भू-भू भुंकणारे कुत्रे
कुत्र्यांची एक खासियत असते, कुणीही दिसले कि भुंकणे सुरु. एखादा हत्ती सारखा मोठा जनावर दुरून येताना दिसला कि यांचे भू-भू सुरु झालेच समजा. पण जसा-जसा तो जनावर जवळ येईल. कुत्रे भुंकणे सोडून शेपटी टाकून दूर पळून जातात. कुन्त्र्यांचा स्वभावच दुसरे काय. पण कधी एखादा हत्ती स्वकर्माने जमिनीवर पडला कि मग काय म्हणता राव झुंडीच्या झुंडी कुत्र्यांच्या एकत्र होऊन जमिनीवर पडलेल्या हत्ती वर तुटून पडतात. काही क्षणात सर्व कुत्रे मिळून हत्तीच्या शरीराच्या चिंध्या-चिंध्या करतात.