अभंग

भंगलेले अभंग शशिचे

शशांक कोणो's picture
शशांक कोणो in जे न देखे रवी...
9 Jul 2015 - 9:25 am

फेसबुकी रंगे
पोस्टच्या संगे
लाईक कमेंट
रेलचेल !!

फोटोंच्या डोळा
लोक होती गोळा
अन मुक्ताफळा
उधळती !!

एकटेच यावे
गुज पोस्टावे
लाईक ठोकावे
इतरांना !!

परी काय सांगू
नशीब हे पंगू
कोणी भिंतीवर
फिरकेना !!

पाहुनीया वाट
लागलीय वाट
अधिक काहीही
बोलवेना !!

शशि म्हणे देवा
ऐसा मित्र ठेवा
आम्हांला सदा
अप्राप्य

- जय जय फेसबुक समर्थ

अनर्थशास्त्रअभंगमांडणीकलाकवितामुक्तकविडंबनभाषाविनोदसमाज

(नवमि)पाखरास...अर्थात दमामि म्हणे !

दमामि's picture
दमामि in जे न देखे रवी...
5 Jun 2015 - 2:50 pm

आम्हाला हेवनवासी होण्याचे डोहाळे लागले आहेत . त्याआधी लिहिलेली कविता/ उपदेश / म्रुत्युपत्र . काहिही समजा !

अभंगधोरण

मॉडर्न अभंगवाणी

विनीत संखे's picture
विनीत संखे in जे न देखे रवी...
27 May 2015 - 5:50 pm

असावा शेजा-याचा आंग्ल पेपर । वाचावा तोचि न खर्चिता स्वधन ॥
पेपरसंगे ग्राह्य दूध वाटि एक । साखरेजोडि तेहि मागावे ॥

संगणक अभियंता होशिल तू । विठुमाझा करिल चमत्कार ॥
फक्त परीक्षेअंती निकाल । केटि न लागु द्यावी ॥

महाविद्यालये टि-शर्ट आणि जीन्स । जेतुके फाटके तेतुके स्टायलिश ॥
ओळखावे कन्यकांचे जमाव । पाहावे प्रत्येकीस सांगोपांग ॥

किकेटी असावी भल्यांची भरती । करावे कसे बुकी-फिक्सिंगचे उच्चाटन? ॥
किंतु तयांच्याच चरणी मिळे धन । ऑस्ट्रेलिया मागे मीही लावतो ॥

अभंगविडंबनविनोदमौजमजा

झिंग बोचर्‍या अहंपणाचे चगिन्यांचेदा चकानदु

सूड's picture
सूड in जे न देखे रवी...
22 May 2015 - 3:35 pm

दागिन्यांचे वळण नशिले, प्रतिसादातून उरात घुसले
उद्धट ललना उर्मट बोले, टेम्पोमाजी जरा बसविले
वृंदगान : दु दु दु दु

काय तरी हे लक्षण मेले,विडंबुनिया मिपा हलविले
खरपूस तळल्या जिल्ब्यांसंगे, कहासुनीचे तुमन्त छोले
वृंदगान : ऑ अच्च जालं तल

नटवे थटवे जमवी ठिक्कर, तार गुंफिली नक्षी त्यावर
कंपू देई थाप डफावर, कुत्सित ललना राग शिरावर
वृंदगान : नाच गं घुमा

तोडूनि तारे काथ्या कुट्टी, उठता कट्टी बसता बट्टी
गडबडगुंडा वरची पट्टी, दागिन्यांची मधली सुट्टी
वृंदगान : ड्रीमम वेक्कपम क्रिटीकल कंडिशनम्

अभंगबालसाहित्यभूछत्रीसांत्वनाइतिहासवाङ्मयबालकथा

विश्वास वासावरचा

ज्ञानोबाचे पैजार's picture
ज्ञानोबाचे पैजार in जे न देखे रवी...
6 May 2015 - 10:09 am

आमची पेरणा
अर्थात शब्दानुज यांची क्षमा मागुन....

रोज पुन्हापुन्हा तो ढुसक्या सोडतो
समोरचा नाईलाजाने नाकावर हात दाबतो

हजारो वर्षांपासुन तो त्या सोडतो
आणि दिवसभर पोट दाबून कळा सोसतो

खरेतर प्रत्येकाच्या शरीरातून ती बाहेर पडत असते
पण काहिंचे अस्तित्व नुसत्या वासावरुन ओळखता येते

पवनाच्या रुपातुन तो बाहेर पडतो
पोटाबरचे प्रेशर थोडेसे हलके करुन जातो

प्रत्येक श्वासातुन तो नाकात घुसू पहातो
श्वासाशिवाय थोड्या वेळानंतर जीव घुसमटतो

अभंगआरोग्यदायी पाककृतीकॉकटेल रेसिपीकोडाईकनालगरम पाण्याचे कुंडभूछत्रीमार्गदर्शनवाङ्मयशेतीविराणीशृंगारकरुणवीररसरौद्ररसधर्मपाकक्रियाकथाप्रेमकाव्यविडंबनप्रतिशब्दशब्दार्थशुद्धलेखनभूगोलगुंतवणूककृष्णमुर्तीशिक्षण

भाव तिथे देव

निनाद जोशी's picture
निनाद जोशी in जे न देखे रवी...
19 Mar 2015 - 11:19 am

काय हो वर्णावा
त्या नराचा स्वभाव
घेतला ज्याने देव
विकत बाजारी

चार मोजले रोकडे
अन म्हणे आता धाव
तुच मला वाचव
संकटा पासून

तुला मी रे दिले
माझ्याकडले हे धन
आता सोडव ह्यातुन
मजला देवा

अरे वेड्या त्याच्या लेखी
तू आहेस कंगाल
त्याला पाहिजे जो माल
तुझ्याकडे नाही

संत सांगती सज्जना
मनी असुदेत भाव
तोच करेल बचाव
स्वता: हून

अभंगसमाज

"खरे सत्य बोला/ जपून जपून"

पदकि's picture
पदकि in जे न देखे रवी...
19 Feb 2015 - 4:40 am

खरे सत्य बोला/ जपून जपून
तेज लपवून / ठेवा थोडे
अर्धोक्तीने करा / सत्य - सुरुवात
जनां भयभीत / करू नका
अंधाऱ्या अंबरी / विजेची उपज
बालकां समज/ नाही तिची
महा त्या तेजाने / अंधत्व नेत्रांना
साध्या माणसांना / कशासाठी?
क्षीण मानवाची/ क्षीण असे दृष्टी
प्रकाशाची सृष्टी / सोपी नसे
---

अभंगकविता

(प्लास्टर ऑफ) पॅरीसचा वि-चित्रकार

माहितगार's picture
माहितगार in जे न देखे रवी...
8 Jan 2015 - 9:34 am

कै. भाऊसाहेब पाटणकर यांची माफी मागून हि वि-चित्र कविता प्लास्टर ऑफ पॅरीसच्या हुतात्म्यांना

सांगेल काही भव्य ऐसा वि-चित्रकार मी नव्हे
तो निराकाराचा मान, इतुकी पायरी मम साकाराची नव्हे

आम्ही अरे साध्याच आपुल्या वि-चित्र जीवना संमानितो
संमानितो वि-चित्र, तसे या निराकाराने काढलेल्या साकारांनाही संमानितो

जाणतो अमूर्ता की, आम्हाला क्षणभरी अमूर्तच आहे व्हायचे
नाही तरी, नरकातील शिक्षा घेण्या मूर्त पुन्हा असते व्हायचे

मानतो देवासही ना मानतो ऐसे नव्हे,
मानतो इतुकेच कि, तो वि-चित्रकार आमुचा कोणी नव्हे

अभंगसांत्वनाकविताप्रेमकाव्य

जमला मेळा संतसज्जनांचा

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जे न देखे रवी...
30 Nov 2014 - 9:47 am

जमला मेळा संतसज्जनांचा

जमला मेळा संतसज्जनांचा
पांडुरंगाच्या भक्तांचा ||ध्रू||

हाती घेवूनीया विणा आणि टाळ
भजनात विसरती काळवेळ
हरपली तहानभुक हरपले देहभान
जमला मेळा...||1||

नको भेटी आणिक तिर्थक्षेत्री
आम्हा वैष्णवांची पंढरीच काशी
माऊलीच्या घरी आलो माहेराला
जमला मेळा... ||2||

विठूरायाचे सावळे मुख
पाहूनिया झाले सर्वसुख
ओलांडला पर्वत यातनांचा
जमला मेळा...||3||

- पाषाणभेद

अभंगविठोबाविठ्ठलसंस्कृती