(कुणाच्या फांदीवर कुणाची आर्ची)
अत्यंत अर्थहीन, स्वैर आणि अजागळ विडंबन सादर आहे!
कुणाच्या फांदीवर कुणाची आर्ची?
कशासाठी चढवावे टेकू देऊन?
झाड होते कुणासाठी मूळ रोवून?
जमतात येथे कुणी मुव्हीज बघून!
तरी कशी आणतात घरातुनी खुर्ची?
लोक सारे येती येथे बुलेटवरून
वृक्ष जाती वजनाने वाकून झुकून
फांदीवर घेती सेल्फी झोकून झोकून
म्हणती हे वेडे पीर, 'चढू फांदी वरची!'
अंत झाला फोटोसाठी, जन्म एक सेल्फी
पारध्याची वाणी म्हणजे बेचवच कुल्फी
फांदी तीच परी तिची पडे गड्या ढलपी
परश्यापरी आयुष्य हे फांदीमुळे खर्ची
- स्वामी