विजयादशमी शुभेच्छा
कोवळी आंब्याची पानं विणली तोरणात,
पिवळी, केशरी झेंडूची फुलं ओवली दो-यात!
तयार केले भरगच्च तोरण, बांधले घराच्या दारात ,
आज दसरा ! विजयाची जाणीव जागते मनामनात !!
आपट्याचं पानं सुवर्ण म्हणून वाटून परंपरा जपतो,
अन् मैत्रीचा भाव एकमेकांच्या मनांत जागवतो !!
सर्वांना आठवणीने शुभेच्छा देऊन आनंदीत करतो,
छोट्या छोट्या अनेक गोष्टींनी नाती बांधून ठेवतो !!
