मल्याळम सिनेमाशी माझी ओळख

केदार भिडे's picture
केदार भिडे in जनातलं, मनातलं
2 May 2021 - 9:51 pm

पुण्यात NFAI च्या कृपेने अनेक परकीय भाषांतील आणि अनेक देशांतील चित्रपट बघायला मिळाले. अन्य देशांचे दूतावास वैगेरे NFAI येथे २-३ दिवसांचे त्यांच्या देशातील चित्रपटांचे महोत्सव अगदी मोफत आयोजित करत. युरोपिअन चित्रपट महोत्सवही सलग २ वर्षे मला बघायला मिळाला. तिथे महोत्सवाची माहिती देणारी छोटी पुस्तिका किंवा पत्रक मिळायचे. अशी मला मिळालेली पत्रके मी जपून ठेवली आहेत. नंतरही ऑस्करच्या परदेशी भाषेतील चित्रपट या वर्गात नामांकन मिळालेले चित्रपट शोधून शोधून पाहत राहिलो. भारतीय भाषांतील चित्रपटांकडे (हिंदी आणि मराठी सोडून) माझे साफ दुर्लक्ष झाले आहे.

चित्रपटशिफारस

पुस्तक परिचय - फुले आणि मुले

चांदणे संदीप's picture
चांदणे संदीप in जनातलं, मनातलं
2 May 2021 - 8:02 pm

लॉकडाऊनसारख्या नीरस काळात घरात बसून काय करावे हा प्रश्न दर दोन दिवसांनी वळवाच्या पावसासारखा गडगडत धावत येतो. घरातली कामे, पाककृतींचे प्रयोग, मुलांसोबत खेळ-मनोरंजन, चित्रपट या सगळ्यांचाही काही काळानंतर तिटकारा येतो. घरातली पुस्तकेही परत परत वाचून झालेली असल्यामुळे ती हातातही धरवत नाहीत. काय नवीन करायचं हा प्रश्न सतत छळत असतो. माझंही आजच्या रविवारी असंच झालं. अशातच एक पुस्तक हाती आले. आचार्य अत्रे यांचे "फुले आणि मुले." नावावरूनच लक्षात येतं की हे पुस्तक लहान मुलांसाठी आहे.

वाङ्मयकथाबालकथासाहित्यिकप्रकटनआस्वादलेखशिफारसविरंगुळा

धारूर, धर्मापुरी आणि अंबेजोगाई - २ (अंतिम)

एक_वात्रट's picture
एक_वात्रट in भटकंती
2 May 2021 - 6:56 pm

अंबेजोगाई - धर्मापुरी रस्ता सिमेंटचा बनत असला तरी रस्त्याचे काम ब-यापैकी झालेले आहे. एका तासात आम्ही धर्मापुरीला पोहोचलो. किल्ला गावाच्या मध्यभागी, थोड्या उंचीवर आहे. खरंतर याला किल्ला न म्हणता गढीच म्हणणं योग्य ठरेल. मी आत्तापर्यंत पाहिलेल्या किल्ल्यांपैकी हा सगळ्यात छोटा किल्ला असावा.

आभार

विनायक प्रभू's picture
विनायक प्रभू in जनातलं, मनातलं
2 May 2021 - 11:30 am

नमस्कार, सतत दर ३०सेकंदाला कानावर पडणार्‍या 'ब्रेकींग न्यूज' ने सुन्न झालेल्या मनाला काहीतरी दुसरा विषय द्यावा म्हणून अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी अमेरिकन काँग्रेस समोर दिलेल्या भाषणाची प्रत काल वाचायला सुरुवात केली. ते त्यांच्या राष्ट्रीय नेत्यानी दिलेले भाषण अशीच भूमिका मनात असल्याने वाचताना थोडा सैलावून वाचत होतो. अचानक एक ओळखीची वाचावी अशी फ्रेज 'a once-in-a-generation investment' डोळ्यासमोर आली आणि मी भारतात परत आलो. आरोग्य -शिक्षण -रोजगार या क्षेत्रातल्या येऊ घातलेल्या काही बदलांबद्दल पुढे बरेच काही लिहिले होते पण मला हे नक्कीच जाणवले की हे आपल्याला काही नवे नाही.

धोरणप्रकटन

प्रमाद

चंद्रकांत's picture
चंद्रकांत in जनातलं, मनातलं
2 May 2021 - 11:21 am

वर्तमानाला फक्त प्रयासांच्या परिभाषा अवगत असतात. प्रयत्नांच्या वाटेवर पडलेल्या पावलांच्या पदरवास तो प्रतिसाद देतो. असं असलं तरी सगळ्यांनाच त्याला साद घालणे जमते असे नाही. काळाचे हात धरून चालणे जमले, तरी जुळवून घेणे जमेलच याची शाश्वती नसते. कळत-नकळत काहीतरी घडतं-बिघडतं अन् मांडलेला खेळ मोडतो. उन्हाच्या झळांनी माळाचं हिरवंपण हरवून जावं अन् बहरलेलं झाड डोळ्यादेखत वठून जावं, तसं सगळं शुष्क होत जातं.

समाजविचारलेख

‘आदिम तालाचं संगीत’ (“Melodies with a Primitive Rhythm”)

डॉ. सुधीर राजाराम देवरे's picture
डॉ. सुधीर राजार... in जनातलं, मनातलं
1 May 2021 - 1:44 pm

- डॉ. सुधीर रा. देवरे

“Melodies with a Primitive Rhythm” व ‘आदिम तालाचं संगीत’ ही दोन्ही पुस्तके चेन्नईच्या नोशन प्रेस प्रकाशनाकडून नुकतीच प्रकाशित झालीत, त्या निमित्ताने हा लेख:

वाङ्मयलेख

जपून ठेव!

अनुस्वार's picture
अनुस्वार in जे न देखे रवी...
1 May 2021 - 12:08 am

मी जरा बाहेर जातोय
माझे शब्द जपून ठेव.

काही तुला आवडलेले
काही मुद्दाम न वाचलेले.
रात्रीचे, पहाटेच्या स्वप्नांतले
बोललेले आणि अबोल राहिलेले.

अर्थाच्या शोधात पडू नको
तो मलाही लागत नाही.
आता शब्दही तुझेच आहेत
माझा कोरा कागद पतंग व्हायचं म्हणतोय.

अलगद हाताळ या शब्दांना
मुलायम असले तरी घावही घालतात.
दिसत नाहीत नेहमीच पण असतात जरूर
अश्वत्थाम्याप्रमाणे शब्दांनाही शाप आहे अमरत्वाचा.

अव्यक्तआयुष्यजीवनकविता

सवय

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जे न देखे रवी...
30 Apr 2021 - 8:43 pm

साखरझोपेच्या डोळेजड सीमेवरून
हाकारणार्‍या अनघड कल्पनांची
वास्तवाच्या धगीत
कापूरवाफ होताना बघण्याची
आता सवय करून घेतोय

मास्कावगुंठित श्वासात
अवकाळी पावसाचा विषण्ण मृद्गंध
ऊरफोड भरून
पाऊसगाणे गाण्याची
आता सवय करून घेतोय

हताशेच्या महासाथीची "न"वी लाट
सकारात्मक विचारांच्या प्लासिबोने
नेस्तनाबूत होईलच
हे स्वत:ला वारंवार पटविण्याची
आता सवय करून घेतोय

मुक्त कविताकवितामुक्तक