रेसीपी ऑफ ग्लास ट्रेसिंग ऊर्फ GT
हे भगवन्, ह्या एवढ्या सगळ्या शीट्सची नुसती नावं ऐकूनच माझे टाके आणि गात्रं ढिली व्हायला लागली आहेत...आता मी कसं करावं भगवन् ??
हे अर्जुना sss थांब.. असा भ्रमित होऊ नकोस..!
आता तू तयार आहेस.. आणि म्हणूनच मी GT चं परमगुह्यज्ञान तुझ्यासारख्या सगळ्या होतकरूंच्या झोळीत टाकतो आहे..ज्याच्या मदतीनं तू हा सबमिशन्सचा भवसागर तरून जाशील, अशी नितांत श्रद्धा बाळग.
अब आगे..!
# रेसीपी ऑफ ग्लास ट्रेसिंग ऊर्फ GT
*** साहित्य: बल्ब,स्वीच,टेबल,एक्सटेंशन बोर्ड, जाडजूड पुस्तके, बर्यापैकी लांबरूंद अखंड अशी स्वच्छ ग्लास, दोन ड्रॉईंग शीट्स, पेन्सिल,स्केल आणि खोडरबर.
***कृती:
प्रथमतः पुस्तकांचे एकावर एक असे दोन सेट टेबलवर रचून ठेवावे. त्यांच्यामध्ये बल्ब चालू करून ठेवावा.
मग त्या बल्बच्या वरती, थोडं अंतर राहील,अशा पद्धतीने ग्लास पुस्तकांवर रेस्ट करावी.
मग त्या ग्लासवर कुणीतरी कंप्लीट केलेली शीट अंथरून ठेवावी.
आणि त्या शीटवर आपली कोरी शीट ठेवावी.
दोन्ही शीट्सचे कोपरे तंतोतंत जुळवावे.
त्या शीट्स बरोब्बर एकाखाली एक येतील, अशा पद्धतीने, त्यांना पिन लावून फिट करून टाकावे.
***तत्व:
''बल्बचा उजेड ग्लासमधून आणि दोन्ही शीट्स मधून आरपार ट्रान्समीट होतो'', ह्या फिजिक्सच्या प्रिन्सिपलचं practical application आता लगेच आपल्या डोळ्यांना दिसेल.
खालच्या कंप्लीट झालेल्या शीटवरचा सगळा कंटेंट, तुम्हाला कोर्या शीटवर आपोआप पाझरताना दिसायला लागेल (आणि पहिल्यावहिल्या वेळी तुम्ही चकीत व्हाल.)
मग वरून झुकून कोर्या शीटवर लक्षपूर्वक फोकस करावं.
पेन्सिल आणि स्केल घेऊन हळूहळू 'आपल्या' कोर्या शीटवर खालच्या शीटवरच्या ड्रॉइंगच्या बरहुकूम गिरवायला सुरुवात करावी.
कोर्या शीटच्या कुठल्याही एका कोपऱ्यापासून सुरुवात करून, हळूहळू खालची आख्खी शीट जशीच्या तशी कॉपी करावी.
बिल्डींग्जचे प्लान्स, इलेवेशन्स, सेक्शन्स, सगळे व्हर्टीकल- हॉरीझोंटल डाइमेन्शन्स, सिम्बॉल्स, अॅब्रीवेशन्स... सगळं कॉपी मारावं.
काही म्हणजे काही सोडू नये.
पण नंतर शीट्स बाजूला घेऊन आपल्या शीटवर 'स्वत:चंंच' नाव आणि रोल नंबर टाकावा..
कारण कधीकधी एखाद्या प्रतिभावंत कलावंताकडूनसुद्धा तंद्रीमध्ये 'खालचंच' नाव गिरवलं जाण्याचा संभव असतो..!
अजून एक प्रीकॉशन म्हणजे, ट्रेसींग झाल्यावर आपल्या शीटच्या मागच्या बाजूला, काळसर अस्पष्ट असे पेन्सिलचे मार्कींग्ज उमटलेले असतात.
एखादा खवट एक्झामिनर तेवढ्यावरूनच ओळखून तुम्हाला हाकलून देऊ शकतो किंवा चारचौघांत पुरेशी आब्रू काढू शकतो.
म्हणून GT मारल्याचा तेवढा पुरावा न विसरता चांगल्या स्वच्छ खोडरबरने नष्ट करून टाकावा.
(GT ओळखू येऊ नये म्हणून, अजूनही काही अत्यंत crucial गोष्टी, काही अनुभवसंपन्न आणि 'पोहचलेल्या' लोकांनी सांगून ठेवलेल्या आहेत, पण ते तू टक्के-टोणपे खाल्ल्यावर स्वत:च शिकशील तर बरं होईल, हे पार्थाss..!)
आणि शेवटी अशा खूप सार्या शीट्सच्या GT मारून, त्यांचं सुबक पंचिंग करून, आपण स्वत:च पूर्ण सेमिस्टरभर कंबरडं मोडेपर्यंत मेहनत घेऊन काढलेल्या आहेत, अशा चोरून दूध पिऊन माजलेल्या बोक्यासारख्या साळसूद अविर्भावानं, डुलत डुलत चेकींगला जावं.
***निष्कर्ष:
अशा रीतीने स्वत: ड्राफ्टर, ड्रॉईंग बोर्ड, रेफरन्सची डिझाईनची पुस्तकं, सगळी calculations करून करून, काढायला १५-२० दिवसही पुरले नसते..
त्या शीट्सची भेंडोळी तुम्ही GT च्या मदतीनं अवघ्या एक-दोन दिवसरात्रीत खतम करू शकता...!
वर्गीकरण
प्रतिक्रिया
हाहाहा
व्वा, मस्त खुसखुशीत लिहिलंय !
@राजेंद्र मेहेंदळे, चौथा
आपल्या देशातली कुत्र्याच्या
हम्म
बरेच दा
मजेशीर आहे एकदम, इंजिनियरच्या
हॉस्टेल & नोट्स ; एक मजेशीर
हि त्याच्याकडून नोट्स विकत
एकदा रात्री 11 ला क्लच
Section view चे hatching
मास्तर लोक पण
हॅ हॅ हॅ . . .
खुमासदार वर्णन
आम्ही प्लास्टिकच्या बादलीत बल्ब ठेवायचो.
हीही
पाटील सर आपण engineering
मध्ये* here * = typo.
तान्त्रिक शिक्षण प्रवासातल्या