जॉर्ज फेरीसचा १५० वा स्मृतीदिन.

नानबा's picture
नानबा in जनातलं, मनातलं
14 Feb 2013 - 3:13 pm

अख्ख्या जगात १४ फेब्रुवारी हा वॅलेंटाईन दिवस म्हणून साजरा केला जात असला तरी आजच्या दिवसाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हा दिवस फेरीस व्हीलचा प्रणेता जॉर्ज वॉशिंग्टन गेल फेरीस जुनियर याचा जन्म दिवस आहे.
jorge

जॉर्जचा जन्म १४ फेब्रुवारी, १८५९ रोजी गेल्स्बर्ग, इलिनॉईस येथे जॉर्ज वॉशिंग्टन गेल फेरीस सिनियर आणि मार्था एडगर्टन हाईड यांच्या पोटी झाला. जॉर्ज ६ वर्षांचा असताना त्यांनी गेल्स्बर्ग सोडलं आणि ते नेव्हाडात स्थायिक झाले.

१८८१ साली जॉर्ज ट्रॉय, न्यूयॉर्क इथल्या रेन्सलियर पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट मधून सिव्हिल इंजिनियर बनून बाहेर पडला. त्याला पूलबांधणीत फार रस होता, आणि त्यासाठी त्याने पिट्सबर्गमध्ये G.W.G. Ferris & Co. या कंपनीची स्थापना केली.

१८९३ मध्ये होणार्‍या World's Columbian Exposition साठी जॉर्ज शिकागोला आला. तिकडे World's Columbian Exposition च्या आयोजकांनी अमेरिकन इंजिनियर्सना आयफेल टॉवरपेक्षा उंच आणि भव्य काहीतरी बांधण्याचं आव्हान दिलं. त्यातूनच जॉर्जच्या डोक्यात फेरीस व्हीलची कल्पना आली. त्याने पाळणे असलेलं, आणि ज्यात बसून लोकं आजूबाजूच्या परिसराचा आनंद घेऊ शकतील अशा फेरीस व्हीलची कल्पना मांडली. पण जमिनीच्या इतक्या वर फिरणारं व्हील तोलणं अशक्य आहे असं सांगून आयोजकांनी ते नाकारलं.
पण इथेच हार न मानता अनेक इतर इंजिनियर्सशी सल्लामसलत करून जॉर्जने ही संकल्पना प्रत्यक्षात येणं शक्य आहे हे आयोजकांना पटवून दिलं आणि अखेरीस त्या काळी $४००,००० गुंतवून जगातलं पहिलं फेरीस व्हील आकाराला आलं. या व्हीलला प्रत्ये़की ६० जण बसू शकतील असे ३६ पाळणे होते. म्हणजेच एका खेपेस हे व्हील सुमारे २१६० जणांना सामावून घेऊ शकत असे. World's Columbian Exposition संपेपर्यंत या व्हीलने जवळपास २.५ करोड लोकांना सैर घडवली होती.
wheel
हे जॉर्जचं जगातील पहिलंवहिलं फेरीस व्हील

पण World's Columbian Exposition च्या आयोजकांनी जॉर्जचे पैसे चुकते न केल्यामुळे तो प्रचंड कर्जाच्या ओझ्याखाली दबला गेला, आणि त्याच मानसिक तणावाखाली वयाच्या केवळ ३७ व्या वर्षी २२ नोव्हेंबर, १८९६ रोजी मरण पावला.

तर या वर्षीपासून १४ फेब्रुवारीला आपल्या प्रेमाबरोबरच क्षणभर या इंजिनियरचीसुद्धा आठवण ठेऊयात.

धोरणप्रकटन

प्रतिक्रिया

प्रसाद१९७१'s picture

14 Feb 2013 - 5:17 pm | प्रसाद१९७१

गुगल बघा आज चे

रोचक आठवण!! फेरीस व्हीलच्या इतिहासाबद्दल नव्यानेच कळले.

बाकी १४ फेब्रुवारीला सकलभारतीयरसिकहृदयस्वामिनी गांधारकन्या मधुबाला हिचा जन्मदिवस, तिच्यावर आमचा फाऽर जीव. तिचीही आठवण ठेवूया. :)

मधुबाला

प्रचेतस's picture

14 Feb 2013 - 5:52 pm | प्रचेतस

मस्त रे प्रथम.
ह्या पाळण्याला फेरीचक्र म्हणायचो आम्ही. त्याच्या उगम फेरीस व्हील या नावात आहे हे आज कळाले.

किसन शिंदे's picture

15 Feb 2013 - 3:15 am | किसन शिंदे

लहानपणापासून ह्याला आकाश पाळणा याच नावाने संबोधायचो. अलिकडे जायंट व्हिल असं नाव कानावर पडू लागलंय.

सुनील's picture

14 Feb 2013 - 7:16 pm | सुनील

छान माहिती. आज गूगलवर गेल्यावर अंदाज आला होताच.

लहानपणी बरेचदा फेरी चक्र अनुभवले आहे. वर जाताना मजा येते आणि खाली येताना पोटात गोळा येतो!

फेरीस व्हीलचेच एक आधुनिक रुपडं सध्या तमसातिरी "लंडन आय" नावाने फिरते आहे. दिवस बरा असेल (यासाठी नशीब लागते!) तर, फार दूरवरील विंडसर पॅलेसदेखिल दिसतो.

सुनील's picture

14 Feb 2013 - 7:19 pm | सुनील

स्वसंपादन कधी मिळणार?

आनंद घारे's picture

14 Feb 2013 - 8:02 pm | आनंद घारे

गूगलवर फारसे भ्रमण न करणार्‍यांना फेरिसबद्दल आयती चांगली माहिती मिळाली.
जॉर्ज फेरीसचा १५० वा स्मृतीदिन . या शीर्षकाचा अर्थ मात्र लागत नाही. १४ फेब्रुवारी हा त्याचा जन्मदिवस आहे आणि त्याचा मृत्यू १८९६ मध्ये झाला असे लेखातच लिहिले आहे. असल्या तपशीलाबद्दल थोडी काळजी घ्यावी.

मनराव's picture

14 Feb 2013 - 8:10 pm | मनराव

मस्त माहिती दिलित.. कायम लक्षात रहिल अशी.......

अग्निकोल्हा's picture

15 Feb 2013 - 3:06 am | अग्निकोल्हा

त्या काळी चक्क $४००,००० सिड इन्वेस्टमेंट ? जबरा है न रावं. फेरीसचा मृत्यु मात्र विषाददायक :(

५० फक्त's picture

15 Feb 2013 - 2:27 pm | ५० फक्त

म्हंजे काम झालं की पैशाला टांग द्यायची हे फार पुर्वीपासुन आहे म्हंजे. असो.

टांग देणे संस्कृती अनादि अनंत काळापासून हाये वो.. तिला स्थळ, काळ, वेळ, जात पात, धर्म काय बी आड येत न्हाय बगा

घारे काका, चूक सुधारणेबद्दल धन्यवाद. जॉर्ज फेरीसचा १५० वा वाढदिवस, किंवा जॉर्ज फेरीसची १५०वी जयंती असं शिर्षक ठेवायला हवं होतं... :)

याची आठवण, त्या व्हिलमधे बसल्यावर पोटात आलेला गोळा मला सतत घडवतो.

नानबा's picture

15 Feb 2013 - 2:48 pm | नानबा

:D :D :D :D