.....सोडी सोन्याचा पिंजरा
नेहमीप्रमाणे अकरावी सायन्सवर बायोलाॅजीचं लेक्चर. प्राणीविश्वावर आधारित Kingdom Animalia हा धडा निव्वळ पुस्तकी अंगाने न शिकवल्यास विद्यार्थ्यांच्या मुळात आवडीचा. त्यामुळे अर्धी बाजी जणू मारलेलीच. प्राण्यांचे वर्गीकरण करताना एक सूत्र महत्त्वाचं. जसजसे आपण वर्गीकरण करत पुढे जातो तसतसे नंतरच्या गटातील प्राणी आधीच्या गटातील प्राण्यांपेक्षा शरीररचना,अवयव कार्यपद्धतीच्या दृष्टीने अधिक विकसित झालेले आढळतात.