ती अनोळखी भावना कागदावर उतरत नाहीये
हा मनातला गुंता सूटता सूटत नाहीये
प्रश्न राहिले आहेत अनुत्तरित माझे
पण तो अस्पष्ट चेहरा पुसला जात नाहिये
शांत हृदयाचे तार छेडले गेले
की भरलेल्या जख्मा उघड्या पडल्या
प्रेमाचे का हे सुर जे हृदयी वाजतात
का वेदना पुन्हा माघारी वळल्या
परिवर्तन अनिवार्य आहे परंतु
क्षणभंगुर कसे काय होते
कोरडे दुष्काळी हृदय माझे
भरूनी लगेच रीते कसे होते
का वाटा पुन्हा पाउलाखाली याव्या
जिथे मी एकटाच घुटमळत उभा
का मग असावी जाणाऱ्याला
सोडूनी पुन्हा परतन्याची मुभा
.....…........................RDK
प्रतिक्रिया
20 Sep 2017 - 3:00 pm | पैसा
कविता आवडली
20 Sep 2017 - 5:06 pm | RDK
धन्यवाद