८० वर्षांच्या मुलीचा चांगुलपणा कसा कमी करु?

लीना कनाटा's picture
लीना कनाटा in जनातलं, मनातलं
9 Aug 2016 - 8:06 am

माझ्या ८० वर्षांच्या सासुबै प्रचंड समंजस आणि मनमिळावू आहेत. त्या सगळ्या गोष्टी नीट व व्यवस्थित करतात. त्या मला भांडण करायची संधीच देत नाहीत. त्या मुळे माझा संयम संपता संपत नाही आणि मला त्यांना शाब्दिक फटके देता येत नाहीत ज्याची परिणीती नंतर मला वाईट वाटण्यात होते.

त्यांना म्हणे मी भांडत नाही आणि आमच्यात कधीही शाब्दिक चकमक, रुसवे फुगवे होत नाहीत याचा फार आनंद होतो. असं त्या सगळीकडे सांगत असतात विशेषतः माझ्या मैत्रिणींना, त्यामुळे मी माझ्या मैत्रिणींची सहानुभूती गमावते आणि माझ्या मनासारखे काहीच होत नाही. सास बहूच्या मालिका बघून देखील मलाच काही कळत नाही ह्या निष्कर्षाप्रत सगळ्या मैत्रिणी येतात.

मला वाटते माझ्या सासुबै खरंच भयंकर चांगल्या आहेत. मला खरच मज्जा वाटली असती जर त्या दुसऱ्यांच्या सासवां सारख्या वागल्या असत्या.

१. मी नक्की काय करावं की ज्यानी सासुबैंचा चांगुलपणा आणि समंजसपणा कमी होईल?
२. माझ्या वागण्यात नक्की काय बदल घडवून आणू? की ज्यामुळे त्या इतर सासवां प्रमाणे वागतील?

करू मिपात दंगा

विडंबन

प्रतिक्रिया

क्षमस्व's picture

9 Aug 2016 - 8:09 am | क्षमस्व

सिरियसली?

एस's picture

9 Aug 2016 - 8:19 am | एस

आवरा.

नावातकायआहे's picture

9 Aug 2016 - 8:31 am | नावातकायआहे

आवरा आता

दणकुन जुलाब झालेत हो तुम्हाला

आमचे काही मिपाकर प्रचंड विडंबक आहे.
ते एका धाग्याचे एवढे विडंबन करतात की
शेवटी सगळ्यांना कंटाळा येतो आणि त्याची
परिणिती लेख फाट्यावर मारण्यात होते
आणि ज्याचे मला फार वाईट वाटते.
त्यांना फाट्यावर मारल्यावर वाईट वाटते. हे असं बोलून ते
काही कंपूबाज मिपाकरांची
सहानुभूती मिळवतात,आणि शेवटी सगळं
त्यांच्या मनासारखे प्रतिसाद पडतात
मला वाटते की हे विडंबनकार भयंकर
नाटकी आहे. त्यांना खरचं फाट्यावर मारण्याची भीती वाटत
असती तर त्यांनी धागा वर आणण्याची पुनुरावृत्ती
नसती केली.
१. मी नक्की काय करावं की ज्यामुळे माझ्या लेखाचे विडंबन पडणार नाही?
२. माझ्या लेखन शैलीत काय बदल करू

पुण्यात दंगा करून पस्तावलेले :-(

नाखु's picture

9 Aug 2016 - 9:24 am | नाखु

नक्कीच "लीन कनाटा" यांनी टाकलेला नसून या आय्डीच्या सासर्याने टाकला असावा असा आम्हाला सौंशय आहे,

कारण त्यांना "अता सासू बदला" असा सल्ला अपेक्षीत आहे हे आम्हाला कळून चुकले आहे.

अखिल मिपा "इकडे तिकडे चोहिकडे विडंबनाचे पीक पडे" संघ आणी जेपी जमेल तसा सत्कार समीती

त्रिवेणी's picture

9 Aug 2016 - 9:49 am | त्रिवेणी

नवीन सासु बै आणा अाता.आणि आता निट निरखून पारखून आणा.तुम्हाला अपेक्षीत सगळ्या गोष्टी आहेत न याची खात्री करुन घ्या.

ज्योति अळवणी's picture

9 Aug 2016 - 11:30 am | ज्योति अळवणी

नवीन सासूबाई म्हणजे सासरेबुवांची चंगळ. त्यापेक्षा त्या इतरांच्या सासूसारख्या आहेत अस मानून आपणहून भांडण करा की.... त्या चांगल्या वागतात म्हणजे तुम्ही देखील चांगल वागल पाहिजे अस नाही. त्याचं ८० वर्ष वय म्हणजे तुम्ही काही विशीतल्या नसालच... मग थोडं सूनstyle डोकं चालवता नक्की येईल...

एक अनाहूत सल्ला बरका!

सुबोध खरे's picture

9 Aug 2016 - 11:33 am | सुबोध खरे

एक गाणं आठवलं
ऐंशी वर्षाची असून म्हातारी सांगतिया वय सोळा
खोटं काय म्हणता राव आंधळा मारतो डोळा
कावळा करतोय कुहू कुहू अन बोंब मारतीया कोकिळा
खोटं काय म्हणता राव आंधळा मारतो डोळा

उडन खटोला's picture

9 Aug 2016 - 11:46 am | उडन खटोला

एन डी तिवारी यांची काही ओळख आहे का?
(प्रतिसाद हलका घ्या)

उडन खटोला's picture

9 Aug 2016 - 11:46 am | उडन खटोला

एन डी तिवारी यांची काही ओळख आहे का?
(प्रतिसाद हलका घ्या)

मोहनराव's picture

9 Aug 2016 - 1:32 pm | मोहनराव

बास की आता!!

देशाच्या कानाकोपर्यातून तशाच बातम्या येतात तसं वाटतंय आता !

तुषार काळभोर's picture

9 Aug 2016 - 5:36 pm | तुषार काळभोर

घरात प्रेमाने / लाडाने 'माई' म्हणतात का हो?

नाना-माई-दादा, डायरेक्ट हितोपदेश करतात.

लीना कनाटा's picture

10 Aug 2016 - 3:57 am | लीना कनाटा

मुव्ही काका,

सहीं पकडें हैं !!

माझा आणि ताई, बाई, माई किंवा बाबा, काका, नाना, दादा यांच्याशी दुरान्वये देखील संबंध नाही.

मात्र एक करेक्शन,

नाना-माई-दादा, डायरेक्ट हितेशोपदेश करतात.