कानही बधीर आणि सहवेदनाही
नवसाचा बोगस क्लेम
मोदकांच अपचन
मंत्रजागराची तीनपत्ती
आणि मिरवणूकीत सैराटच्या गाण्यांवर
बेधुंद नाचणारा समाज पाहून
विकट हसलो तुझ्या दैवत्वावर
की माझ्या या बांधवांच्या उन्मादावर
समजेनासे झालंय हल्ली सार
हे बुद्धीच्या ईशा ,तुझ्या असण्यात
तरीही हवहवस वाटत काही
उत्सवातली शांतता असेल
उज्वल भविष्याची नांदी
हे उमजेल तो दीन उगवू दे
प्रतिक्रिया
9 Sep 2016 - 6:17 pm | ज्योति अळवणी
हे बुद्धीच्या ईशा ,तुझ्या असण्यात
तरीही हवहवस वाटत काही
यातच आलं सर्वकाही. समाज एका रात्रीत... एका महिन्यात किंवा एका वर्षात सुधारत किंवा बदलत नसतो. पण बदल आणि योग्य बदल नक्की होत असतो. नियम पाळणे जड असते म्हणून तर आपण पळवाटा शोधतो. त्या बुद्धीच्या देवाला हे माहित आहे म्हणून तो हे सहन करतो आहे कदाचित.... भविष्य उज्वल आहे हे दिसत आहे त्याला!
10 Sep 2016 - 6:10 pm | पैसा
हम्म