मणाचा एकान्त
censor ने बंदी घातलेला
तरीही पायरेटेड सीडी शोधून घेतलेला
निव्वळ प्रौढासांठी गोलातलं A चिन्ह असलेला
कुठलातरी तमीळ चित्रपट
पाहतोचकी आपण
एकही 'सीन' नसलेला
कधी pause, play, fast forward
तर कधी zoom, backward, resume करत
दुसरं काय असतो
एकांत म्हणजे तरी?