'आवाज की दुनिया का दोस्त।'
दोन हजार आठ मधे मुंबई ला जॉईंट च्यारिटी कमिशनर (धर्मादाय सह आयुक्त)
होतो।
विविध प्रकारचे ,विविध स्तरातील लोक
कामानिमित्त भेटायचे ।
एके सकाळी निजी कक्षातला फोन वाजला। सहाय्यका ने घेतला ।
कुणीतरी
माझ्या भेटीची वेळ मागत होते ।
"आज साहेब बिझी आहेत "
सरकारी नोकरांची ही एक पध्दत
असते,
आपले महत्त्व वाढविण्यासाठी।
त्यानुसार
त्याचे उत्तर ।
नजरेनेच ,
'कोण? 'म्हणून माझी विचारणा।
अमीन सयानी ,ते रेडीओ वाले '- सहाय्यक।
क्षणभर काही कळलेच नाही।
अमीन सयानी ? द लेजैंड ?
निवेदकांचे महागुरु?
'ज्याने रेडिओ वर निवेदनाचे साम्राज्य
उभे केले,ज्याचा जादूभराआवाज
ऐकण्यासाठी ,बुधवारी ,रात्री आठला बिनाका गीतमाला ची लाखो रसीक
अतुरतेने वाट पाहायचे ,तो आवाजाचा किमयागार
माझ्या भेटीची वेळ मागत आहे
अन तू चक्क मी बिझी आहेस सांगून टाळतो आहेस।
माझी कसली वेळ देतोस ?
त्यांना कुठली वेळ सोयीची विचार,
अन बोलाव । '
(मी हे सगळं मनात )
उघडपणे मात्र उत्सुकता न दाखवता,
'आजच सोयीने या '
असे कळवले।
दुपारी चार ची वेळ ठरवली।
समोरची कामे पटापट उरकली।
कक्ष सुदैवाने टापटीप ।
तरीही आवश्यक आवराआवर।
बरोबर चारच्या सुमारास
ते आले ।
अमीन सयानी
माझ्या कक्षात ।
उठून त्यांचे स्वागत ।
हस्तांदोलन।
म्रदू ,सौम्य व्यक्तीमत्व,
छाप पाडणारे।
आवाज तोच ।
चीरपरिचीत।
"भाईयों और बहनो "
आवाज की दुनिया के दोस्तो" वाला।
खूप जुन्या
ओळखीचे कुणी भेटले अशी
भावना,मनात माझ्या।
त्यांच्या काय होत्या माहिती नाही।
त्यांचा एक ट्रस्ट होता ।
अनेक वर्षे कार्यरत
नसलेला।
नियमांची पुर्तता करण्याचे
सोपस्कार त्यामुळे दुर्लक्षित।
सरकारी खाक्या प्रमाणे,
नोटीस ,
पुर्तता न केल्याबद्दल दंड,
कारवाई च्या तंबीसह ।
'पोहचलेली' मंडळी असल्या
नोटीशींना भीक घालतनाहीत।
काही होत नाही हे पक्के ठाउक ।
यांच्या साठी मात्र हे संकटच।
ट्रस्टबिनकामाचा।अन
नसते लचांड मात्र मागे।
दंड ,शिक्षा, बदनामी ची भिती।
कायद्याशी ओळख नसल्याने हे साहाजिकच।
भित्या पाठी ब्रम्हराक्षस।
काय होईल ही
चिंता ।
माझे
मार्गदर्शन ,मदत मिळून ,यातून
सुटका करावी ही इच्छाव्यक्त केली ।
कारवाई होण्यासारखे
गंभीर प्रकरण नव्हते।
नियमात बसवून
मार्ग कसा काढायचा ते समजावून
सांगितले
संबंधित कर्मचाऱ्यांना बोलावून
सुचना दिल्या।
काही होणार नाही याची खात्री दिली।
मग
ते आश्वस्त झाले।
सुटकेचा भाव अन
हास्य चेहऱ्यावर।
मग कॉफी सोबत गप्पा ही।
ते
निवेदनातील लतामंगेशकर
आहेत असे मनापासून म्हटले
।त्यांना हे नेहमीच असणार।
हसले।
खरेच होते नं ते!
खूप बोलायची इच्छा ,पण
अज्ञान उघडे पडायची भिती ।
तरीही बिनाका पर्वाविषयी
विचारणा केली ।
बोलले।तो काळ ,
कलाकार इ.विषयी ही।
पण मुख्यत्वे,
त्या क्षेत्रातून निव्रत्तिनंतरचे
ऊपक्रमाबद्दल ।
रेकॉर्डिंग स्टुडिओ ,नवोदितांना
निवेदनाचे प्रशिक्षण ,राष्ट्रगीताला
जागतिक मान्यता ,विशेष दर्जा मिळणे साठी ते करत असलेले प्रयत्न वगैरे।
स्टुडिओला भेट देण्याचाही आग्रह केला।
आभार मानले सहकार्या बद्दल।
काही दिवसांनी त्यांच परत फोन आला।
काम झाले म्हणून,
चिंता मूक्त केले म्हणून ,
धन्यवादासाठी।
माझ्या मुलीचे लग्न होते निमंत्रण दिले।त्यादिवशी मुंबई त नसल्याने येउ शकत नाही म्हणाले ।
दिलगिरी व शुभेच्छा।
काही महिन्यांनी त्यांना पद्मश्री पुरस्कार
जाहीर झाला ।तेव्हा फोनवरुन
अभिनंदन केले ।
मी लक्षात होतो त्यांच्या नावासह।
भेटा म्हणाले।मोठेपणा त्यांचाः
छान वाटले।
माझ्या कडूनच राहून गेले भेटायचे।
ही खंत।
एका असामान्य व्यक्ती शी ही 'छोटीसी मुलाकात ' माझ्या सारखे सामान्य माणसासाठी असामान्यच!
त्यांनी आपल्या कार्यक्रमातून लाखो लोकांना काही क्षण तरी चिंतामुक्त करून
आनंदी बनवले ।
ते ऋण ,मी आपल्या परीने
थोडेफार फेडले ।
त्यांची किरकोळ चिंता दूर करुन
असे वाटले।
आनंद वाटला।
भेटी ची आठवण झाली ।
त्या आनंदाचा पुन्हप्रत्यय ।
नीलकंठ देशमुख
8308055210
nilkanth vd1@gmail.com
प्रतिक्रिया
26 Oct 2020 - 11:26 am | संजय क्षीरसागर
असं कवितेसारखं का लिहिलं जातंय ? का ही एक वेगळी स्टाईल ट्राय करतायं ?
26 Oct 2020 - 11:56 am | मराठी_माणूस
छानच संधी मिळाली तुम्हाला.
26 Oct 2020 - 12:01 pm | नीलकंठ देशमुख
हो खरेच.
26 Oct 2020 - 11:56 am | नीलस्वप्निल
नशीबवान _/\_
26 Oct 2020 - 12:02 pm | नीलकंठ देशमुख
निश्चितच नशीबवान च म्हणावे लागेल
26 Oct 2020 - 12:00 pm | नीलकंठ देशमुख
धन्यवाद.
स्टाईल वगैरे नाही.
पण ते मोबाईल वर लिहिताना ,अडचणी येतात. मग तसेच ठेवतो.
चांगले वाटत नाही का?. मग थोडे कष्ट घेऊन सरळ करायचा प्रयत्न करीन.
26 Oct 2020 - 12:13 pm | संजय क्षीरसागर
एकसंध लिहिलं जातं. अर्थात, या पोस्टमधे तरी विषेश रसभंग झालेला नाही.
26 Oct 2020 - 12:31 pm | कंजूस
आणखीही काही आठवणी असतील इतरांच्या तर वाचायला आवडतील.
26 Oct 2020 - 8:48 pm | नावातकायआहे
+१
26 Oct 2020 - 8:58 pm | नीलकंठ देशमुख
निश्चित.
26 Oct 2020 - 2:38 pm | महासंग्राम
सुंदर आठवण
26 Oct 2020 - 3:11 pm | दुर्गविहारी
खूपच सुंदर आठवण !
26 Oct 2020 - 8:58 pm | नीलकंठ देशमुख
हो. खरेच
26 Oct 2020 - 8:17 pm | शेखरमोघे
छान आठवण
26 Oct 2020 - 8:59 pm | नीलकंठ देशमुख
होय
26 Oct 2020 - 9:02 pm | सौंदाळा
हृद्य आठवण छानच सांगितली आहे.
27 Oct 2020 - 2:08 pm | नीलकंठ देशमुख
धन्यवाद
27 Oct 2020 - 12:46 pm | चांदणे संदीप
सुंदर आठवण शेअर केल्याबद्दल धन्यवाद! ___/\___
सं - दी - प
27 Oct 2020 - 2:08 pm | नीलकंठ देशमुख
धन्यवाद