शब्दक्रीडा
एवढं करंच...
अविचार करण्याआधी
एक काम कर
कृत्रिम जगाच्या चौकटीतून
एकदातरी बाहेर पड
दऱ्याखोऱ्या कडेकपारीतून
पाखरासारखं उडून बघ
खळाळणाऱ्या नदीमध्ये
मासोळीसारखं पोहून बघ
फेसाळ धबधब्याखाली
निमुट उभा रहा
पावलं थकेपर्यंत
बेलगाम धावून पहा
रस्ता हरवलेल्या पावलांना
खोलवर जंगलात ने
गळा फाटेपर्यंत ओरड
आसवं संपेपर्यंत रडून घे
संध्याकाळ झाली की
डोंगरमाथ्यावर जा
सावल्या लांबताना अन
सुर्य हरवतांना पहा
प्रेम
प्रेम म्हणजे साला ,
अंधार झालाय अंधार .
अब्रू वेशींवर टांगलेली नि,
भावनांचा चाललेला व्यापार .
नजर वखवखणारी असूनही येथे,
कोवळ्या कळ्यांना धुमारे फुटू लागतात.
अन प्रेमाचा पाऊस पडला तरी कुजण्याइतकी,
नात्यांची बीजे भिकार असतात.
१०० नंबरी प्रेम
---------------------------------------------
बायकांच्या बडबडीने जेव्हा
इच अँड एव्हरीजण कंटाळला
'रोज शंभरच शब्द बोलायचे'
सरकारने नियम काढला
मला फारसा त्रास नव्हता
नेहमीच मी कमी बोलायचो
गप्पा,भांडण,उपदेश
मोजक्या शब्दांत मांडायचो
नियम लागू व्हायच्या थोडं आधी
मला भलताच नाद लागला
एका गोग्गोड बडबड्या पोरीवर
नकळंत जीव जडला
व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी तिला
प्रपोज करायचं ठरवलं
शंभर शब्द काय बोलायचे
गणित मांडायला घेतलं
तुझ्या अंतरीची (चारोळी)
तुझ्या अंतरीची, मला जाण आहे;
जरी गीत माझे, तुला ताण आहे.
जरी ना निथळली, कधी कांत माझी;
तुझे पावसाळे, मला रोष आहे.
..............................................मुकुंद
रंगपंचमी
रंग मनाचा,रंग क्षणाचा,
क्षणाक्षणाला विरघळणारा.
क्षणात हसरा,क्षणात हळवा,
डाव्या गाली ओघळणारा.
पुसता अश्रू आवेगाने,
रंग काजळी विस्कटणारा.
अंमळ उसासे स्फुंदत असता,
रंग बोचरा गहिवरणारा.
मित्रांची ती चौकट जमता,
रंग खुशीचा खळखळणारा.
कातरवेळी काहुरणारा,
पिंग गुलाबी रंग बावरा.
म्हणून हा पाऊस मला आवडत नाही.....
अजून एक काव्यकथा घेऊन आलोय,
अजून एक हृदयव्यथा घेऊन आलोय.
वेदना जुनीच...,
पावसामुळे पुन्हा फुललेली,
कॉफीच्या वादळासह,
पुन्हा मनात सललेली.
अंगणभर पसरलेला पाऊस, कुंपणाशी गुंतलेला गारवा,
उंच भिंतीच्या आडोशाला, गारठलेला पारवा |
गारठलेला मी, अन् थिजलेल्या स्मृती,
जुन्या जखमा पालवण्याच्या, पावसाच्या या जुन्याच रिती ||
म्हणून हा पाऊस मला आवडत नाही.....
शतजन्म शोधिताना.....
ठरवून मुलुख सारा,भिजवून परतलो मी
कळ आतल्या जीवाची,चेतवून परतलो मी |
अतृप्त आर्त वारा,त्रासून प्राशिला मी
मर्जी नसे मनाची,भिजवून चाललो मी ||
बेरंग या जगाला, रंगून टाकताना
रुधीरार्त आर्त माझे हलकेच सांडताना |
तुज रंग रंजीताचा,रक्तरंज हा दिसेना
मनी माझिया सखी हे,काहूर हासवेना ||
न्हावून घे बरे तू ,आसुसल्या सुखाने
दुखवू कसा पुन्हा मी बोलू कुण्या मुखाने?
कोंडून दुःख सारे,विस्फोट आज व्हावे
हे देह संचिताचे,भेदून लखलखावे ||
{मोस्ट एलिजिबल संपादक...२०१७ }
पेर्णा
"याड लागलं, याड लागलं" अशा फॉरिन ऑर्केस्ट्रासहीत मोबाइलची रिंग वाजली.
नंबर कोणाचा असावा असा विचार करीत असतानाच लक्षात आलं, सुरवातीला‘०७१५२’ आणि शेवटी डबल झीरो… अरे हा तर वर्ध्यावरुन आलेला, म्हणजे विदर्भातील दिसतोय. सोन्याबापू तर आला नाही ना सुट्टीवर? का कुणा विदर्भवासीवर अन्याव झाला आता?
‘हॅलो…’
आता कुणा टिपिकल वर्हाडी हेल कानावर पडणार म्हणून आनंद झाला.
मंगळ आणि शनी
५ मिनिट गटार गंगेजवळ उभे राहिले कि डोक्यावर डास वारली नृत्य करू लागतात तद्वतच माणूस जन्माला आला कि नवग्रह त्याच्या डोक्यावर फेर धरून नाचू लागतात . डोक्यावरचे डास दोन चार टाळया वाजवून पळवता येतात पण हे नव ग्रह एकदा का मानगुटीवर बसले कि मरेपर्यंत काही पिच्छा सोडावयाचे नाहीत .