कुणीतरी, केव्हातरी, कधीतरी, कुठंतरी ...
उन्हाच्या सावलीत
सावलीतल्या उन्हात
कधीतरी वेडं मन भिजतं ना?
गप्पांच्या नादात
नादावल्या जगात
कुणीतरी गोलगोल फिरतं ना?
चहाच्या कपात
कपातल्या चहात
काहीतरी गोडगोड घडतं ना?
मनातल्या प्रश्नाचं
मनातलं उत्तर
केव्हातरी कुठंतरी मिळतं ना?
कसंतरी कुठंतरी
कुणीतरी केव्हातरी
कधीतरी प्रेमात पडतं ना?
पडतं ना?