तर त्याचं कसंय खंडेराव,
आमची नोकरी येते अत्यावश्यक सेवेमध्ये..
त्यामुळे लॉकडाऊन सुरू असतानाही रोज अर्धा दिवस तरी ऑफिस असतंच..
पण दुःख त्याचं नाहीये,
तीन साडेतीनला घरी आल्यावर आधी आंघोळ करायची. त्यानंतरच भाकर मिळते गिळायला...
दुःख ह्याचंही नाहीये..
कोरोना स्पेशल म्हणून बायकोनी माझे दोन जोडी कपडे वेगळे काढून ठेवलेत. अंघोळ करताना स्वतःच्या हाताने धुवायचे. अन सकाळी इस्तरी करून घालायचे...
सकाळीच इस्तरी केलेलं शर्टपॅन्ट दुपारी धुताना काळजात कसं चर्रर्र चर्रर्र होत असतं ते तुम्हाला नाही कळणार खंडेराव!! तुम्हाला नाही कळणार!
अजून ऐका खंडेराव,
कोरोना गेल्यावर त्याच दोन जोडी कपड्याच्या बदल्यात बोहारणीकडून एक मोठं भगूनं घेण्याचा प्लॅन ठरलाय सासू-सुनेचा..
काळीज तिळ तिळ तुटतंय खंडेराव..
पण सांगायचं कोणाला..!
असो..कोरोना जाणार अन बोहारीण परत दाराशी येणार हा आशावाद काय कमी सुखावणारा आहे का!
चालायचंच!
#लॉकडाऊन
©चिनार जोशी
प्रतिक्रिया
23 Apr 2020 - 11:14 pm | नीलकांत
याच परिस्थितीतून जात असल्यामुळे लेखन आवडलं खंडेराव.
24 Apr 2020 - 10:03 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अनुक्रमे डॉक्टर पोलीस आणि नियमित जे कर्मचारी सध्याच्या काळात काम करीत आहेत त्यांची मनस्थितीची कल्पनाच करुन शकत नाही. आपल्या जवाबदारीला तोड नाही, कृपया अधिक काळजी घ्या. काळजीनेच वावरा असे सांगावे वाटते. आम्ही सर्व आपल्यासोबत आहोतच.
-दिलीप बिरुटे
24 Apr 2020 - 11:26 am | Cuty
नवर्याची नोकरी अत्यावश्यक सेवेत असल्याने अगदी असाच दिनक्रम असतो आमच्याकडे. कधीकधी खूप काळजी वाटते. स्वतःसाठी नाही तरी मुलाबाळांसाठी खूप काळजी घ्यावी लागते.
24 Apr 2020 - 11:52 am | जेम्स वांड
प्रॉब्लेम काहीही असो, चिनारभाऊंचा लेख आला की विषयाला संबंधित काहीतरी उत्तम अन संयुक्तिक ते पण खुसखुशीत शैलीत वाचायला मिळणारच ही हमी असतेच!
जियो, आपण अजून भरपूर लिहावेत ही विनंती अन शुभेच्छा, इस हुनर को और तराशो यार
25 Apr 2020 - 11:51 pm | चिनार
धन्यवाद जेम्स भौ !!