मुक्तक

कवितेत भेटती...

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जे न देखे रवी...
7 Aug 2024 - 10:32 am

कवितेत भेटती डोह कधी
कधी कोडे सहज न सुटणारे
कधी आभासी जगतामधले
अस्पर्श्य, अलख, मोहविणारे

कधी लाट विप्लवी, विकराळ,
फेसाळ, किनारी फुटणारी,
शोषून उषेचे सर्व रंग,
नि:संग निळीशी उरणारी

कधी व्याधविद्ध मृगशीर्षासम
मिथकांशी पाऊल अडखळते
कधी चंद्रधगीच्या वणव्यातून
नक्षत्र वितळणारे दिसते

कधी ओळींच्या मधली जागा
अस्फुट ऊर्जेने लवथवते
शब्दातून अवचित ओथंबत
अलगद काही हाती येते

मुक्तक

पट नीटस स्थळकाळाचा

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जे न देखे रवी...
3 Aug 2024 - 2:58 pm

निवडुंग वनांतरी फुलला
पाहील मग कुणी कशाला

धगधगली बघ शेकोटी
धुरकट मग धुनी कशाला

फड तुऱ्यावरी बघ आला
गोफण मग जुनी कशाला

मी याचक नच, तरी देसी
राहीन मग ऋणी कशाला

क्षण अगणित संभाव्यांचा
शंका मग मनी कशाला

पट नीटस स्थळकाळाचा
त्यावर मग चुणी कशाला

मुक्तक

X/0 = ∞ ? !

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जे न देखे रवी...
25 Jul 2024 - 8:50 am

अगाधा भागाया
-शून्य माझ्यातले
घेता- भेटी आले
अनंतत्व

अनंत जोखण्या
- हाती मोजपट्टी
नव्हती- हिंपुटी
नाही झालो

धून अनंताची
झंकारली गात्री
अनंताचा यात्री
तेव्हा झालो

मुक्तकमौजमजा

पाऊस-कविता झाली पाडून

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जे न देखे रवी...
19 Jul 2024 - 12:51 pm

पाऊस-कविता झाली पाडून
विठुलाही वेठिस धरिले
जशी मागणी तसा पुरवठा
ब्रीदवाक्य कवि-झोळीतले

जरा स्वस्थ बैसेन तोवरी
दिन येईल स्वातंत्र्याचा
हस्तिदंती मम मनोऱ्यातुनी
शब्द तिरंगी लिहिण्याचा

दुरून मग खुणवेल दिवाळी
शब्दांची आतषबाजी-
-करण्यासाठी सज्ज होऊनी
लावीन "प्रतिभेची(?)" बाजी

"स्वांत:सुखाय लिहितो बिहितो"
धूळफेक जरि करितो मी
शब्दांच्या पलिकडे वसे ते
सांग कधी का पाहीन मी? :)

कविता माझीकाहीच्या काही कवितामुक्त कवितामुक्तकमौजमजा

आठवती..

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जे न देखे रवी...
18 Jul 2024 - 9:38 am

आठवती ओले पायठसे
मृद्गंध भारली सांज
नभी मेघमृदंगा साथ करी
रिमझिमती पाऊसझांज

नभ तोलून धरल्या क्षितिजाला
झगमगत दुभंगे वीज
ढग पापण्यात दडण्याआधी
अनिमिष जागतसे नीज

सृजनाची हिरवी हाक जरी
भवतालातून दुमदुमते
ओथंबून येता नभ अवघे
अवचितसे दाटून येते

मुक्त कवितामुक्तक

विलक्षणाच्या उभ्या पिकावर

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जे न देखे रवी...
14 Jul 2024 - 11:16 am

विलक्षणाच्या उभ्या पिकावर
देण्या खडा पहारा
पाहिजेत-जे भेदू शकतील
स्थळकाळाची कारा

पाहिजेत ते - नेणीव ज्यांची
जाणिवेतुनी झरते
अर्थगर्भ मौनातही ज्यांचे
रोमरोम रुणझुणते

पाहिजेत-जे उत्स्फूर्तीच्या
पुष्करणीचे पाणी
पिऊनी खोदतिल अमूर्तावरी
अकल्पिताची लेणी

पाहिजेत-जे अज्ञेयावर
कलम करुनी ज्ञाताचे
विलक्षणाचे वाण बनवुनी
घेतील पीक उद्याचे

मुक्तक

( )129210... अङ्कानां वामतो गति।।

प्रसाद गोडबोले's picture
प्रसाद गोडबोले in जनातलं, मनातलं
12 Jul 2024 - 12:16 am

स्वगतः
१.मला मॉडर्न्स सायन्स/ मॅथेमॅटिक्स मधील संकल्पना आपल्या तत्वज्ञानाशी जोडायला फार आवडते. एस.क्यु.एल मध्ये इंडेक्सिंग हा प्रकार असतो प्रत्येक रो ला एक इंडेक्स लावली की सगळे सॉर्ट, फिल्टर वगैरे ऑपरेशन्स सुपरफास्ट होतात.
किंवा गुगलने सर्वच इंटरर्नेटवर जे केले आहे तसे इंडेक्सिन्ग. म्हणजे कसं की गोष्टी शोधणे सोपे होते.
किंवा अजुन सोपे उदाहरण म्हणजे आता आपल्या पयथॉन मध्ये डिक्शनरी डेटा टाईप असतो ज्यात key : value अशा पेयर असल्याने कोणतेही सर्च ऑपरेशन सोप्पे होउन जाते.

मुक्तकविचार

आपण IDIOT झालो आहोत का?

kool.amol's picture
kool.amol in जनातलं, मनातलं
8 Jul 2024 - 11:10 am

नुकताच डॉक्टर्स डे साजरा झाला. डॉक्टर लोकांविषयी आपल्याकडे सर्व प्रकारच्या भावना आणि मतं आहेत. मी स्वतः डॉक्टर नाही. डॉक्टर होण्यासाठी आवश्यक शैक्षणिक गुणवत्ता मी सिद्ध करू शकलो नाही पण माझे मित्र, मैत्रिणी आणि काही नातेवाईक डॉक्टर आहेत. मी जिथे काम करतो त्या टिम मध्ये मी सोडून सगळे डॉक्टर आहेत त्यामुळे ह्या क्षेत्रातल्या बातम्या, चर्चा रोज कानावर पडत असतात. त्यामुळे माझ्याकडे ह्या क्षेत्रातील थोडी माहिती असते.

मुक्तकप्रकटन

सात-आठ महिन्यांपासून स्टॉक मार्केटमध्ये महिना ८० हजार कमावलेत

कांदा लिंबू's picture
कांदा लिंबू in जनातलं, मनातलं
2 Jul 2024 - 1:27 pm

इशारा:

१. शेअर बाजारातील गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन असते.

२. सदर धागा लेखक गुंतवणूक तज्ज्ञ वा बाजार सल्लागार नाही. हा लेख आणि त्यावरील प्रतिसाद वाचून कुणी गुंतवणूक केल्यास सदर धागालेखक वा हे संस्थळ जबाबदार असणार नाहीत.

---

नमस्कार मिपाकर्स मित्र मैत्रिणींनो.

खरडफळ्यावर झालेल्या संक्षिप्त चर्चेतून हा धागा काढत आहे. लिखाण विस्कळीत वाटू शकेल याची कल्पना आहे पण भावार्थ समजून घ्यावा ही अपेक्षा आहे.

मुक्तकप्रकटन