उथळ

तिमा's picture
तिमा in जे न देखे रवी...
5 Sep 2016 - 10:35 am

पुल देशपांडे उर्फ भाई यांस,

उथळ उथळ उथळ किती
नवसमाज भाई
सूज्ञांची परिवशता
अंत कळत नाही.
उथळ .......
रंगवूनी स्त्रीपात्र हिडीस
पुरुष लचकती
नाटक वा सिरियल हो
तेच सूत्र भाई
उथळ ........
अकलेला साजिशी
गोष्ट निर्मिती
लांबण किती चालावी
हेच कळत नाही
उथळ .......
नवल मनीं हे वाटे
'गुरु' जनांचे
'पीजे' ला ' सिद्धु' हास्य
खंत उरी राही
उथळ उथळ उथळ किती
नवसमाज भाई !

vidambanसंस्कृतीविडंबनजीवनमानमौजमजा

प्रतिक्रिया

संदीप डांगे's picture

5 Sep 2016 - 10:47 am | संदीप डांगे

छान! कविता सुंदर!

सुरवंट's picture

5 Sep 2016 - 6:25 pm | सुरवंट

उथळ कविता

कविता१९७८'s picture

5 Sep 2016 - 6:48 pm | कविता१९७८

मस्त कविता

अभ्या..'s picture

5 Sep 2016 - 7:12 pm | अभ्या..

मस्त कविता तिमाजीपंत.
भारी आसूड ओढलेत. आवडले

खंग्री. ते तथाकथित स्टॅण्डअप कॉमेडी आणि स्किटच्या नावाखाली निव्वळ थिल्लरपणा सुरू आहे आजकाल मराठी वाहिन्यांवर.

यशोधरा's picture

7 Sep 2016 - 12:09 pm | यशोधरा

हेच म्हणते.

वाल्मिक's picture

6 Sep 2016 - 11:43 pm | वाल्मिक

छान विडंबन

आवडली कविता. पण 'गुरु' जन प्रकाश आमटे, अण्णा हजारे यांसारखे... 'हे' कुठले गुरुजन?

सुचिकांत's picture

7 Sep 2016 - 12:17 pm | सुचिकांत

सत्य परिस्थिती