राधाकृष्ण प्रणय प्रितीचे गीत
कामाने कृष्णाची तपस्या
भंग करण्यासाठी
राधेस पाठवले पण
कृष्णाच्या तपस्येच्या
अनुभूतीने राधाच
तपस्वी झाली
सोडवण्यास गेलेला
कामही तपस्वी होऊन
कृष्णराधेच्या प्रणय
तपस्येस शरण गेला
राधाकृष्ण प्रणय प्रितीचे
गीत गाऊ लागला