(वंचनांचे खर्चही पडताळणे आता नव्याने)

चतुरंग's picture
चतुरंग in जे न देखे रवी...
3 Feb 2017 - 8:13 am

विशाल भौंची नेहेमीप्रमाणेच सुरेख गजल वाचली 'वंचनांचे खर्चही पडताळणे आता नव्याने' आणि आमच्या काही वंचनांचा बांध फुटला! ;)

शोधतो मौनात बागा, निरखणे आता नव्याने
पेठ गल्लीबोळ फिरुनी शोधणे आता नव्याने!

कोणत्या त्या बंगली वसते परी सांगा गड्यांनो?
फाटकांच्या अंतरी डोकावणे आता नव्याने!

'भारती' अन 'वाडिया'ही वाटती का क्षुद्र आता?
फर्ग्युसनच्या मृगजळी धुंडाळणे आता नव्याने!

'सीसिडी'ला पडिकणे मी सोडले आहे अताशा
वंचनांचे खर्चही पडताळणे आता नव्याने!

कन्यकांना शोधतो मी बापसांची कोण गर्दी
'लष्करा'च्या 'गांधि'मार्गी चालणे आता नव्याने!

मोल कवडी हाय! उरलो, येच तू बघते घरी रे
विघ्नकर्त्या हात जोडुन विनवणे आता नव्याने!!

- चतुरंग

vidambanकविताविडंबन

प्रतिक्रिया

अत्रुप्त आत्मा's picture

3 Feb 2017 - 8:57 am | अत्रुप्त आत्मा

http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-049.gif

खेडूत's picture

3 Feb 2017 - 9:34 am | खेडूत

मस्तच !
'फाटकांच्या अंतरी डोकावणे' यात श्लेषआहे असं उगीच वाटतंय.

'लष्करा'चा 'गांधि'मार्ग हल्लीच्या काळी कोथरुडात गेलाय..
त्यामुळे 'शहरा'च्या 'गर्व' मार्गी चालणे आता नव्याने असा बदल सुचवतो.

चतुरंग's picture

3 Feb 2017 - 4:51 pm | चतुरंग

'फाटकांच्या अंतरी डोकावणे' यात श्लेषआहे असं उगीच वाटतंय

तुमच्या मनात वेगळे 'फाटक' असले तर श्लेष आहे! ;)

पैसा's picture

3 Feb 2017 - 9:44 am | पैसा

=)) =)) पडिकणे शब्द लैच लाइकला आहे!

तिमा's picture

3 Feb 2017 - 10:12 am | तिमा

मूळ कविता आणि विडंबन दोन्ही छान.

एस's picture

3 Feb 2017 - 10:25 am | एस

हाहाहा!

हतोळकरांचा प्रसाद's picture

3 Feb 2017 - 1:05 pm | हतोळकरांचा प्रसाद

:):)...जबराट!

पडिकणे आवडल्या गेले आहे. बाकी फर्ग्युसन ट्यालेंटेड हों!!

विशाल कुलकर्णी's picture

4 Feb 2017 - 7:49 pm | विशाल कुलकर्णी

दंडवत स्विकारा देवानू :)

स्रुजा's picture

5 Feb 2017 - 10:14 pm | स्रुजा

खिक ! पडिकणे ___/\___

राघव's picture

6 Feb 2017 - 10:28 am | राघव

खूप दिवसांनी..! मस्त वाटले!

रातराणी's picture

6 Feb 2017 - 12:28 pm | रातराणी

सही विडंबन!