एका मित्राचे नुकतेच लग्न ठरले आहे. सध्या प्रेमरसात न्हाऊन निघत असल्यामुळे ट ला ट जुळवून रोज तो एक प्रेमकविता करतो. मला कवितेतलं खूप काही कळतं असा त्याचा समाज असल्यामुळे तो आधी मला पाठवतो मग तिला..आज सकाळी त्याने पाठवलेल्या कवितेचे विडंबन करण्याचा मोह मी टाळू शकलो नाही..
मित्राची कविता..
भिडत होती नजर मोहक ती...
माझ्या नजरेस जेंव्हा जेंव्हा...
उमटत होते प्रतिबिंब तूझे ते...
या ह्रुदया मधे तेंव्हा तेंव्हा...
पडत होते शब्द तूझे ते
या कानांवर जेंव्हा जेंव्हा...
तरंग उठत होते प्रेमाचे
या मनामधे तेंव्हा तेंव्हा...
येत होता हात नाजूक तो
या हातांमध्ये जेंव्हा जेंव्हा...
धस्स होत होते ते
या काळजात तेंव्हा तेंव्हा...
पाहून मजला उमटत होते
स्मितहास्य मुखावर जेंव्हा जेंव्हा...
हरवून जात होतो मी
त्या हसण्या मध्ये तेंव्हा तेंव्हा...
जवळ येत होतीस
या ह्रुदयाच्या तू जेंव्हा जेंव्हा...
शहारून येत होते ते
या तनामध्ये तेंव्हा तेंव्हा...
येत होती वेळ नजीक
दूर जाण्याची जेंव्हा जेंव्हा...
घालमेल होत होती ती
या वेड्या जीवाची तेंव्हा तेंव्हा...
सतावतो मजला हा
एकटेपणा आता जेंव्हा जेंव्हा...
घेता मिटून डोळे ते
जवळ जाणवतेस तु तेंव्हा तेंव्हा...
लग्नानंतर या कवितेचे स्वरूप कसे असेल ह्याविषयी केलेले चिंतन..
भिडत होती नजर मोहक ती...माझ्या नजरेस जेंव्हा..
देवा!! काय मागशील तू आता..खर्च किती अनं केंव्हा !
पडत होते शब्द तूझे ते...या कानांवर जेंव्हा...
शांत कधी बसशील का?..विचार एवढाच तेंव्हा !
येत होता हात नाजूक तो.. या हातांमध्ये जेंव्हा...
तुका म्हणे क्षणिक हे सारे..मोहपाश हे सुटतील केंव्हा !!
पाहून मजला उमटत होते..स्मितहास्य मुखावर जेंव्हा..
घाबरत होतो मी..काय चुकलो मी देवा अनं केंव्हा !
येत होती वेळ नजीक... दूर जाण्याची जेंव्हा..
क्षण कधी येईल तो..वाट त्याचीच तेंव्हा !
सतावतो मजला हा एकटेपणा आता जेंव्हा..
बाकी काहीच नाही ..भुकेची जाणीव फक्त असते मला तेंव्हा..!
-चिनार
प्रतिक्रिया
6 Sep 2016 - 5:44 pm | प्रभास
भारीच!!!
6 Sep 2016 - 6:15 pm | जव्हेरगंज
एक नंबर !!!
6 Sep 2016 - 6:31 pm | पैसा
खतरनाक!
6 Sep 2016 - 7:47 pm | चिनार
धन्यवाद!!
6 Sep 2016 - 7:50 pm | यशोधरा
किती तो दुत्तपणा मित्राबरोबर! विडंबन आवडले.
6 Sep 2016 - 11:37 pm | वाल्मिक
मोकळ्या दही दिशा ची आठवण आली
7 Sep 2016 - 10:41 am | महासंग्राम
कूच भी बाता करते क्या मियाँ
7 Sep 2016 - 1:39 am | पाटीलभाऊ
मस्त विडंबन
7 Sep 2016 - 2:06 am | रुपी
दोन्ही चांगल्या आहेत :)
7 Sep 2016 - 9:42 am | पथिक
हा हा हा
मस्त!
7 Sep 2016 - 9:45 am | चिनार
धन्यवाद!!
7 Sep 2016 - 9:45 am | अभ्या..
नाही आवडली.
वाचली, विसरुन गेलो. एक शब्द ही लक्षात राहिला नाही.
7 Sep 2016 - 9:55 am | नाखु
दुसरीत घेत नाहीत म्हणे...
त्या स्थित्यंतराचा अविषाकर आवडला...
मित्राला सांत्वनपर कवीता नंतरच पाठव.
====================================
पुन्हा मिसामा
8 Sep 2016 - 9:52 am | चिनार
माई..तुझ्या शब्दाबाहेर नाहीये मी..जरा गावी जाऊन येतो महालक्ष्मीसाठी..मग आलोच बघ आलेपाक घ्यायला..
9 Sep 2016 - 6:24 pm | ज्योति अळवणी
धम्माल.... झक्कास... आवडली...
11 Sep 2016 - 4:58 pm | विवेकपटाईत
कविता आवडली. लग्नानंतरचे सत्य जास्त आवडले.
11 Sep 2016 - 5:30 pm | मोक्षदा
कविता व विडंबन चांगले