अभियांत्रिकीचे दिवस- भाग १
इसवी सन: २००६-०७
आता ह्यात मुख्यतः 'महाराजा'च्या टेरेसवर सुरुवात केलेल्या चतकोर बीअरपासून पुढे खंबे पालथे घालण्यापर्यंत सुसाट वेगानं झालेल्या प्रवासाबद्दलच लिहावं लागेल.
आणि तो विषय हार्ड होईल.. म्हणून ते नको.
तर अभियांत्रिकीच्या दिवसांबद्दल लिहायचं तर लेक्चर्स, प्रॅक्टिकल्स सोडून बाकीच्या गोष्टींबद्दलच लिहावं लागतं.
हे असं होतंच म्हणजे.
काही इलाज नव्हता त्याला.
कारण प्रत्येक सेमिस्टरच्या शेवटी प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये सामुदायिक थापेबाजीचा, किंवा तोंडात सामूहिक गुळणी धरून इज्जत काढून घ्यायचा एक महोत्सव भरायचा, ज्याला ते लोक 'ओरल्स' म्हणायचे...