मिपा प्रतिज्ञा

लीना कनाटा's picture
लीना कनाटा in जनातलं, मनातलं
14 Aug 2016 - 9:51 pm

मिपा माझे संस्थळ आहे.
सारे मिपा सदस्य माझे वाचन बंधू आणि भगिनी आहेत.
माझ्या मिपावर माझे वाचनीय प्रेम आहे.
माझ्या मिपा वरील विविध धाग्यांचा मला अभिमान आहे.
असे धागे पाडण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन.
मी सगळ्या मिपा सदश्यांचे धागे वाचीन आणि प्रत्येकावर पिंक टाकेन.
माझे मिपा आणि माझे मिपासदस्य यांच्याशी मैत्री राखण्याची मी प्रतिज्ञा करीत आहे.
त्यांचे धागे आणि त्यावरचे प्रतिसाद यातच माझे वाचनसौख्य सामावलेले आहे.

जय मराठी. जय मिपा.

तळटीप : या ठिकाणी माझ्या परम प्रिय देशाचा किंवा अन्य कोणाचाही उपमर्द करण्याचा हेतू नाही.

विडंबन

प्रतिक्रिया

लालगरूड's picture

14 Aug 2016 - 10:10 pm | लालगरूड

પૌડ फाटा

मिपा तुमचे संस्थळ आहे?

अत्रुप्त आत्मा's picture

14 Aug 2016 - 10:34 pm | अत्रुप्त आत्मा

The मामी!

चौकटराजा's picture

16 Aug 2016 - 7:21 am | चौकटराजा

ही कुठली मामी ? म्हावरावाली ?

अभिजीत अवलिया's picture

16 Aug 2016 - 2:32 am | अभिजीत अवलिया

'त्यांचे धागे आणि त्यावरचे प्रतिसाद यातच माझे वाचनसौख्य सामावलेले आहे.'

ह्या पेक्षा

'त्यांचे धागे आणी त्यावरचे माझे स्कोर सेटलिंग यातच माझे वाचनसौख्य सामावलेले आहे.'
हा बदल कसा वाटतोय?

लीना कनाटा's picture

16 Aug 2016 - 4:32 am | लीना कनाटा

स्कोर सेटलिंग ?? म्हंज्जे काय्य अभिजीतदा ??

अभिजीत अवलिया's picture

16 Aug 2016 - 7:41 pm | अभिजीत अवलिया

व्य.नि. केलेला आहे ताई