मुक्तक

आत्मपॅम्फ्लेट-वेगळ्याच धाटणीचा सिनेमा

Bhakti's picture
Bhakti in जनातलं, मनातलं
17 Nov 2023 - 4:06 pm

A
शाळा, टाईमपास, ती सध्या काय करते?,फॅन्ड्री असे लहानपणीच्या कोमल?;) प्रेमाचे सिनेमा मराठीत असताना परत आत्मपॅम्फ्लेट त्याच बालवयातील प्रेमाचा सिनेमा कशाला पाहायचा अस ठरवल होतं.पण दिवाळीच्या आदल्या दिवशी मस्त गोडधोड खाऊन बसले तर हा चित्रपट घरच्यांनी लावला होता.

मुक्तक

शूर्पणखा

vcdatrange's picture
vcdatrange in जनातलं, मनातलं
26 Oct 2023 - 11:11 am

परवा रात्री असा अचानकच भुतकाळाचा लुप लागला अन् थेट ८०च्या दशकातलं लहानपण आठवलं. मुळगावी संगमनेरला कायमस्वरुपी स्थलांतर प्रक्रियेत आई, मी आणि लहान बहिण आजोबांसोबत रहात होतो.
भाऊ आजोबांच्या हातमागासाठी सुताच्या गुंड्या भरणे आणि शिवणकामाच्या मशीनशेजारी आईची पण एक मशिन लागली आणि दिवसभर आम्हीही तिथेच घुटमळायचो. .
सलगच्या बैठ्या कामानं गांजलेले भाऊ जुन्या कविता ऐकवायचे. त्यातली एक गमतिशीर कविता होती "शूर्पणखा" वनवासी रामासमोर आलेली राक्षशीण शूर्पणखा रामावर भुलते आणि सीतेला सोडुन तिच्यासोबत येण्यासाठी रामाचा अनुनय करते असा कवितेचा आशय.

कवितामुक्तकभाषाआस्वाद

ललितबंध -लेखक रा.चि.ढेरे (ऐसी अक्षरे... मेळवीन -१२)

Bhakti's picture
Bhakti in जनातलं, मनातलं
29 Sep 2023 - 1:19 pm

सर्वत्र धर्म, संस्कृती याविषयी उथळ चर्चांना उधाण आलेले असताना.रा.चि.ढेरे यांचे ललितबंध (प्रकाशित २०१७)हे पुस्तक वाचणे म्हणजे केवळ सुखद अनुभव होता.ऋषीचे कूळ आणि नदीचे मूळ विचारू नये अशी म्हण विनाकारण आहे ,हे पुस्तक वाचतांना पटते.कारण एकंदरीत मज सारख्या मुळातून मुळाच्या शोधाची आवड असणाऱ्या वाचकाला अनेक प्रश्नांची उत्तरे मिळतात. धर्मोइतिहास वाचन अवजड भाषा असल्याने वाचनाची गोडी लागत नाही पण रा.चि.ढेरे यांचे लेखन अत्यंत सुगम आहे.
a

मुक्तकप्रकटनविचारआस्वाद

कावळ्यांची फिर्याद -२

कर्नलतपस्वी's picture
कर्नलतपस्वी in जे न देखे रवी...
8 Sep 2023 - 6:16 pm

कावळ्यांची फिर्याद
पिंपळाच्या झाडावर कावळ्यांची भरली होती सभा....
चला,चला,चला...समोर मास भादव्याचा उभा.

संतप्त सारे काक होते,काकरव आसमंती गुजंला....

पितृपक्षी दुर जाऊ,प्रस्ताव त्यांनी मांडला.

कर्म कुणाचे फळं कुणाला, का दर्भ मागे लावला ?
क्रुद्ध होऊनी प्रभूने, पूर्वजांचा एक चक्षू फोडला.

लंपट,लुब्ध,छद्मवेषी गंधर्व होता ,काकवेष धारूनी.....
हिन कर्म,पाप त्याचे,शाप आपल्या माथी गेला मारूनी.

उकळीकैच्याकैकविताकवितामुक्तक

250 वर्षांचे राष्ट्रपतीचे अंगरक्षक

पराग१२२६३'s picture
पराग१२२६३ in जनातलं, मनातलं
6 Sep 2023 - 11:53 am

PBG1

संस्कृतीकलाइतिहासमुक्तकसमाजप्रवासप्रकटनआस्वादसमीक्षालेखबातमीअनुभवविरंगुळा

"ती धावत आली आणि गच्च मिठी मारून मुका घेतला" - मराठीच्या एका भावी प्रोफेसरची कहाणी.

चित्रगुप्त's picture
चित्रगुप्त in जनातलं, मनातलं
1 Sep 2023 - 6:26 pm

"ती धावत आली आणि गच्च मिठी मारून मुका घेतला"

वाङ्मयकथामुक्तकविनोदसाहित्यिकप्रकटनअनुभवविरंगुळा

चांद्रयान तीन......स्वप्न पूर्ण जाहले

कर्नलतपस्वी's picture
कर्नलतपस्वी in जे न देखे रवी...
24 Aug 2023 - 8:25 am

चांद्रयान

देखणे ते चेहरे पंडितांचे, हिरमुसले
स्वप्न चांद्रयान, जेव्हां विखुरले
हसले फिदीफिदी, छद्मवेषी
म्हणती
नऊशे कोटी मातीत घातले.

"आर्यभट्ट,मिहीर,विक्रम का इतिहास अपना,
दधिचीसा दृढःसंकल्प,पवनपुत्रसा बल अपना
दिल ना तोडो,छप्पन इंच सिना अपना
एक सौ चालीस साथ है...'कर लो मुठ्ठीमें चांद को',
फिरसे बनाओ चांद्रयान तीन को"....

घेउन ओज,तेजःपुंज ज्ञानीयांचा,सज्ज तांडा जाहला
मिशन चांद्रयान तीनचा,पुनश्च पांचजन्य वाजला

ट्रम्पफ्री स्टाइलमुक्त कवितारोमांचकारी.कवितामुक्तक

मी पाऊस आणि कविता

मित्रहो's picture
मित्रहो in जनातलं, मनातलं
20 Aug 2023 - 9:32 pm

काही गोष्टी बदलत नाही म्हणतात ना ते खरे आहे. आता हेच बघा उन्हामुळे तापून पाण्याचे बाष्प होते. त्याचे ढगात रुपांतर होते. कुठेतरी कसातरी कमी दाबाचा पट्टा वगैरे तयार होतो आणि मग पाऊस पडतो. हा कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्यासाठी कोण कुठे काय खणतो ते माहित नाही पण तो तयार होत असतो. थोडक्यात काय पाऊस पडणे ही एक सरळ साधी नैसर्गिक प्रक्रिया आहे. दवाखान्यात उगाचच चेकअपसाठी अॅडमिशन घ्यावी इतकं हे रटाळ प्रकरण आहे.

मुक्तकविडंबनलेख

"स्वामी" तिन्ही जगाचा..... मी मात्र भिकारी

अहिरावण's picture
अहिरावण in जनातलं, मनातलं
19 Aug 2023 - 7:11 pm

माझ्या वयातल्या इतर कुणाही मुलाप्रमाणे मी सहावी किंवा सातवीत पहिल्यांदा स्वामी कादंबरी वाचली. मला हे कबुल करायला अजिबात संकोच वाटत नाही की ती कादंबरी त्यावेळी मला खुप आवडली होती. माधवरावांची एक प्रतिमा माझ्या मनात नोंदली गेली होती. कादंबरीच्या सुरवातीच्या पानावर असलेल्या इतिहासकारांच्या काही अभिप्रायामुळे शेंदराचा टीळा व्यवस्थित लागला होता. एकंदर ब्राह्मणी वातावरणात लहानपण गेल्यामुळे लावणी वगैरे अतिशय घाण प्रकार असतो त्याला टाळणे हेच उत्तम असा संस्कार असल्यामुळे कादंबरीतील माधवराव मधुन उठून जातात इत्यादी प्रसंग दाद देणारे आणि माधवराव या व्यक्तीबद्दल आदर वाढवणारे ठरले.

मुक्तकमत