'तेरी केहॆके लुंगा' भाग 2
ऍडमिट झाल्यावर रेक्टरनी घरी कळवले. काळजी घ्यायला मित्र होते. आई रेक्टर ला फोन करून बोलली की मी 6-7 दिवसांनी येते. तो पर्यंत त्याच्या मावस भावांना पाठवते. दुसऱ्या दिवशी भाऊ हजर. जास्त कोणाला सांगू नका ही ताकीद मी दिलेलीच. पाहिले काम त्यांनी केले न्हावी आणि फेस मसाज वाल्याला बोलावले. जरा बरा दिसायला लागलो मी. डोक्यात राग बराच होता
इकडे हिचा भाऊ आणि त्याचे 4 मित्र लपून बसलेले .
काही खबर नव्हती. हेयर लाईन क्रॅक आणि जखमा भरून निघाल्यावर आठवड्या नंतर डिस्चार्ज मिळाला. इकडे वेगळेच नाटक रंगले होते.