जीवनसंगीत
देवा तुझ्या नामानं, मीपण गळलं
बासुरीगत झाले मनं, रितं न् पोकळं
तुझ्या फुंकरेने केले, स्वर हे मधाळं
संगीतमय झाले सारे, जीवन सकळं
देवा तुझ्या नामानं, मीपण गळलं
बासुरीगत झाले मनं, रितं न् पोकळं
तुझ्या फुंकरेने केले, स्वर हे मधाळं
संगीतमय झाले सारे, जीवन सकळं
स्फुर्तीदाते: मितभाषी आणि त्यांचे लाघवी मूल.
प्रश्न पहिला माझा,
रे गड्या मितभाष्या,
काय पिवुनि तुवा
वाजवला हा ढोल-ताश्या!
मूळ बघता सर्व वादांचे
असे बस फक्त पिण्याचे
अध्यात्म नाहीरे षंढाचे
हे तुज नाही कळायाचे.
भेद भावा तु बघ जरा
अज्ञानास फाडती टरा टरा
डोळे फिरवती गरा गरा
दंभ नाहीच इथे खरा
तुम्हा नसे त्याची प्रचिती
म्हणुनि त्या खोटा म्हणती
मनापासुनि ते ओरडती
अंधारासी मी एकच पणती.
बायको गेली माहेरी,आलो मी मिपावरी
परी कर्तव्याची दोरी, आता गळ्यात आहे.
कळले आहे तिला, नवरा मिपा खुळा
मारून एक खिळा, ती गेली आहे
दिसाल जर ऑन-ला-ईनं, लगेच फोन-मारीनं! (दुत्त दुत्त! )
आणि करिन तुमच्याशी, व्हॉट्स अप बोल-बंदी.
दिवसातून काही काळ,थोडी सकाळ/संध्याकाळ
एव्हढाच ऑथोराईज वेळ, तिकडून मिळाला आहे
प्रेरना माननीय प्रेषक, कंजूस, यांची नैसर्गीकपणे मोकळी-चाकळी माफी मागून :) मिपाकरांच्या सेवेत सादर ...
क्रिंग क्रिंग क्रिंग क्रिंग
क्रिंग क्रिंग क्रिंग क्रिंग
स्वप्नात झाले होते
पटाईत आमचे (पटाईतांची पटाईतपणे माफी मागून!)
पंतप्रधान मोदींचे सचीव !! :)
क्रिंग क्रिंग क्रिंग क्रिंग
क्रिंग क्रिंग क्रिंग क्रिंग
त्यांनी विचारले गेले
वर्ष भर काय केले ?
ओबामां फोनु आला
डू यु नो अँड व्हॉट दे सेड ?
हॅप्पी न्यू यीअर !!
ओह मिपाकरांना आमचा
निरोप द्या
ओह मिपाकर
हॅप्पी न्यू यीअर !! बरं का !
हॅप्पी न्यू यीअर !!
आयटीची गोष्ट I ऐका मायबाप II
पुण्ण्याची गणना III येथे नाही IIII
पैश्यांचे डोंगर I सोनियाच्या राशी II
वाढता डॉलर III दिसो लागे IIII
गळ्यामध्ये कार्ड I बडविती बोर्ड II
जीवनाची आस III विझवुनी IIII
मेल देती घेती I रिलीज भोवती II
सुष्ट आणि दुष्ट III एक झाले IIII
नाही जात पात I सगळेच एक II
ढाळती पदर III युरो साठी IIII
लाल लाल ओठ I रंगविती सर्व II
गोऱ्या साहेबाचे III चाटू पाय IIII
मिळूनिया सर्व I सोडुनिया सत्व II
चराचर जणू III रांड वाडा IIII
स्कार्फ आडून चमकती डोळे
खुणवून काही बोलताती
मनी आमुच्या काही पक्षी
हलकेच हळूच उडताती
तरंग येतात मनी मग
जोवर ती असते पुढे
स्वप्न-रंजनाचा पारवा
ऊंsssच आकाशी उडे
ओढणि ती सँक ती ही
डोकावे वॉटर बॉटली
सुंदर किती रूप हे
भावना मनात साठली
हॉर्न मागून वाजताही
किल killले तो आरसा
निबरल्या आमुच्या मनी
फरक न पडे फारसा! ;-)
सिग्नलाला थांबताहि
खेळ तोची राहे सुरु
सुटता सिग्नल मागूनी
ओ रडती, "अरे नको मरू!!!" :-\
किती हा काहूर, ऐकावा आक्रोश, मनाचीच खंत मनापाशी !
आपुल्या विचारे झाकुया बिचारे पिसाट ढेकूण मनामधे ||
भकास भयाण एकान्त भीषण उंबरात विश्व शोधितो का ?
धावे रे कोण्या गर्दीत घामट, आनंदे हुंगतो उंबरेचि ||
जपून चालती सावध बहीरे जडशीळ ओझे हुंकाराचे |
पाहून आधार, अंधार, आडोसा, लागतो कानोसा, मागमूस ?
मनात ढेकूण ठेवा लपवून घट्टच ढाकण दाबुनिया |
ऐकुया संगीत राहुया धुंदीत जीवन रंगीत पेल्यासम ||
फेका ती खड्ड्यात गंजली हत्यारं रंगवुनि मृत वाघनखं |
जळो इतिहास होऊदेत र्हास कुणास पत्रास समष्टीची ||
पायाखालची वीट दे....!
पंढ़रीच्या पांडुरंगा
तुझ्या चरणी ठाव दे
तीर्थप्रसाद काही नको
शेतमालास भाव दे
दुर्दशेने फस्त केल्या
रानाकडे ध्यान दे
शहरावाणी खेडे होईल
असे थोडे ज्ञान दे
हृदयामध्ये राम आणि
मुखामध्ये नाम दे
सूट-माफी-सवलत नको
घामासाठी दाम दे
पाऊस पाणी येऊ दे
शेत माझे न्हाऊ दे
चोच फुटल्या अंकुरांना
दोन घास खाऊ दे
संपत्तीच्या वृद्धीसाठी
लालसेचा रोग दे
शेतीमधल्या कष्टालाही
वेतनवाला आयोग दे