साजणी आता इथे...
साजणी आता इथे तू एकदा येऊन जा
सांजवाती सांजवेळी तू इथे लावून जा.
बहरली ही बाग सारी, बघ फुले फुलली किती
फुललेली ही फुले केसात तू माळून जा.
माळता केसात सुमने गगन हे गंधाळले
गंध केसातील सारा या इथे उधळून जा.
एकदा माझ्या घरी प्रीत गंध उधळित ये
एकदा माझ्या मनी प्रीत तू गोंदून जा.
