डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान सभेतील शेवटचे भाषण..२

अक्षय१'s picture
अक्षय१ in जनातलं, मनातलं
31 May 2016 - 9:14 pm

ज्या संविधानात आपण लोकांचे, लोकांकरिता निवडलेले शासन या तत्त्वाचे जतन केले आहे ते जर आपल्याला सुरक्षित ठेवायचे असेल, तर आपल्या मार्गात कोणते अडथळे येणार आहेत ते आपण ओळखले पाहिजेत, की जेणेकरुन लोकांनी निवडून दिलेल्या सरकारच्या तुलनेत लोकांसाठी असलेल्या सरकारला लोक प्राधान्य देण्याकडे वळतील. यासाठी पुढाकार घेण्यात आपण दुर्बल ठरता कामा नये. देशाची सेवा करण्याचा हाच एकमेव मार्ग आहे. दुसरा अधिक चांगला मार्ग मला माहीत नाही.

टीपः वरील भाषण संपादित स्वरुपात आहे.
(स्रोत: डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे, खंड १८, भाग ३- १९४६ ते १९५६)

इतिहाससमाजविचार

प्रतिक्रिया

गॅरी ट्रुमन's picture

31 May 2016 - 9:16 pm | गॅरी ट्रुमन

मस्त

मस्तच. शाळेत असताना मराठीमध्ये "भारतात लोकशाही नांदो" हा धडा होता त्यात डॉ. आंबेडकरांच्या भाषणातला बराच भाग होता त्याची आठवण झाली.

तरीही एक मुद्दा:

यावर तुमचे भाष्य केले असतेत तर चांगले झाले असते. म्हणजे डॉ. आंबेडकरांनी हे भाषण नोव्हेंबर १९४९ मध्ये केले होते. त्याला अनेक दशके उलटलेली आहेत. त्या भाषणात त्यांनी मांडलेले मुद्दे आजच्या काळालाही कसे लागू पडतात किंवा अशा कुठल्यातरी मुद्द्यावर तुमचे भाष्य केले असतेत तर ते अधिक चांगले झाले असते. कारण हे भाषण गुगलून सहज मिळू शकते. तेव्हा नुसते ते भाषण देण्यापेक्षा त्यावर तुमचे भाष्य असते तर ते चांगले झाले असते.

अक्षय१'s picture

31 May 2016 - 9:51 pm | अक्षय१

धन्यवाद .प्रतिक्रिया आणि सल्ल्यासाठी .पुढच्या लिखाणात मी प्रयत्न करीन .

अर्धवटराव's picture

1 Jun 2016 - 3:35 am | अर्धवटराव

समग्र बाबासाहेब आवर्जुन अभ्यासले पाहिजे. त्यांची भाषणं संस्थळावर आणल्याबद्दल धन्यवाद अक्षय राजे.

बाबासाहेबांचे काहि विचार पटत नाहित. पण तसं स्पष्ट सांगण्याची मुभा बाबासाहेबांमुळेच मिळाली आमच्यासारखांना. हे त्यांचे माझ्यावर फार मोठे उपकार आहेत.