूया.

मोटोरोला या कंपनीची स्थापना झाली गॅल्व्हिन मॅन्युफॅक्चरिंग कॉर्पोरेशन या नावाने शिकागो मध्ये १९२८ साली. पॉल गॅल्व्हिन हा या कंपनीचा संस्थापक, आणि त्याचं पहिलं उत्पादन होतं, बॅटरी एलिमिनेटर. त्या वेळेला कार मध्ये रेडिओ ही संकल्पनासुद्धा अस्तित्त्वात आली नव्हती. पण कंपनीचा इन्वेस्टर बिल लियर आणि त्याचा मित्र हार्वर्ड गेट्सने त्याचा एक प्रोटोटाईप बनवून पॉल गॅल्व्हिनला दाखवला. सुरूवातीला त्याने तो नाकारला, पण नंतर त्याने असे २०० रेडिओ बनवून घेतले आणि कंपनीची उलाढाल सुरु झाली. १९३० मध्ये गॅल्व्हिनने पहिला कमर्शियल कार रेडिओ, "मोटोरोला रेडिओ" बाजारात आणला. मोटर आणि त्या काळी सगळ्या ऑडिओ उपकरणांना शेवटी लावला जाणारा शब्द- ओला यांना एकत्र करून गॅल्व्हिनने कार रेडिओला "मोटोरोला" हे नाव दिलं होतं. हा रेडिओ इतका प्रसिद्ध झाला की नंतर १९३१ मध्ये त्याने आपल्या कंपनीचं नाव बदलून "मोटोरोला" हेच ठेवलं.

मोटोरोलाची जवळपास सगळी उपकरणं ही रेडिओ ट्रान्समिशनशी निगडित होती. १९४० मध्ये कंपनीने एफ.एम. रेडिओचे जनक डॅन नोबेल यांच्यासमवेत त्यांचा रिसर्च अँड डेव्हलपमेंट विभाग सुरू केला. दुसर्‍या महायुद्धाच्या वेळेस कंपनीने AM-SCR 536 हा रेडिओ बनवला, ज्याने अमेरिकन सैन्याला संदेशवहनात मोलाचा हातभार लावला.
त्याच वेळेस १९४७ मोटोरोला पब्लिक लिमिटेड झाली, आणि त्यांनी "मोटोरोला इन्कॉर्पोरेशन लि." हे आजचं नाव धारण केलं. हळूहळू प्रगती करत असतानाच १९५५ मध्ये मोटोरोलाने जगातला पहिला commercial high power germanium based transistor बनवला, आणि सोबतच त्यांचा सध्याचा batwing लोगोसुद्धा जगासमोर आणला. तत्पूर्वी १९५२ मध्ये रेडिओ आणि दूरचित्रवाणी संच बनवण्यासाठी त्यांनी अमेरिकेबाहेर आपलं पहिलं कार्यालय कॅनडाची राजधानी टोरॅंटो इथं उघडलं, आणि इथून त्यांच्या आंतरराष्ट्रीय वाटचालीची सुरूवात झाली. १९६० मध्ये त्यांनी जगातला पहिला १९ इंची cordless portable television बनवला, आणि १९६३ मध्ये जगातला पहिला संपूर्ण आयताकृती television बाजारात आणला. पुढे काही आर्थिक कारणास्तव १९७४ मध्ये त्यांनी आपलं television unit जपानस्थित इलेक्ट्रॉनिक्स कंपनी panasonic ला विकून टाकलं.

१९५८ मध्ये मोटोरोलाने अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था NASA साठी रेडिओ उपकरणं बनवण्यास सुरूवात केली. १९६९ मध्ये नील आर्मस्ट्रॉंगने चंद्रावरून उच्चारलेले, "One small step for a man, one giant leap for mankind" हे ऐतिहासिक शब्द जगाने ऐकले, ते मोटोरोलाच्या रिसिव्हर मधूनच.
१९७३ मध्ये मोटोरोला ने जगाला पहिल्यांदाच hand held portable phone दाखवला, तेव्हा कदाचित कोणी कल्पनासुद्धा केली नसेल की हा शोध पुढे मानवी आयुष्यात किती आमुलाग्र बदल घडवणार आहे. याच क्षेत्रात संशोधन करताना सप्टेंबर १९८३ मध्ये त्यांचा DynaTAC 8000X हा जगातला पहिला commercial cellular phone बाजारात आला, आणि नंतर १९९८ मध्ये मोटोरोलाच्या एकूण revenue पैकी दोन तृतीयांश हिस्सा हा फ़क्त mobiles चा होता, इतकी मोबाईल मार्केटवर त्यांची सत्ता प्रस्थापित झाली होती. अर्थात मोटोरोला केवळ मोबाईल उपकरणंच बनवत नसे, तर semiconductors, कॉंप्युटर्समध्ये वापरले जाणारे integrated circuits, शिवाय satellite systems, digital cable boxes आणि modems सुद्धा बनवली जात.

आजकाल 6 SIGMA नामक जी quality improvemet process जगभर जवळपास प्रत्येक कंपनीत राबवली जाते, तिची शिल्पकारसुद्धा मोटोरोलाच. १९८६ मध्ये आपल्या कंपनीसाठी त्यांनी ती सर्वप्रथम राबवली. ती इतकी प्रसिद्ध झाली, की १९९० मध्ये तिचं Global standard मध्ये परिवर्तन करण्यात आलं. त्याच वर्षी, म्हणजे १९९० मध्येच, मोटोरोलाची आणखी दोन उत्पादनं, High Definition standard आणि Bravo numeric pager बाजारात आली, ज्यापैकी Bravo ने त्या काळी आणि HD ने आता नुसता धुमाकूळ घातलाय.
नंतर मात्र या वैभवाला उतरती कळा लागायला सुरूवात झाली. १९९८ मध्ये नोकियाने मोबाईल फ़ोन विक्रीच्या आकड्यांमध्ये मोटोरोलाला मागे टाकले. पुढे जून २००० मध्ये मोटोरोला ने CISCO च्या मदतीने जगातलं पहिलं commercial GPRS cellular network इंग्लंडमध्ये उभारलं. पहिला GPRS फ़ोन बनवण्याचा मानसुद्धा मोटोरोलाचाच.

२०११ मध्ये मोटोरोलाचं दोन भागात विभाजन झालं. सध्या एक कंपनी, मोटोरोला सोल्युशन्स या नावाने police technologies, radio आणि इतर कमर्शियल उत्पादनं बनवते, तर दुसरी, मोटोरोला मोबीलिटी या नावाने मोबाईल उत्पादन क्षेत्रात आहे.

१५ ऑगस्ट, २०११ ला गुगलने मोटोरोला मोबिलिटी २.५ बिलियन डॉलर्सना विकत घ्यायचा निर्णय घेतला, आणि अखेरीस २२ मे, २०१२ रोजी मोटोरोला मोबिलिटी गुगल इन्कॉर्पोरेशनमध्ये विलिन करण्यात आली.

सध्या मोटो ची धुरा अध्यक्षपदी डॅन मोलनी, आणि सीईओ आणि चेयरमन म्हणून संजय झा सांभाळत आहेत. २००७ ते २००९ या काळात प्रचंड आर्थिक नुकसान आणि जवळपास १० ते ११,००० कामगार आणि executives गमावल्यानंतर २००९ च्या दुस-या तिमाहीत त्यांना २६ मिलियन डॉलर्सचा निव्वळ नफ़ा झाला. यात थोडेफ़ार चढउतार सोडता सध्या कंपनीची एकंदर अवस्था ही T-20 बघून अस्वस्थ झालेल्या डॉन ब्रॅडमनसारखी झाली आहे.

a
मोटोरोला चे संस्थापक - पॉल गॅल्व्हिन

s
मोटोरोला कार रेडिओ- १९३५

s
मोटोरोला रेडिओ

j
दुसर्‍या महायुद्धाच्या वेळेस अमेरिकन सैन्यासाठी बनवलेला AM-SCR 536 रेडिओ

d
१९६० च्या सुमारास वर्तमानपत्रात येणारी मोटोरोला टी.व्ही. ची जाहिरात

h
आणि हा मोटोरोला टी.व्ही.- १९६५ मधला

d
मोटोरोलाच्या शिरपेचात मानाचा तुरा- चंद्रावर स्वारी.

as
cv
लोगोतली स्थित्यंतरं

as
जगातला पहिला मोबाईल फोन- मोटोरोला ब्रिक (१९७३)

d
पहिला कमर्शियल मोबाईल - DynaTAC 8000X (१९८३)

d
९० च्या दशकात मोटोरोलाचं आणखी एक धुमाकूळ घातलेलं उत्पादन - ब्राव्हो पेजर

sd
f
विभक्त झाल्यानंतर मोटोरोला चे लोगो- वरचा मोटोरोला सोल्युशन्सचा तर खालचा मोटोरोला मोबिलिटीचा

g
हा गुगलने मोटोरोला मोबिलिटी विकत घेतल्यानंतरचा त्यांचा संयुक्त लोगो

hj
विद्यमान अध्यक्ष - डॅन मॉलनी

ceo
विद्यमान सीईओ - संजय झा

धोरणइतिहासप्रकटन

प्रतिक्रिया

अभ्या..'s picture

15 Feb 2013 - 10:33 pm | अभ्या..

मस्त रे प्रथम.
छान आणि एकदम डिट्टेल मध्ये दिलायस माहिती.
आमच्या विनंतीला मान दिल्याबद्दल धन्यवाद.
(माझ्याकडं बी व्हता मोटोरॉकर)

>> कॅनडाची राजधानी टोरॅंटो
कॅनडाची राजधानी ओटोवा आहे.

नानबा's picture

16 Feb 2013 - 10:16 am | नानबा

आयला हो, ओटावा कॅनडाची राजधानी आहे... गलती शे मिश्टेक हो गयी... ;) :P

गूगलने मोटोरोला मुख्यत्वेकरून त्यांच्याजवळ असणार्‍या भरमसाठ पेटंट (आय.पी.) साठी विकत घेतली आणि काही काळाने त्यांचं हार्डवेअर डिपार्टमेंट विकून टाकणार आहेत अशा अर्थाची बातमी मी मागे एकदा ऐकलेली. त्यात कितपत तथ्य आहे?

हो, हे मीसुद्धा ऐकलं होतं की गुगल मोटोरोला मोबिलिटीचं हार्डवेअर डिपार्टमेंट तैवानची मोबाईल कंपनी हुवाई ला विकणार आहे. पण या दुव्यात वेगळीच माहिती आहे.

पैसा's picture

15 Feb 2013 - 10:57 pm | पैसा

२००३-०४ मधे मी माझा पहिला मोबाईल घेतला तो मोटोरोला ची ३५० ई. त्याला एफ एम सुद्धा नव्हता. सगळे लोक नोकिया घेतात तर आपण वेगळा घेऊया केवळ एवढ्याचसाठी तो हॅण्डसेट घेतलेला!

सांगायची गोष्ट म्हणजे एवढ्या वर्षात फक्त एकदा बॅटरी बदलली. अजून तो हॅण्डसेट चालू केला तर मस्त चालतो! कुठे एक ओरखडा सुद्धा उठलेला नाही. एकदम मस्त फिनिश! थ्री चिअर्स टु मोटोरोला!!!

c350e

श्रीरंग_जोशी's picture

15 Feb 2013 - 11:01 pm | श्रीरंग_जोशी

या विषय हाती घेतल्याबद्दल अनेक धन्यवाद.

एक सुचना - "मोटोरोला इन्कॉर्पोरेशन लि." हे नाव अमेरिकन पद्धतीप्रमाणे शेवटच्या 'लि.' शिवाय लिहिले जाते. कृपया पुन्हा तपासून घ्यावे.

अत्रुप्त आत्मा's picture

15 Feb 2013 - 11:56 pm | अत्रुप्त आत्मा

हा भाग पण आवडला :-)

एक मोटोरोला मी देखिल वापरला आहे, मस्त मेटॅलिक बॉडी होती, पण वाहत्या पाण्याच्या नियमानुसार सॅमसंग स्लायडर साठी तो बदलला.

लाल टोपी's picture

16 Feb 2013 - 12:26 am | लाल टोपी

लेख आवडला माहीतीपूर्ण आणि मनोरंजक इतिहास.

गौरव जमदाडे's picture

16 Feb 2013 - 9:53 am | गौरव जमदाडे

माहितीबद्दल धन्यवाद.

नानबा's picture

16 Feb 2013 - 10:08 am | नानबा

as
मीसुद्धा हा मोटोरोला-L9 वापरलाय. अजूनही उत्तम चालतोय, फक्त बॅटरी मिळत नाहीये म्हणून बंद आहे. :(

सुहास..'s picture

16 Feb 2013 - 11:25 am | सुहास..

एल -९ मी पण वापरला , पण त्यापेक्षा, त्या ही आधी . मला वाटत तो " नोकिया " चा फेकुन मारायचा मोबाईल जास्त प्रसिध्द होता.

ही माहिती तुम्ही संकलीत केली असली तरी मांडणीतला प्रवाहीपणा आवडला.

नोकीयाने झोपेत राहून आपल्याच हाताने बिझिनेसची माती कशी केली हे तुमच्या लेखातून वाचायला उत्सुक आहे.

नक्कीच. माझ्याही डोक्यात पुढच्या भागात नोकियाबद्दल लिहावं असंच मनात आहे.. :)

५० फक्त's picture

19 Feb 2013 - 6:57 pm | ५० फक्त

नोकियाने बदलते हुवें प्रवाहोंको नो किया और फस गया, अब खिडकीके सहारे जिंदा रहनेकी कोशिश हो रही है,और क्या ?

दादा कोंडके's picture

16 Feb 2013 - 5:46 pm | दादा कोंडके

पण "फ्रीस्केल" बद्द्ल विसरलाव काय?

क्रान्ति's picture

16 Feb 2013 - 6:56 pm | क्रान्ति

चांगली माहिती दिली आहे.