ढग

अनुस्वार's picture
अनुस्वार in जनातलं, मनातलं
27 Apr 2021 - 7:06 pm

कुणाच्या आयुष्याचा दोर कधी तुटेल आणि कुणावर नशीब कधी मेहरबान होईल या गोष्टी सदैव अंधाराच्या मुक्कामाप्रमाणे मानवाला अज्ञातच राहतील. परंतु असे आहे म्हणून जेवढे हाती उरते त्या आयुष्यालाच बेभरवशाचे करण्यात काय अर्थ आहे? सध्या अविश्वास आणि अस्वस्थतेने आपल्याला अशी घट्ट मिठी मारलीये की प्रत्येक श्वासावर आणि कृतीवर त्यांचा प्रभाव जाणवतो आहे. आनंद, समाधान, हास्य या नैसर्गिक भावनांचा प्रसवदर कमालीचा खालावला आहे. आपल्या मनातली स्वतंत्र विचारांची अमानुष भ्रूणहत्या कळसाला पोहोचली आहे. आपल्याला सगळं काही स्वतःचं आणि स्वतःकरिता हवं आहे केवळ विचार सोडून.

मांडणीमुक्तकसाहित्यिकसमाजप्रकटनविचारलेख

जीवनसाथी

आकाश खोत's picture
आकाश खोत in जनातलं, मनातलं
27 Apr 2021 - 6:08 pm

काही दिवसांपूर्वी इंग्लंडच्या राणीचे पती, प्रिन्स फिलिप यांचा वयाच्या ९९व्या वर्षी मृत्यु झाला. राणीचे पती असूनही त्यांना राजा नव्हे तर प्रिन्सच म्हटले गेले, तो एक वेगळाच विषय. त्यांच्या शाही इतमामात झालेल्या अंतिम संस्काराच्या कार्यक्रमाचे सविस्तर वृत्तांकन झाले. त्यात इंग्लंडच्या राणीचा कोव्हीडच्या मर्यादेमुळे इतरांपेक्षा वेगळे आणि एकटेच बसलेला फोटो पाहुन मन हेलावले. त्या राणीचे स्वतःचे वय ९५ आहे.

मांडणीप्रकटन

आमचीबी आंटी जन टेस

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जनातलं, मनातलं
26 Apr 2021 - 10:50 pm

आमचीबी आंटी जन टेस

गावात कायबी काम नव्हतं आजकाल. सगळे निसते बशेल. कोरूनामुळं नाम्याचं रसाचं गुर्‍हाळबी बंद पडेल व्हतं.
त्येच्यायच्या त्या कोरूनाच्या. सकाळ संध्याकाळचा आमच्यावाला आड्डा आसा बंद पडेल. वावरातबी कांदे काढेल व्हते, आन या येळेला भाव काय मिळाला नाय. टॅक्टरचा हप्ता घरातून द्यावा लागला, आता बोला.

या कोरूनाची आंटी जन टेस करून घ्या, आंटी जन टेस करून घ्या म्हनून मलेरीया डाक्टर आन आशाबाई गावात फिरत व्हती. मलेरीया डाक्टर लई बाराचं हाय बरं का आमच्या आरोग्य शेंटरवरचं. कायम आशाबाईला बरूबर घेवूनच फिरतं लेकाचं.

जाऊद्या, आपल्याला काय म्हना.

कथासमाजजीवनमानमौजमजाप्रकटनविचारआस्वादलेखअनुभवप्रतिभाआरोग्यविरंगुळा

फाल्गुन व.३० संभाजी राजांची हत्या!

Ashutosh badave's picture
Ashutosh badave in जनातलं, मनातलं
26 Apr 2021 - 11:08 am

आज काय घडले...

संभाजी महाराज

शके १६१० च्या फाल्गुन व. ३० रोजी छत्रपति संभाजी राजे यांची हत्या वडू (बुद्रुक ) येथे औरंगजेब याने अत्यंत अमानुषपणे केली!

इतिहास

फाल्गुन व. १३ विष्णुशास्त्री चिपळणकर यांचे निधन !

Ashutosh badave's picture
Ashutosh badave in जनातलं, मनातलं
26 Apr 2021 - 11:06 am

चिपळूणकर

शके १८०३ च्या फाल्गुन व. १३ रोजी अर्वाचीन मराठी वाङ्मयांतील प्रसिद्ध निबंधलेखक व टीकाकार विष्णुशास्त्री चिपळुणकर यांचे निधन झाले.

इतिहास

फाल्गुन व. १४ ज्ञानकोशकार केतकर यांचे निधन !

Ashutosh badave's picture
Ashutosh badave in जनातलं, मनातलं
26 Apr 2021 - 11:04 am

आज काय घडले...

फाल्गुन व. १४

ज्ञानकोशकार केतकर यांचे निधन !

शके १८१८ च्या फाल्गुन व. १४ रोजी महाराष्ट्रीय ज्ञानकोशकर्ते, समाजशास्त्रज्ञ, संशोधक आणि नवविचारप्रवर्तक पंडित डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर
यांचे निधन झाले.

इतिहास

धारूर, धर्मापुरी आणि अंबेजोगाई - १

एक_वात्रट's picture
एक_वात्रट in भटकंती
25 Apr 2021 - 9:03 pm

या वर्षी २६ जानेवारी मंगळवारी येत असल्याचं कळताक्षणीच मी २५ जानेवारीची सुट्टी टाकून दिली. मी सुट्टी टाकताच, या चार दिवसांत आपण बार्शीला (तिच्या माहेरी) जात आहोत असं बायकोनं जाहीर करून टाकलं. आता बार्शीला जातोच आहोत तर आजूबाजूचं एखादं ठिकाण पदरात पाडून घ्यावं असा सूज्ञ विचार मी केला आणि इंटरनेट धुंडाळायला लागलो. राज्यात कुठलीही घटना घडली की विरोधी पक्षनेते आपल्याला या घटनेचा फायदा कसा करून घेता येईल याचा शोध घ्यायला लागतात, तसाच मी कुठे जायचं असेल तर आजूबाजूला काय पाहता येईल याचा शोध घ्यायला लागतो. मी ट्रेकक्षितिजची वेबसाईट उघडली आणि माहिती काढू लागलो.