सध्या मी काय पाहतोय ? भाग ५
समांतर :- सुहास शिरवळकर यांच्या पुस्तकावर [ कादंबरी ] आधारित ही मराठी आणि हिंदीत असलेली वेब सिरीज एक मास्टर पीस आहे. मी ही पहिल्यांदा हिंदीत आणि नंतर मराठीत पाहिली. मला मराठीत ही वेब सिरीज अधिकच जास्त आवडली. कुमार महाजन आणि चक्रपाणी यांच्या आयुष्या बद्धल असलेली ही सिरीज तुम्हाला खिळवुन ठेवते. दोन वेगळे व्यक्ती परंतु हस्तरेखा मात्र सारख्याच असणार्या या व्यक्तींचे आयुष्य अगदी समांतर चालत असते. हा चक्रपाणी नक्की कोण ?आणि त्याच्या आयुष्यात काय घडलय ? त्याचा कुमार महाजनशी कसा आणि काय संबंध आहे ?