(टीपः हे गाणे आणि हाच विषय घेउन एक विड्म्बन मला व्हॉट्स अप वर आले होते (कवी अज्ञात) . त्याचे मी माझ्या पद्धतीने सोपस्कार करून गाणे आणिक विषय तोच ठेवून, मूळ विडम्बन काराच्या प्रतिभेला अभिवादन करून हे विडम्बन लिहीत आहे )
कोणास ठाऊक कशी पण जेलात गेली शशी
शशीने हलविली मान, घेतले सुंदर ध्यान
अदालत म्हणाली, व्वा व्वा !
शशी म्हणाली, सोडा मला
कोणास ठाऊक कशी, पण जेलात गेली शशी
पनीरने मारली उडी, भरभर चढला शिडी
शशी म्हणाली, थान्ब थान्ब !
पनीर म्हणाला, नानाची टान्ग
कोणास ठाऊक कशी, पण जेलात गेली शशी
शशीने म्हटले पाढे आणि पलानी स्वामी आले पुढे
न्यायाधीश म्हणाले, शाबास !
शशी म्हणाली, करा बास
(कोणास ठाऊक कशी, पण जेलात गेली शशी
शशीने वेचले खडे आणि बान्धले उदबत्तीचे पुडे
जेलर म्हणाले, छान छान !
शशी म्हणाली, कस्ला त्रास )
मूळ गाणे:
कोणास ठाऊक कसा पण सिनेमात गेला ससा
सशाने हलविले कान, घेतली सुंदर तान
दिग्दशर्क म्हणाला, व्वा व्वा !
ससा म्हणाला, चहा हवा
कोणास ठाऊक कसा, पण सर्कशीत गेला ससा
सशाने मारली उडी, भरभर चढला शिडी
विदुषक म्हणाला, छान छान !
ससा म्हणाला, काढ पान
कोणास ठाऊक कसा, पण शाळेत गेला ससा
सशाने म्हटले पाढे आणि घडघड वाचले धडे
गुरुजी म्हणाले, शाबास !
ससा म्हणाला, करा पास
प्रतिक्रिया
24 Feb 2017 - 2:50 pm | जव्हेरगंज
ससा आवडला!!
शशी काय जमली नाही!
24 Feb 2017 - 4:20 pm | चांदणे संदीप
चांगली निरम्यात बुडवून काढली...
कोणास ठाऊक कशी
पण जेलात गेली शशी ||धृ||
शशी पडली तीनदा पाया
घेतली अम्मांची छाया
जनता म्हणाली व्वा व्वा!
कोर्ट म्हणाले, खा हवा!
कोणास ठाऊक कशी
पण जेलात गेली शशी ||१||
पनीरने मारली उडी
भरभर चढला शिडी
शशी म्हणाली, थांब थांब!
पनीर म्हणाला, जा लांब!
कोणास ठाऊक कशी,
पण जेलात गेली शशी ||२||
पलानीने म्हटले पाढे
आणि आला सरसर पुढे
शशी म्हणाली, शाबास!
कोर्ट म्हणाले, करा बास!
कोणास ठाऊक कशी,
पण जेलात गेली शशी ||३||
Sandy