"इंटरेस्ट"
उद्योजक असताना ब्यांके कडूनं कर्ज घेतले..नियमाप्रमाणी क्वारट्रली "ईंटरेस्ट" चा हप्ता खात्यात डेबिट पडला.
यावर गमतीने समोरच्या ऑफिसरला म्हणालो.."इंटरेस्ट" कमी करा राव परवडत नाही..
यावर तो हसून म्हणाला ब्यांक म्हणजे सावकार व सावकार व्याज कधीच सोडत नाही भले एक दिवसाचे का असेना..
या वर त्याने एक गोष्ट सांगितली..
नाईक म्हणून पुण्यात प्रख्यात सावकार होते..सोन्याचे जानवे घालायचे ते ....गडगंज आसामी व पेंढी होती..
पेशव्यांना पण वेळ प्रसंगी ते कर्जाऊ रकमा देत असत..
एकदा अचानक पेशव्यांना पैशाची गरज लागली... खंडणी वसुलीसाठी स्वार शत्रू पक्षाकडे गेले होते.