बघ तुला जमतं का ...
तू साबुदाण्याच्या खिचडीसाठी उपवास कर
किंवा बटाट्याच्या चिप्स साठी
मर्जी तुझी...
उपवासाचे पुण्य नाही मिळाले तरी चालेल
पण
एकादशी दुप्पट खाशी हे
नेहमी लक्षात ठेव.....
तू जिम मध्ये
रोज जा किंवा नको जाऊस
इच्छा तुझी...
तिथे वाकला, पळाला नाहीस तरी चालेल
पण
वजन उचलतानाचे फोटो शेअर करायला
मात्र विसरू नकोस.....
तू मित्र, नातेवाईक यांच्या बरोबर
फेस-टू-फेस संवाद कर किंवा नको करूस
युअर विश...
पण
फेसबुकवर स्टेटस अपडेट करायला
मात्र विसरू नकोस.....
तू सोशल गॅदरिंग्ज मध्ये
सहभागी हो किंवा नको होऊस
हक्क तुझा...
पण
सोशल मीडियावर लॉग-इन करायला
मात्र विसरू नकोस.....
तू सोशल मीडियावर लाईक्स,कॉमेंट्स
कर किंवा नको करूस
युअर विश...
ते सर्व नाही केलं तरी चालेल
पण
माझे फोटो लाईक करायचं
मात्र लक्षात ठेव.....
तू मतदान, झेंडावंदन
कर किंवा करू नकोस
निवड तुझी...
त्यासाठी वेळ नसला तरी चालेल
पण
त्या निमीत्ताने मिळणाऱ्या सुट्ट्या
एन्जॉय करायला
मात्र विसरू नकोस.....
मूळ प्रेर्ना : कायप्पा फॉरवर्ड (कवी अज्ञात)
विडंबन : अस्मादिक
प्रतिक्रिया
30 Sep 2017 - 2:14 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अजून मटेरियल पाहिजे होते पण येऊ दे....!
-दिलीप बिरुटे
4 Oct 2017 - 5:01 am | चामुंडराय
प्राडॉ सर,
अजून मटेरियल पाहिजे तर ऍडवा कि. हाकानाका.
अकन