विनोद हे अतिउत्साहाचे फलित आहे.सोप्या शब्दात आनंद, खोडकरपणा यांचा भावनावेग वाढला की विनोदनिर्मिती होते. भारतात याचे प्रमाण जास्त आहे. म्हणूनच टीकटॉकचे सर्वाधिक वापरकर्ते हे भारतात आहेत. भारतात वैज्ञानिक/तांत्रिक संशोधनाचे प्रमाण कमी आहे पण विनोदी चित्रपटांची संख्या मात्र भरपूर आहे.भारतातल्या कोणत्याही भाषेत बनणार्या सिनेमांमधे विनोदी सिनेमांची संख्या ही लक्षणीय असते. व्हॉटसअॅपवरसुद्धा नवीन काही उपयुक्त शिकण्यासंबंधी समूह असेल तर तिथे लोकांना वेळ फार कमी असतो पण तेच जोक्स, मेमे,विनोदी gif, स्टीकर हे मात्र विनाविलंब फॉरवर्ड केले जातात. कारण हॅ हॅ हॅ हू हू हू करायला फार श्रम पडत नाहीत.काय साध्य होतं अशा हॅ हॅ हॅ हू हू हू मधून? खरंतर काही क्षणांची करमणूक ही समजण्यासारखी आहे पण सतत त्याच ट्रान्समधे राहणं हे मात्र नुकसानकारक आहे.विनोदामुळे वेळेचा अपव्यय होतो.विनोद न केल्याने आजपर्यंत कोणाला अॉफिसात साहेबांचा अोरडा खावा लागल्याचे उदाहरण नसावे पण कामाबाबत गंभीर नसल्यास किंवा अंडर पर्फॉर्मर असेल तर मात्र साहेबांची खप्पामर्जी झाल्याची किंवा नोकरीवरुन काढल्याची उदाहरणे बरीच आहेत.
प्रतिक्रिया
28 Aug 2020 - 8:52 pm | Nitin Palkar
खरंतर काही क्षणांची करमणूक ही समजण्यासारखी आहे... ...विनोदामुळे वेळेचा अपव्यय होतो. पाहिलं वाक्य जेवढे योग्य आहे तितकेच, दुसरं वाक्य अयोग्य वाटतंय.--- वै म.
श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, चिं. वि. जोशी, आचार्य अत्रे, द. मा. मिरासदार, रमेश मंत्री आणि इतर अनेक आणि पु. ल. देशपांडे या सर्वांचे साहित्य अद्याप का वाचलं जातं... याच कारण ते ते स्ट्रेस बस्टर असतं.
हा गेल्या तीन पिढ्यांचा अनुभव आहे.
---चांगल्या विनोदी साहित्याचा चाहता
29 Aug 2020 - 11:49 am | उपयोजक
आपल्या क्षमता आणि भोवतालची परिस्थिती यांचे गणित जुळले नाही की मग ताण येतो.
यावर उपाय म्हणजे ते गणित सोडवण्याचा प्रयत्न करणे, परिस्थिती बदलणे शक्य नसेल तर विचारांमधे आवश्यक ते बदल करणे.
विनोदी साहित्य वाचल्याने समस्या सुटेल का? तर नक्कीच नाही.पण वेळ मात्र नक्कीच खर्च होईल.हाच वेळ समस्या सोडवण्यासाठी देता येईल की!
29 Aug 2020 - 12:05 pm | Rajesh188
एकादी समस्या सोडवण्यासाठी आयुष्यातील आनंदाच्या क्षणांची आहुती द्यावी लागत असेल तर ती समस्या सुटून तरी काय फायदा.
आयुष्यभर समस्या कधीच संपत नाहीत.
उलट कधी बोलावणं येईल ह्याचा काही अंदाज नाही.
सर्व राहीचे इथेच
28 Aug 2020 - 9:06 pm | बोलघेवडा
विनोद म्हणण्यापेक्षा थिल्लरपणा किंवा उथळपणा असा शब्द जास्त योग्य ठरेल.
28 Aug 2020 - 9:38 pm | प्रसाद गोडबोले
सोडा , गंभीर चर्चा , हे पहा =))))
28 Aug 2020 - 9:46 pm | प्रसाद गोडबोले
My Whole Life is Full of Jokes =))))
29 Aug 2020 - 2:04 am | वीणा३
बापरे, काही लोक खरंच खूप गंभीर असतात. कोणी हसण्यात आपला वेळ वाया घालवत असेल तर दुसऱ्या कोणाला नक्की काय समस्या आहे (तुमच्या वर त्याच्या खर्चाची जबाबदारी नसेल तर हे गृहीत धरून).
<<विनोद न केल्याने आजपर्यंत कोणाला अॉफिसात साहेबांचा अोरडा खावा लागल्याचे उदाहरण नसावे पण कामाबाबत गंभीर नसल्यास किंवा अंडर पर्फॉर्मर असेल तर मात्र साहेबांची खप्पामर्जी झाल्याची किंवा नोकरीवरुन काढल्याची उदाहरणे बरीच आहेत. >>
याच्या विरुद्ध वाक्य "भरपूर हसल्याने कोणाला हार्ट ऍटेक आल्याचं उदाहरणं नसावं पण फार आयुष्यात एकूणच जास्त गंभीर असल्यामुळे आत्महत्या केल्याची किंवा जास्त ताण, त्यामुळे जास्त बी. पी. आणि लवकर वयात हार्ट ऍटेक ने मेल्याची उदाहरणं बरीच सापडतील कदाचित"
हे गंभीरपणे वाचलंत तरी चालेल, कारण आजकाल ही सत्य परिस्थिती होत्ये हळू हळू.
29 Aug 2020 - 12:02 pm | उपयोजक
<<आयुष्यात एकूणच जास्त गंभीर असल्यामुळे आत्महत्या केल्याची किंवा जास्त ताण, त्यामुळे जास्त बी. पी. आणि लवकर वयात हार्ट ऍटेक ने मेल्याची उदाहरणं बरीच सापडतील कदाचित">>
समस्या न सुटल्याने ताण येतो.समस्या कोणतीही असू शकते. पुरेसे पैसे न मिळणे ,पैशांची वसुली वेळेवर न होणे, सेल्सचा ताण, हाताखालचे कर्मचारी न जुमानणे, मुले न ऐकणे, जोडीदारासोबत विसंवाद अगदी काहीही कारणे असू शकतात. या समस्या न सुटल्याने ताण येतो.गंभीर असल्याने ताण कसा येईल?
मला गंभीरता म्हणजे कपाळाला आठ्या घालणे,चिंताग्रस्त होऊन कुढत राहणे असे म्हणायचे नाहीये.
समस्येला किरकोळ न समजणे आणि ती सोडवण्याचे सर्वतोपरी प्रयत्न करणे असे म्हणायचे आहे.
या प्रक्रियेत विनोद वेळ वाया घालवतो.
29 Aug 2020 - 2:15 am | Rajesh188
तुमचे मन प्रसन्न नसेल,स्वभाव खेळकर नसेल,तुमच्या जीवनात आनंद च नसेल तर 30 वर्ष वयातच म्हातारे व्हाल.
Gambhir स्वभावाची व्यक्ती समाजात प्रिय नसते.
ती लोकात सहज मिसळू शकत नाही.
ते अनेक लोकांशी जिव्हाळा चे संबंध निर्माण करू शकत नाहीत.
कामात यश येण्यासाठी तुम्हाला माणसात मिसळता आले पाहिजे.
गंभीर काम ऐक्क काम ही लोक यशस्वी होवू शकत नाहीत.
त्यांच्या बाजूला राहणारा पण त्यांना ओळखत नाही.
29 Aug 2020 - 12:20 pm | उपयोजक
भारतासारख्या देशात माणसापेक्षा पैशाला जास्त महत्त्व आहे. रग्गड पैसा मिळवण्यात यशस्वी असणार्या व्यक्तीचे सगळीकडे कौतुकच होते. हे कौतुकच त्याला आनंदी बनवते.
कामाबाबत गंभीर असणारी व्यक्तीच रग्गड पैसे मिळवेल ना?
शिवाय हेच पैशाचे आमिष बर्याच जणांना कामासाठी उद्युक्त करते. मग त्या कामाचे पैसे देणारा माणूस स्वभावाने गंभीर किंवा अखडू असला तरी फरक काय पडतो? शेवटी मतलब पगाराशी,मिळणार्या पैशांशी.भारताची लोकसंख्या १३५ कोटी आहे. हवे तसे लोक मिळण्यात कितीशा अडचणी येतील?
29 Aug 2020 - 11:07 am | प्रकाश घाटपांडे
नाही पटत. तुमच्या लाईट मूड मधे विनोद हा प्रकार आनंद देतो. तसेच जे प्रबोधन गांभीर्याने होण्याची शक्यता नसते ते विनोदातून होते. विनोद हे योग्य रितीने वापरले तर परिणामकारक हत्यार आहे
29 Aug 2020 - 12:29 pm | उपयोजक
थट्टा,चेष्टा, टोमणे ही विनोदाचीच अंगे अाहेत. यांमुळे प्रबोधन होत असेलही.पण ते आपली थट्टा होऊ नये,आपल्याला कोणी हसू नये,टोमणे मारु नयेत या काळजीपोटी. असे बदल आपले व्यक्तिमत्व सुधारावे किंवा समाजसुधारणेला आपणही हातभार लावावा या उद्देशाने होत नाहीत. आपले हसू टाळण्यासाठी केले जातात. दामटून होतात. काही वेळा ही थट्टा जीवावर बेतू शकते. करणार्याचा जीव धोक्यात येऊ शकतो. सूडाची वात पेटवू शकतो.
29 Aug 2020 - 11:45 am | टर्मीनेटर
स्वभाव आणि करमणुक ह्या दोन्ही गोष्टी व्यक्तीसापेक्ष आहेत.
लेखात त्यांची सरमिसळ होउन “ विनोदापेक्षा गंभीरता अधिक फायद्याची असते.” असा निष्कर्ष निघत असेल तर त्यच्याशी संपुर्ण असहमत आहे.
शिवाय गंभीरतेमुळे होणारे ‘अधिकच फायदे’ नेमके कोणते ह्याचाही काही उलगडा लेख वाचून झाला नाही.
29 Aug 2020 - 12:14 pm | टीपीके
+१
29 Aug 2020 - 12:31 pm | उपयोजक
गंभीरतेमुळे वेळ वाचतो आणि विनोदामुळे वेळ वाया जातो.वेळ वाचणे हाच सर्वात मोठा फायदा!
29 Aug 2020 - 12:09 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गंभीरतेपेक्षा खेळकर, नर्मविनोदी स्वभाव आयुष्य सुखी करतात.
बाकी चालु द्या.
-दिलीप बिरुटे
29 Aug 2020 - 12:50 pm | रातराणी
अरे देवा! काय करायचं आहे एवढा वेळ वाचवून?
काही काही व्हाट्सअप्प विनोद भारी असतात.. मजा येते लोकांची कल्पकता पाहून :)
29 Aug 2020 - 1:24 pm | टर्मीनेटर
तो वाचवलेला वेळ कुठे खर्च करावा ह्यावर गांभीर्याने विचार करण्यासाठी वेळ मिळावा म्हणुन असेल कदाचीत :)
29 Aug 2020 - 2:07 pm | दुर्गविहारी
असले फालतु धागे काढुन आपला आणि ईतरांचा वेळ वाया घालवण्यापेक्षा तो वेळ समस्या सोडवण्यात का नाही घालवला ? मुळात ज्याला समस्या आहेत, तो त्या सोडवण्यासाठी विचार करतच असतो. कदाचित एखादा छान विनोदी कार्यक्रम बघुन थोडा बदल झाल्यास विचाराला अजून चालना मिळून समस्या सुटायला मदतच होईल. सारखे आम्लपित्त झाल्यासारखे तोंड वाकडे करुन बसून आणि तीच तीच डोकेफोड केली तर समस्या सुटते हा शोध कधी लागला ? उलट मस्त हसावे, खेळावे आणि आल्या समस्यांना हसत हसत तोंड द्यावे. समस्या या आयुष्यभर येतच असतात.अडचणी नाहीत असा मनुष्य दाखवा.तुमचा मुद्दा जर पैशाचा आहे,तर कितीतरी श्रीमंतानी आत्महत्या केल्यात त्याचे उत्तर काय देणार ?
29 Aug 2020 - 2:53 pm | उपयोजक
पर्याय आहेच.तो वापरुन पहावा.
रच्याकने २०१४ पासून मोदीद्वेष्टे सतत राग राग करताहेत मोदींचा. २०२४ ला देखील मोदीच परत येतील. मग मोदीद्वेष्टे अजून चिडतील.त्यांना हा "मस्त हसावे, खेळावे आणि आल्या समस्यांना हसत हसत तोंड द्यावे" हा पर्याय सुचवायला हवा.
29 Aug 2020 - 6:38 pm | दुर्गविहारी
इथे मोदींचा काय संबंध आह? कि कोणतेही धुणे कोठेही धुवाव?? धाग्याच्या विषयाला अनुरूप प्रतिसाद दिला आहे. मी मोदीद्वेष करेन नाहीतर चमचेगिरी त्याचा इथे काही संबंध आह??
29 Aug 2020 - 6:57 pm | उपयोजक
कोणा एकाचे नाव घेऊन लिहिलेला नाही. तुमचे तर नाहीच नाही.
मोदी द्वेष करणार्यांना इतकेही कळत नाही की त्यांच्या त्राग्याने मोदी काही जाणार नाहीत.त्यामुळे त्रागा होत असलेल्या सर्व मोदीद्वेष्ट्यांसाठी हा प्रतिसाद आहे. परिस्थिती बदलता तर येणार नाही पण तुम्ही सुचवलेला उपाय "हसत खेळत मस्त जगावे" हा सल्ला मात्र मोदीद्वेष्ट्यांना नक्की उपयोगी ठरेल. सदर धागा फालतू आहे हे तर तुम्ही पहिल्याच वाक्यात सांगितले आहे. कदाचित तुम्ही सुचवलेला उपाय उपयोगाला येईल.
29 Aug 2020 - 2:57 pm | कानडाऊ योगेशु
विनोद हा खरेतर गांभीर्याने घ्यायची गोष्ट आहे. ;)
कुणाला रडवायला जास्त कष्ट करावे लागत नाहीत पण एखाद्याला हसवायचे असेल तर फार प्रयत्न करावे लागतात.
>>विनोद न केल्याने आजपर्यंत कोणाला अॉफिसात साहेबांचा अोरडा खावा लागल्याचे उदाहरण नसावे
योग्य जागी व योग्य वेळी योग्य विनोद केल्याने कार्यालयीन ताण कमी झाल्याची अनेक उदाहरण आहे.
अत्रे जेव्हा होतकरु शिक्षक होते व एका कॉलेजमध्ये नोकरीवर नुकतेच रुजु झाले होते. एके दिवशी एका वर्गात त्यांना प्रथमच शिकवायला जायचे होते. त्यांच्या सहकार्यांच्या मते ह्या वर्गात अतिशय टारगट विद्यार्थी होते व कुणीही शिक्षक त्यावर्गावर तास घ्यायला नाखुशीनेच जायचे. सहकार्यांनी अत्र्यांनाही तशी कल्पना दिली होती. त्यामुळे वर्गावर जाण्याआधी अत्रे गंभीर होते व ते वर्गात शिरताच सहकार्यांना सांगितल्याप्रमाणे मुलांनी टारगटपणा दाखवायला सुरवात केली. मागच्या बेंचवरच्या काही टग्यांनी खाली वाकुन सिंहाचा आवाज काढायला सुरवात केली. अत्रे शांतपणे पाहत राहिले व गोंधळाचा भर ओसरल्यावर पूर्ण वर्गाला उद्देशुन अत्रे खड्या आवाजात म्हणाले "अ व्हेरी बिग हेल्लो टू द लायन्स ऑफ धिस क्लास". हे वाक्य उच्चारले आणि आतापर्यंत गोंधळ करणार्या विद्यार्थ्यांनी टाळ्या वाजवुन मनसोक्त दाद दिली. अत्रे आपल्या आत्मचरित्रात पुढे लिहितात पुन्हा पुढे कधी त्यांना ह्या वर्गावर शिकवताना काही त्रास झाला नाही. इथे अत्रे गंभीरपणेच शिकवत राहिले असते तर टारगटपणाची ही शृंखला कधीही न तुटती व विद्यार्थी त्यांना कधीही न स्वीकरते.
अशीच घटना माझ्याबाबतीत ही घडली. आमच्या टीमने द्यावयाच्या एका प्रेझेंटेशनच्या वेळेला मला ऐनवेळी काही कारणाने हजर असणे शक्य नव्हते. प्रेझेंटेशनला आमच्या श्रेणीमधले वरिष्ठ अधिकारीही असणार होते. मॅनेजरने तसे सांगितले. व प्रेझेंटेशन चालु केले. एका ब्रेकमध्ये माझे इतर काम संपल्याने मी प्रेझेंटेशनकरता हजर झालो. मी येणार नव्हतो पण आता आलो हे पाहुन प्रेझेंटेशनला मी सुरवात करण्याआधी सर्व स्थानापन्न झाल्यावर एक वरिष्ठ मला म्हणाला तू येणार नव्हतास ना?मग कसा काय आला. त्यावर मी उत्तरलो "एक बार जो मैने कमिटमेंट कर दी.." तेव्हा नुकताच दबंग रिलिज झाला होता आणि हा डायलॉग लोकप्रिय झाला होता. पुढचे प्रेझेंटेशन अगदी खेळीमेळीच्या वातावरणात पार पडले.
29 Aug 2020 - 3:56 pm | रात्रीचे चांदणे
लेखाच्या आशयाची पूर्णपणे असहमत. आपले म्हणणे पटवून देण्यासाठी लेखकाने काहींच्या काही उदाहरणे दिली आहेत.tiktok आणि विनोदनिर्मिती ह्याचा काय संबंध आहे का? तस पाहिले तर quora वर ती पण जास्त भारतीय आहेत मग भारतीय जास्त विचार करनारे आहेत असा निष्कर्ष काढणार का?
विनोदामुळे वेळेचा अपव्यय होतो.....ज्याला वेळेचा अपव्यय करायचा आहे तो कसाही करतो, उगाच विनोदाला दोष देण्यात काय अर्थ आहे. काही लोक मिसळ पाव वर काहीही धागे काढून वेळेचा अपव्यय करतात.
विनोद न केल्याने आजपर्यंत कोणाला अॉफिसात साहेबांचा अोरडा खावा लागल्याचे उदाहरण नसावे.....मग नेहमी गंभीर राहून कोणाला साहेब प्रसन्न होणार आहेत, एखादा विनोदी कर्मचारी पण आपल्या कामा बाबतीत गंभीर असा कर्मचारी कोणत्या साहेबाला नाही आवडणार.
व्हॉटसअॅपवरसुद्धा नवीन काही उपयुक्त शिकण्यासंबंधी समूह असेल तर तिथे लोकांना वेळ फार कमी असतो...... हा पूर्णपणे गैरसमज आहे असे पुष्कळ whatapp समूह आहेत की जिथे पुष्कळ काही गोष्टी शिकायला मिळतात, कदाचित लेखकाला कोणी अश्या समूहा मध्ये add करत नसेल.
अडर पर्फॉर्मर असेल तर मात्र साहेबांची खप्पामर्जी झाल्याची किंवा नोकरीवरुन काढल्याची उदाहरणे बरीच आहेत........म्हणजे एखादा कर्मचारी गंभीर असेल आणि अंडर परफॉर्मर असेल तर साहेबाची खप्पामर्जी होणार नाही का.
29 Aug 2020 - 7:43 pm | ज्ञानोबाचे पैजार
या टवाळ लोकांनी नुसता उच्छाद मांडला आहे उठ सूट जिथे तिथे दाताड़ काढून बसलेले असतात, असल्या टाईम पाश्या ना भर चौकात फोडून काढले पाहिजे आणि तरी सुधारले नाहीत तर फासावर लटकवले पाहिजे
पैजारबुवा
29 Aug 2020 - 8:44 pm | टवाळ कार्टा
:(
29 Aug 2020 - 7:56 pm | रानरेडा
आपण गंभीर राहून काय प्रगती केली हे सांगा
म्हणजे मी हि परीक्षा क्रॅक केली नतर मला इकडे नोकरी लागली
मग माझ्या गम्भीर स्वभावामुळे झटपट प्रमोशन मिळून आज मी या या कंपनीचा इतक्या वयात सीइओ / एमडी आहे किंवा हा हा मोठा व्यवसाय माझा आहे , त्याची साईझ हि आहे .
माझे गंभीरपणा मुले झटपट लग्न झाले आणि मला गंभीर मुले झाली .
म्हणजे गंभीर राहून तुम्ही काय उखडले हे कळल्यास यावर अधिक विचार करता येईल .
29 Aug 2020 - 8:15 pm | सुखी
गंभीर होऊन 2००७ अन् 2०११ चे world cup जिंकता येत...
जिंकून देऊन नामानिराळे राहावे पण लागते गंभीर पणे
29 Aug 2020 - 8:27 pm | आनन्दा
त्याला गंभीरपणा म्हणत नाहीत.. त्याला बुद्धी आणि थंड डोके असे म्हणतात.
2011 चा विश्वचषक जिंकणारा कधी हसलाच नसेल का हो?
29 Aug 2020 - 9:45 pm | सुखी
Gautam ho...
29 Aug 2020 - 8:38 pm | Rajesh188
गंभीर स्वभावाच्या व्यक्तींना कोणी सहलीला घेवून जात नाही.
गंभीर स्वभावाचा व्यक्ती कोणाच्या लग्नाला,birthday la किंवा कोणत्याही कार्यक्रमात गेला तरी त्याची उपस्थिती दखलपात्र नसते ,कोणाच्या लक्षात च राहत नाही
गंभीर स्वभावाच्या व्यक्तीला मित्र मंडळी कमी असतात.
गंभीर स्वभावाचा व्यक्ती घरात तील वातावरण सुद्धा गंभीर करून ठेवतात.
कधी एकदा हा व्यक्ती बाहेर जातोय असे घरच्यांना पण वाटत.
29 Aug 2020 - 8:51 pm | उपयोजक
मान्य! पण या सगळ्यामुळे त्या गंभीर व्यक्तीला फरक पडला पाहिजे ना? लोक आपल्यापासून लांब राहणे यात जितका तोटा आहे त्यापेक्षा गंभीरपणामुळे होणारा फायदा हा अधिक आहे असे जाणवल्यास सदर गंभीर व्यक्ती लोक आपल्यापासून लांब राहतात,आपल्याशी बोलणे टाळतात याची फिकीरच करणार नाही. त्रास भोवतालच्या लोकांना होईल. गंभीर व्यक्ती आपले काम गंभीरपणे करतच राहील.आपल्या स्वभावातला गंभीरपणा जपेल.
29 Aug 2020 - 9:02 pm | रानरेडा
आपण गंभीर राहून काय उखाडले ते सांगाल का ?
29 Aug 2020 - 9:57 pm | शा वि कु
विनोद किंवा इतर मनोरंजन यामध्ये फरक तो का करावा ? तुमचे एकूण मनोरंजसोबतच वावगे आहे का विनोदासोबत ? कारण, एका प्रकारे राजकारणाची चर्चा सुद्धा मनोरंजनच. मोदींचा विरोध/समर्थन मनोरंजनच. व्यक्ती आणि वल्ली वाचणे, फ्रेंड्स बघणे आणि गंभीर मदर इंडिया किंवा श्यामची आई बघणे पण मनोरंजनच.
त्यामुळे गंभीर म्हणजे नक्की काय ?
बाकी सर्व आयुष्य स्वतःचे मनोरंजन जास्तीत जास्त करण्यासाठी आहे असे माझे व्यक्तिगत मत आहे.
तुमचे मत वेगळे असू शकते.
29 Aug 2020 - 9:57 pm | शा वि कु
विनोद किंवा इतर मनोरंजन यामध्ये फरक तो का करावा ? तुमचे एकूण मनोरंजसोबतच वावगे आहे का विनोदासोबत ? कारण, एका प्रकारे राजकारणाची चर्चा सुद्धा मनोरंजनच. मोदींचा विरोध/समर्थन मनोरंजनच. व्यक्ती आणि वल्ली वाचणे, फ्रेंड्स बघणे आणि गंभीर मदर इंडिया किंवा श्यामची आई बघणे पण मनोरंजनच.
त्यामुळे गंभीर म्हणजे नक्की काय ?
बाकी सर्व आयुष्य स्वतःचे मनोरंजन जास्तीत जास्त करण्यासाठी आहे असे माझे व्यक्तिगत मत आहे.
तुमचे मत वेगळे असू शकते.
29 Aug 2020 - 10:01 pm | शा वि कु
विनोद किंवा इतर मनोरंजन यामध्ये फरक तो का करावा ? तुमचे एकूण मनोरंजसोबतच वावगे आहे का विनोदासोबत ? कारण, एका प्रकारे राजकारणाची चर्चा सुद्धा मनोरंजनच. मोदींचा विरोध/समर्थन मनोरंजनच. व्यक्ती आणि वल्ली वाचणे, फ्रेंड्स बघणे आणि गंभीर मदर इंडिया किंवा श्यामची आई बघणे पण मनोरंजनच.
त्यामुळे गंभीर म्हणजे नक्की काय ?
बाकी सर्व आयुष्य स्वतःचे मनोरंजन जास्तीत जास्त करण्यासाठी आहे असे माझे व्यक्तिगत मत आहे.
तुमचे मत वेगळे असू शकते.
29 Aug 2020 - 11:22 pm | रानरेडा
काही गामबीर लोकांची प्रत्येक गोष्टी मध्ये उदासीनता असल्याने लग्ने होत नाहीत ? उगाच बसून ते दुसऱ्यांना उपदेश करतात .
धागा काढणाऱ्या कहा अनुभव काय आहे ? उदास थोबाड असेल तर मुली पसंद करीत नाही हे खरे आहे का ? ;))
29 Aug 2020 - 11:34 pm | सुबोध खरे
जगायचं कसं
कण्हत कण्हत
की
गाणं म्हणत?
30 Aug 2020 - 12:19 am | आनन्दा
एखाद्याला कण्हत कण्हत सुख मिळत असेल तर?
30 Aug 2020 - 12:33 pm | धर्मराजमुटके
असेल बुवा, काहीजण सुख मिळाल्यावर कण्हतात.
30 Aug 2020 - 12:28 am | अर्धवटराव
जीवनातल्या कुरुपता आणि विसंगतींकडे जो दयाबुद्धीने बघतो तो विनोदी...
इती आचार्य अत्रे
31 Aug 2020 - 11:56 am | चिगो
तुमच्या विनोदबुद्धीला मानलं हं, उपयोजक साहेब.. 'रिव्हर्स सायकॉलॉजी' प्रमाणेच 'रिव्हर्स ह्युमर' वापरण्याची हातोटी गंभीर्पणे वाखावण्यासारखी आहे.
हहपुवा.. असेच आणखी विनोदी धागे काढत रहा पुढेपण.
1 Sep 2020 - 9:34 am | उपयोजक
इथे काहीजणांचा गैरसमज झालेला दिसतो आहे.तस्मात खुलासा
धाग्याचा विषय विनोद या प्रकाराची आयुष्यातून हकालपट्टी करावी असा नाहीये.धाग्याच्या निवेदनातच नमुद केले आहे की क्वचित येणारा विनोद चांगला पण सतत त्याच ट्रान्समधे राहिल्याने फायदा काहीही होत नाही.आपण पाठवलेल्या विनोदावर लोक बर्यापैकी हसतात हे लक्षात आले की स्फुरण चढते आणि आपण त्यात अधिकाधिक अडकत जातो.नकळतपणे काही वेळा मुख्य काम बाजूला ठेवून विनोद शेअर करण्यात वेळ दवडला जातो.आयटीतले मिपाकर बरेचदा कंपनीत वरीष्ठांचा किंवा चुगलीखोर कलिग्जचा डोळा चुकवून अॉफिसातून मिपा वापरत नसतील का? असाच प्रकार विनोदाबाबत होतो. सतत विनोदाची किक मिळावीशी वाटू लागते. विनोदांचा अतिरेक होऊ नये, चेकाळून विनोदांची सरबत्ती करण्याला मर्यादा हव्यात इतकेच सांगायचे आहे.
1 Sep 2020 - 10:13 am | मराठी_माणूस
काही बाबतीत हे खरे आहे.
एक उदाहरण. सध्या एक संगीताचा कार्यक्रम (मराठी) टीव्ही वर दाखवला जातो. त्यात जजेस गाण्या नंतर त्यांची मते सांगतात. त्यात ते जजेस आपल्या बोलण्यातुन विनोद निर्मीती कशी होइल हेच बघत असतात. गाण्याचे खर्या अर्थाने सांगीतीक विश्लेषण होतच नाही. एकंदरीत कार्यक्रमाचा दर्जा सुमार होतो.