उत्क्रांती- मोबाईलची.

नानबा's picture
नानबा in जनातलं, मनातलं
13 Feb 2013 - 2:55 pm

आजकाल आपल्या आयुष्यात अंतर्बाह्य बदल होतायत. इतके, की बहुतेक येत्या काही वर्षांमध्ये प्राथमिक शालेय पुस्तकांमधलं "अन्न, वस्त्र आणि निवारा या मनुष्याच्या मुख्य गरजा आहेत" हे विधान "अन्न, वस्त्र, निवारा या डिफॉल्ट गरजांसोबत काँप्युटर, हायस्पीड इंटरनेट आणि स्मार्ट्फोन या मनुष्याच्या मुख्य गरजा आहेत." असं बदललेलं दिसेल. या स्मार्टफोन्सच्या जगात वावरताना परवाच एका इसमाच्या हातात एक अत्यंत जुना, काळ्या रंगाचा, अँटेना असलेला वॉकीटॉकी सदृश्य मोबाईल फोन दिसला, आणि सहज डोक्यात आलं, या प्राण्याची (मोबाईलची) जन्मकथा काय असेल बरं?
मग काय, सुरू झाला आमचा प्रवास आंतरजालावर या महाशयांची जन्मकुंडली शोधण्यासाठी. एक एक पान वाचता वाचता रसरशीत इतिहास उलगडत गेला, आणि एक जुनंच, पण तरीही नवीन विश्व दिसलं.

तशी पोर्टेबल फोन या संकल्पनेची सुरूवात १९४६ मध्ये अमेरिकेत झाली होती. बेल सिस्टीम्सच्या मोबाईल टेलिफोन सर्विसने मिसुरीमधल्या सेंट लुईस या शहरात कार टेलिफोन सेवा देण्यास १७ जुन, १९४६ रोजी सुरूवात केली. त्या पाठोपाठ इलिनॉईस बेल टेलिफोन कंपनीने हीच सेवा शिकागो शहरात २ ऑक्टोबर, १९४६ पासून सुरू केली. तत्कालीन मोबाईल फोन्स आताच्या फोन्सच्या तुलनेत अजस्त्र म्हणता येतील इतके मोठे, आणि वजनाला अंदाजे ८० पाऊंड (३६ किलो) होते. सुरूवातीला या फोन्सवर फक्त ३ चॅनल्सच्या माध्यमातून संवाद साधता येत असे.
car phone
हाच तो वजनी कार फोन

ही सेवा १९७०-७२ पर्यंत केवळ कार्ससाठीच मर्यादित होती. पण १९७३ मध्ये, मोटोरोला च्या पोर्टेबल कम्युनिकेशन प्रॉडक्टस चे चीफ जॉन एफ. मिशेल यांनी छोटेखानी मोबाईल डेव्हलप करण्यात मोलाची भुमिका बजावली. ३ एप्रिल, १९७३ रोजी जॉनच्या साथीदार मार्टिन कूपरने आपल्या प्रतिस्पर्धी कंपनी बेल लॅब्सच्या डॉ, जोएल एनगेल याला छोटेखानी मोबाईलवरून जगातला पहिला मोबाईल कॉल लावला. या कॉलबद्दल मार्टिन म्हणाला होता, "जेव्हा मी न्यूयॉर्कच्या रस्त्यावरून हातात फोन धरून बोलत चाललो होतो, तेव्हा रस्त्यावरील लोकांनी मला भर गर्दीतही वाट मोकळी करून दिली होती. त्या वेळी चालता चालता मी बरेच कॉल्स केले, ज्या पैकी एक मी रस्ता ओलांडताना न्यूयॉर्क रेडिओ च्या निवेदकाला केला होता, जी तो पर्यंत मी केलेली सर्वात धोकादायक गोष्ट होती."
हा जगातला पहिला मोबाईल फोन त्या काळी $३९९५ ला विकला गेला होता, आणि त्याचं नाव होतं, "द ब्रिक."
brick
मार्टिन कूपर आणि द ब्रिक फोन

त्या नंतर या क्षेत्रात अतिशय वेगाने बदल घडत गेले. १९७९ साली जपानमध्ये टोकियोच्या काही भागांसाठी सेवा देणारं NTT हे जगातलं पहिलं कमर्शियल सेल्युलर नेटवर्क उभं राहिलं. तरीही, नागरिकांसाठी पहिला फोन जवळपास १० वर्षांनी बाजारात आला. तो होता, मोटोरोला DynaTAC 8000X. ६ मार्च, १९८३ रोजी हा फोन बाजारात आला. हा फोन $२९९५ ला विकला गेला. गंमत म्हणजे, याचा टॉकटाईम होता फक्त ३० मिनीटं, आणि याची बॅटरी चार्ज करण्यासाठी वेळ लागत असे १० ते ११ तास.
dynatac
मोटोरोला DynaTAC 8000X

त्या पाठोपाठ मोटोरोलानेच आपला पॉकेट साईझ फोन १९८९ मध्ये बाजारात आणला. हा दिसायला DynaTAC 8000X सारखाच होता, पण आकाराला बराच लहान आणि $१९९५ या किंमतीचा होता.होता

स्मार्टफोन म्हणवता येईल असा पहिला फोन बाजारात आणला IBM ने १९९४ मध्ये. IBM Simon Personal Communicator या नावाचा हा फोन होता जवळपास $११०० ला.
ibm
IBM Simon Personal Communicator

पुढचं पाऊल टाकलं मोटोरोला ने, जेव्हा १९९६ मध्ये जगातला पहिला क्लॅमशेल फोन (ज्याला आता आपण फ्लिपफोन म्हणतो), तो starTAC बाजारात आणला, आणि मोबाईलविश्वात लहान आकाराच्या फोन्सची एक नवीन क्रांती उदयास आणली.
startac
मोटोरोला क्लॅमशेल फोन- starTAC

पुढे १९९७ मध्ये नोकियाने बाजारात आणखीनच दंगा केला, जेव्हा त्यांचा Nokia 9000i Communicator बाजारात आला. या फोनचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे पहिल्यांदाच फोनमध्ये QWERTY किबोर्ड वापरला गेला होता.
communicator
Nokia 9000i Communicator

या आधीपर्यंतच्या सगळ्या फोन्सचा अँटेना बाहेरच्या बाजूने होता, आणि दरवेळी फोन करते या घेतेवेळी हा अँटेना ओढून बाहेर काढावा लागत असे. पण १९९८ मध्ये नोकियानेच ८८१० बाजारात आणला ज्याला internal antenna होता. याच फोनचं दुसरं महत्त्वाचं वैशिष्ट्यं म्हणजे नोकियाचा सगळ्यात प्रसिद्ध स्नेक हा गेम या फोनपासून बाजारात आला. याही फोनने मोबाईलविश्वात नवीन पर्व सुरू करून दिलं.
int ant
नोकिया ८८१०

नंतर २००२ साली रिसर्च इन मोशन ने पहिला स्मार्टफोन ब्लॅकबेरी बाजारात आणला. तो पर्यंत बाजारात आलेल्या इतर सर्व स्मार्टफोन्सपेक्षा हा फोन पूर्णपणे वेगळा होता. एक तर याला समोरच QWERTY किबोर्ड होता, आणि दुसरं म्हणजे यांवर नेट वापरण्यासाठी स्वतंत्र असा browser होता.
bb
पहिला ब्लॅकबेरी स्मार्टफोन

२००२ मध्येच Sanyo SCP-5300 हा फोन आला, याची खासियत म्हणजे हा जगातला पहिला कॅमेरा फोन होता.
camera
Sanyo SCP-5300

T mobiles या कंपनीने sidekick हा फोन याच वर्षी आणला, आणि slider phone ही नवी संकल्पना प्रत्यक्षात आली.
slider
T mobiles चा sidekick

यानंतर सोनी एरिक्सन ने २००५ साली W800i या फोनपासून स्मार्ट्फोन्सची एक नवी श्रेणी बाजारात आणली. हे Walkman सिरिज मधले फोन्स म्हणजे उत्तम कॅमेरा, खणखणीत आवाजाचे स्पीकर्स, मेमरी कार्ड सपोर्ट, मिडिया प्लेयरसाठी विशेष बटणे अशा अनेकाविध सुविधा सोबत घेऊन आले होते.
walkman
सोनी एरिक्सनचा Walkman फोन- W800i

त्यानंतर २००७ हे वर्षं मोबाईलविश्वाला कलाटणी देणारं वर्षं ठरलं. कारण याच वर्षी स्टीव्ह जॉब्सच्या अ‍ॅपल ने iPhone 3GS बाजारात आणला, आणि फोन विश्व खर्‍या अर्थाने बदललं. iPhone 3GS च्या बरोबरीनेच HTC G1 हा फोन बाजारात आला, आणि सध्या धुमाकूळ घातलेल्या Android operating system चा जन्म झाला.
ip
स्मार्टफोन्समध्ये धुमाकुळीचा प्रारंभ- iPhone 3GS

android
HTC G1- पहिला अँड्रॉईड फोन

या नंतरची स्थित्यंतरं सगळे बघतच आहोत. फक्त बोलण्यासाठी म्हणून आलेल्या मोबाईलने हळूहळू इतर सर्व gadgets ना आपल्यात सामावून घेतलंय. अजून पुढे काय होईल देव जाणे. कुणास ठाऊक काय पुढे, नवा बदल माझ्यात घडे..

धोरणप्रकटन

प्रतिक्रिया

श्री गावसेना प्रमुख's picture

13 Feb 2013 - 3:02 pm | श्री गावसेना प्रमुख

छान माहीती दिली हो तुम्ही

ह भ प's picture

13 Feb 2013 - 3:11 pm | ह भ प

वाह!! वाह!!! वाह!!!!

(प्रत्येक 'वाह' नंतर उद्गारवाचक चिन्ह वाढत गेले आहे याची कृपया नोंद घ्यावी, यावरून आम्हास झालेला आनंद लक्षात यावा..)

NiluMP's picture

13 Feb 2013 - 3:19 pm | NiluMP

महितीपर्ण लेख.

परिकथेतील राजकुमार's picture

13 Feb 2013 - 3:23 pm | परिकथेतील राजकुमार

सुरेख माहिती.

धन्यवाद.

मालोजीराव's picture

13 Feb 2013 - 3:37 pm | मालोजीराव

अप्रतिम माहितीपूर्ण आढावा मोबाईल इवोलुशन चा

.

पैसा's picture

13 Feb 2013 - 3:41 pm | पैसा

मोबाईलच्या उत्क्रांतीची छान माहिती!

मालोजीरावांनी टाकलेला फोटु म्हंजे या धाग्याचं सगळं सार एका दृष्टीत... :)

मनराव's picture

13 Feb 2013 - 3:54 pm | मनराव

उत्तम महिती.....

अग्निकोल्हा's picture

13 Feb 2013 - 4:41 pm | अग्निकोल्हा

.

हरेश मोरे's picture

13 Feb 2013 - 4:43 pm | हरेश मोरे

मोलाचि माहिति दिलित आपण ......

कवितानागेश's picture

13 Feb 2013 - 5:27 pm | कवितानागेश

मस्तच. :)

धन्या's picture

13 Feb 2013 - 8:08 pm | धन्या

मोबाईल क्रांतीचा धावता आढावा आवडला.

अत्रुप्त आत्मा's picture

13 Feb 2013 - 11:50 pm | अत्रुप्त आत्मा

ह्येच म्हनायलो... :-)

जोशी 'ले''s picture

13 Feb 2013 - 9:25 pm | जोशी 'ले'

मस्त माहिती...

अजून बरीच माहिती बाकी आहे.. क्रमशः धागा येऊदे का??

अभ्या..'s picture

14 Feb 2013 - 2:06 am | अभ्या..

अवश्य येऊ दे प्रथम. अगदी स्पेशलाइज्ड भाग टाकलास तरी चालेल. कंपन्याची ग्लोबल मार्केटींग कॅम्पेन्स, टेलिवॉर्स वगैरेवर लिहिलास तरी खूप आनंद होईल. रोचक असेल ते पण.
हे लेखन आणि फोटो पण ब्येस्ट एकदम

मोबाईलचा संक्षिप्त इतिहास आवडेश!! तांत्रिक वैशिष्ट्यांसकट अजून डीटेलवारी इतिहास पण आवडेल बगा वाचायला.

किसन शिंदे's picture

14 Feb 2013 - 2:17 am | किसन शिंदे

माहिती छान रे, पण एकही फोटो दिसला नाही.

तिमा's picture

15 Feb 2013 - 8:29 pm | तिमा

फोटो आणि माहिती सादर करण्याची पद्धतही आवडली. येऊ द्या क्रमशः
- तिमा

+१ असेच म्हणतो
-तिरशिंगराव

+११ असेच म्हनतो
-तिरशिंगराव माणूसघाणे

विकास's picture

15 Feb 2013 - 9:28 pm | विकास

मस्त लेख आणि फोटू! धन्यवाद.

वेल्लाभट's picture

15 Feb 2013 - 9:31 pm | वेल्लाभट

कस्स्ला माहितीपूर्ण नोड आहे हा ..... थँक्स !!!!

मुक्त विहारि's picture

15 Feb 2013 - 9:46 pm | मुक्त विहारि

धन्स

ज्या मोटोरालानं सुरुवात केली ते आज कुठंतरी हरवल्यासारखे का आहेत कुणी सांगेल का ?

मोटोरोला झोपले आता... एक तर कंपनी विभक्त झाली, आणि त्यांच्याशी स्पर्धा करणारे सॅमसंग, अ‍ॅपल, ब्लॅकबेरी इ इ. त्यांच्या मैलोनमैल पुढे निघून गेलेत..

सस्नेह's picture

16 Feb 2013 - 8:55 pm | सस्नेह

मनोरंजक माहिती.
'ब्रिक'ची वीट भारीये...

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

16 Feb 2013 - 9:40 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

छान. माहितीपूर्ण लेखन.

-दिलीप बिरुटे

तुमचा अभिषेक's picture

16 Feb 2013 - 10:40 pm | तुमचा अभिषेक

तो पेजर म्हणून एक प्रकार असायचा त्याचे काय झाले कोणाला माहित आहे का?

मी-सौरभ's picture

19 Feb 2013 - 7:16 pm | मी-सौरभ

तो ८८१० अजुन पण मिळतो का?
कॉलेजमधे अस्ताना पुढे कधीतरी हा फोन घ्ययचा असं मनाशी ठरवल होतं :(

मुंबईत सीएसटी ला मनिष मार्केट आहे, तिकडे जाफर म्हणून एकाचं एक मोबाईल स्टोअर आहे. त्याच्याकडे मिळेल. तो जगातला कोणताही फोन कुठूनही आणून देईल. अगदी ब्रिक फोन हवा असला तर तोसुद्धा काढेल जाफर जुगाड मारून.. :)