आज पुन्हा

RDK's picture
RDK in जे न देखे रवी...
19 Sep 2017 - 11:52 pm

आज पुन्हा

आज पुन्हा जगाच्या पायाशी पडलो
आणि दुःखाभोवती लोटांगण घातले
कोरडे ठणठणीत पडलेले डोळे
पुन्हा नकाराच्या पावसात न्हाले

त्या उगवत्या प्रेमाचे किरण
दुःखाची झोप मोडणारच होते
पण भ्रमनिरासेच्या थंडीत कडक
मन माझे पुन्हा घोरत पडले होते
या मोठेपणाच्या गदारोळात खोट्या
माझ्यातले बालक पुन्हा रुसले
कोरडे ठणठणीत पडलेले डोळे
पुन्हा नकाराच्या पावसात न्हाले

जीवन माझी धर्मशाळा येथे
पांथस्थ येतात आणि जातात
कुणी आठवणींची देणगी देतं
तर कुणी भिंतींवर ओरखडे पाडतात
कमकुवत झालेल्या भिंतींमुळे
दुःखाचे छप्पर पुन्हा कोसळले
कोरडे ठणठणीत पडलेले डोळे
पुन्हा नकाराच्या पावसात न्हाले

तो लोपलेला आत्मसन्मानाचा सूर्य
ज्याने जीवन प्रकाशत होते
नकळत आजही खाल्ले मी
भुताकाळाच्या सागरात गोते
माझे सुर्यासारखे तेज आज
मेणाबत्तीसारखे मिणमिनले
कोरडे ठणठणीत पडलेले डोळे
पुन्हा नकाराच्या पावसात न्हाले

हि पहिली वेळ नाही माझी
हा मोठा आधार आहे
नियतीचे हे आव्हान रोजचे
पुन्हा मला स्वीकार आहे
मागे वळून न पाहता मी
पाऊल पहिले पुढे टाकले
कोरडे ठणठणीत पडलेले डोळे
पुन्हा नकाराच्या पावसात न्हाले

.................................RDK

कविताप्रेमकाव्यविडंबन

प्रतिक्रिया

माहितगार's picture

21 Sep 2017 - 7:17 pm | माहितगार

नियतीचे हे आव्हान रोजचे
पुन्हा मला स्वीकार आहे

RDK's picture

21 Sep 2017 - 8:53 pm | RDK

धन्यववाद