अभंग

विठूबंदी

बाजीगर's picture
बाजीगर in जे न देखे रवी...
22 Jul 2018 - 10:24 pm

( News:10 लाख वारकऱ्यांच्या सुरेक्षेला प्राधान्य, मी विठ्ठल पूजेसाठी पंढरपूरात जाणार नाही'--मुख्यमंत्री)

विठूबंदी

धाडा रे कुणीतरी,
विठूला सांगावा,
आरक्षणाचा कांगावा,
फार झाला।

मागे होते एकदा
मराठा मंत्री सोळा,
आरक्षणाचा गोळा,
तेव्हाका नाही।

मुख्यमंत्र्यांना यंदा,
नाही महापूजा,
कारण बलभूजा,
जातीभेद।

संत सांगो गेले,
वारकरी एकता धर्म
भेदाभेद अमंगळ जर्म
जळो जळो।

नावडतीचे तुम्हा,
जरी अळणी मीठ,
निषेधाचे व्यासपीठ,
इथे नव्हे।

अभंगकविता

कितीसा पुरोगामी आहेस ?

माहितगार's picture
माहितगार in जे न देखे रवी...
19 Jun 2018 - 9:58 am

(* कविता जेंडर न्यूट्रल वाचावी)

कमिटेड टू हूम
कमिटेड टू व्हॉट

पुरोगामी पुरोगामी
कितीसा पुरोगामी आहेस ?

तुझ्यासाठी
आपले कुणीच नाही

तूला तू त्यांचा आहेस असे वाटते
तेही फसवे नसते का ?

आपल्यातल्या आपल्यांचा
होऊ शकला नाहीस

त्यांचाही होऊन रहाणे
खरेच जमेल का तूला ?

आणि तूही कुणाचाच नाहीस
हेच खरे नसते का ?

त्यागी आहेस
हे बरे आहे एका अर्थाने

आपल्या अंगच्या वस्त्रांचाही
त्यागकरुन त्या तपस्वी मुनींप्रमाणे
जंगलात जाऊन कायमचा
एकांतवास अनुभवून पहाशील का ?

dive aagareggsgholmiss you!अनर्थशास्त्रअभंगअविश्वसनीयआता मला वाटते भितीकखगकविता माझीकालगंगाकाहीच्या काही कविताजिलबीफ्री स्टाइलभावकविताभूछत्रीमार्गदर्शनमुक्त कवितारतीबाच्या कवितारोमांचकारी.वाङ्मयशेतीविठ्ठलमुक्तकमराठी पाककृतीव्यक्तिचित्रणगुंतवणूकचित्रपटस्थिरचित्र

खरं खरं सांगा

चुकलामाकला's picture
चुकलामाकला in जे न देखे रवी...
11 Oct 2017 - 7:38 pm

तुमच्यासुद्धा मनामध्ये एक रेखा असते ना?
उच्चार नसाल करत भले, पण एक रेखा असते ना?

भले तुमची बायको सुशील सुंदर सुगरण,
द्रुष्ट लागावी असं सुखी संसारीक जीवन.
पण कधीतरी कुठ्ठतरी आठवण ही येतेच ना?
सिलसिला बघताना मन गिरकी घेतेच ना?
तुमच्यासुद्धा मनामध्ये एक रेखा असते ना?

नसाल तुम्ही अमिताभ पण म्हणून काय झालं?
साले उप्परवालेने भी असलं हार्ट दिलं.
संस्कार बिस्कार,पाप-पुण्य,समाज काय म्हणेल?
इमोशनल लोच्यामध्ये भिजत घोंगडे पडते ना?
तुमच्यासुद्धा मनामध्ये एक रेखा असते ना?

अभंगकविता

वदनि पेग घेता ....

चामुंडराय's picture
चामुंडराय in जे न देखे रवी...
20 Aug 2017 - 3:52 am

सध्याच्या नवप्रथे प्रमाणे .....
© चामुंडराय, मिसळपाव.
(कृपया नशापाणी न करता, वारुणीला साथीला न घेता हे काव्य वाचू नये.
अतिबाल्य आणि अतिसंवेदनशील तसेच हे कंबख्त मैं पीता नही अश्या व्यक्तींनी हे काव्य वाचू नये.
विसू: Drink responsibly, Drive sober)
.
.

वदनि पेग घेता
चव घ्या चखण्याची ।

सहज किक बसते
मिळता पिण्या फुकाची ।

सातत्ये करि मैफिल
दारू हि झिंगब्रह्म ।

सुरापान नोहे
जाणिजे नशाकर्म ॥१॥

पेगवर पेग घेता
नाम घ्या साकियाचे |

पिताना स्मरण ठेवा
आम्हा बांधवांचे |

अभंगविडंबन

नवकवीस्तोत्र

माम्लेदारचा पन्खा's picture
माम्लेदारचा पन्खा in जे न देखे रवी...
26 Jul 2017 - 10:10 pm

काही करण्या उरले नसता । आपली पाटी कोरी असता ।
काही बकांची ध्यानस्थ स्तब्धता । मत्स्यमारीकारणे ।।

दिसता कोणीही नवखा । लबाड साधिती मोका ।
त्याची बुडवती नौका । लागलीच ।।

पाडावी भोके यथेच्छ । भाषा तरी वापरावी स्वच्छ ।
भासवावे तयाते तुच्छ । आत्मक्लेशे ।।

कवीचे उडवावे शिरस्त्राण । मागाहुनि करावे शिरकाण ।
मनसोक्त मारावे पादत्राण । कवितेवरी ।।

आपण गाडिले कुठे झेंडे । आपल्या कापसा किती बोंडे ।
सगळे विसरून फेकती अंडे । अशावेळी ।।

अशाने होते तरी काय । कवी हतोत्साही होऊन जाय ।
परि अंतरी लागते हाय । कायमची ।।

अदभूतअभंगअविश्वसनीयफ्री स्टाइलमार्गदर्शनहास्यअद्भुतरसवावरकवितामुक्तकमौजमजा

वारी हो वारी

माम्लेदारचा पन्खा's picture
माम्लेदारचा पन्खा in जे न देखे रवी...
23 Jun 2017 - 10:45 am

होता आषाढी कृष्णमेघांची दाटी
मन केवळ विठूसाठी आक्रंदे ।

चालती पाऊले दिशा पंढरीची
वारकरी आम्ही नाहू आनंदे ।

घोष एक गजर एक एक नाम
जीव पिसावला या मधुर नादे ।

ना जुमानू आता ऊन पावसासी
मार्ग क्रमु पांडुरंगाच्या आशिर्वादे ।

पडता दिठीस चरण ते सावळे
जैसे भ्रमर प्राशी तो मकरंदे ।

वारीस न जाताही मनाने वारीमय
हळवा अवघा महाराष्ट्र विठ्ठल छंदे ।

अभंगकविता माझीविठोबाविठ्ठलसंस्कृतीधर्म

"पॅलेस ऑन व्हील्स "

पदकि's picture
पदकि in जे न देखे रवी...
2 Feb 2017 - 4:57 am

तीन कोटी टिऱ्या* / आभाळ देखती
नाके ती टेकती/ धरतीला
फाटलेली चड्डी/ शर्ट असे, नसे
लढावे ते कसे/ हिवाळ्याशी
हातातले त्यांच्या / गंजके खुरपे
झपाझप कापे/ गवताला
डोक्यावर त्यांच्या /नसे ते छप्पर
फुटके खप्पर / आईबाप
शाळेमाजी त्यांना/ नसे ते शिक्षण
"रात्रीला भक्षण / काय करू?"
वाढदिवसाचे / फुगलेले फुगे
रंगीत नी झगे / कोठून ते
तीन कोटी पोरे/शेतांत राबती
भयाण सोबती/ दारिद्र्य ते
दुख्खाचीच कढी /दुख्खाचाचि भात
जेवोनिया तृप्त / कोणी नसे
मधूनच जाई / नवी आगगाडी
शहरची जाडी/ पोरेबाळे

अभंगकविता

(डोलकरांचे मनोगत)

ज्ञानोबाचे पैजार's picture
ज्ञानोबाचे पैजार in जे न देखे रवी...
12 Jan 2017 - 11:42 am

(डोलकरांचे मनोगत)

पेरणा अर्थातच

शतदा भरला एक प्याला शेवटचा
मी तृप्त पाहुनी खंबा हा टिचर्सचा
रिचवले हजारो पेग मी उदरात
सदैव राहो, दरवळ हा गोल्ड फ्लेकचा

चखण्याची देउन आहुती पोटाला
मी किंचित पिळले अलगद त्या लिंबाला
नसता जेवण व्यर्थ मानले असते
मज आहे कारण आज घरी जाण्याला

धडपडत लटपटत रिक्षात पाय ठेवियले
कुठे जायचे ते अडखळत सांगितले
जरी घरी आल्यावर पडली उपेक्षा पदरी
निळकंठा सम ते अमृत मानूनी प्राशीयले !!

अभंगकाणकोणकोडाईकनालगरम पाण्याचे कुंडजिलबीरोमांचकारी.वीररसबालकथाऔषधोपचारकृष्णमुर्ती

(आम्हां न कळे नज़्म)

स्वामी संकेतानंद's picture
स्वामी संकेतानंद in जे न देखे रवी...
13 Dec 2016 - 10:15 am

आम्हां नकळे नज़्म, नकळेच शेर।
गझली बहर, नकळे आम्हां।।

काफिया की आधी, रदिफ म्हणावा।
मतला जुळावा नकळे आम्हां।।

कधी म्हणे सूट, कधी अपवाद।
शायरांचे वाद नकळे आम्हां।।

वज्न,रुक्न, जुज; लाम, गाफ आणि।
नकळेची वाणी गझलेची।।

स्वाम्या म्हणे माज मोकार करावा।
रतीब घालावा गझलांचा।।

- स्वामी संकेतानंद

अभंगविडंबनतंत्र

॥सांगा तुकारामा : अभंग-४॥

गंगाधर मुटे's picture
गंगाधर मुटे in जे न देखे रवी...
18 Jul 2016 - 2:03 pm

॥सांगा तुकारामा : अभंग-४॥

धाडा तुकोराया । विठूला सांगावा ।
मायेचा कांगावा । उतू आला ॥१॥

नासले सकळ । तन मन धन ।
मिथ्या जन गण । वेढीयले ॥२॥

विलासी लोळती । द्रव्याचे सोयरे ।
अनाठायी मरे । कामनिष्ठी ॥३॥

विव्देषाचा डोंब । कैसा परतावा ।
स्नेहाचा ओलावा । क्षीण झाला ॥४॥

वैष्णवाचे चित्त । झुंडीची मुसंडी ।
सावजाला धुंडी । मिथ्यावादी ॥५॥

नाही उपवासी । नाही एकादशी ।
अभय द्वादशी । सोडियेली ॥६॥

                 - गंगाधर मुटे "अभय"
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
१८/०७/२०१६

अभंगअभय-काव्यअभय-लेखनकविता