स्मरणरंजन
स्मरणरंजन
रेडिओ (१)
बचपन के दिन.
माझा जन्म खेड्यातला .आडगाव. जि.बीड.
वयाच्या दहा/अकरा वर्षापर्यंत
तिथेच वाढलो.
कळायला लागल्यापासून घरी रेडिओ.
आजोबांच्या बैठकीत
एका कोनाड्यात.फिलीप्स कंपनीचा सुबक.
बॉक्स आकाराचे एवरेडी बॅटरी वर चालणारा.
ईंग्रजी नाईन चे आकड्यातून उडी मारणारी मांजर.
बॅटरी वर्षभर चालायची.
मग तालुक्याचे गावाहून (माजलगाव)दुसरी आणायची.
जुनी बॅटरी अंगणात फोडणे हा माझा कार्यक्रम.
त्यात,
पितळी पट्ट्याचे चौकटीत ,
कोळशासारख्या पदार्थाच्या टोस्ट च्या
आकाराच्या वड्या .