माझी मॅट्रिक आणि आत्ताच्या एक्झाम्स.
त्या अनादि,अनंत, सर्वसाक्षी जगन्नियंत्याने आपल्या ललाटावर भाग्यरेखा लिहिताना अहर्निश परीक्षा देणंच लिहिलं आहे,असं प्रत्यंतर प्रत्येक जीवात्म्यास हा भवसागर पार करत असताना येत असतं!
त्या अनादि,अनंत, सर्वसाक्षी जगन्नियंत्याने आपल्या ललाटावर भाग्यरेखा लिहिताना अहर्निश परीक्षा देणंच लिहिलं आहे,असं प्रत्यंतर प्रत्येक जीवात्म्यास हा भवसागर पार करत असताना येत असतं!
नोव्हेंबर २०२३ मध्ये माझे बाबा गेले. वय ८२ पूर्ण होते. लौकिकार्थाने त्यांच्या सर्व जबाबदाऱ्या त्यांनी व्यवस्थित पार पाडल्या होत्या. तोपर्यंतचे आयुष्य आनंदाने जगले होते. त्यामुळे फार त्रास न होता ते गेले म्हणजे त्यांचं सोनंच झालं. पण... हा पण खूप मोठा आहे. ते गेल्यावर लक्षात आलं की आपल्या बाबांचे आपल्या आयुष्यात किती महत्त्वाचे स्थान होते. त्यांच्या जाण्याने कधीच भरून न येणारी पोकळी निर्माण झाली आहे.
या देवी सर्वभूतेषु शक्ति रूपेण संस्थिता। नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम:।
शाक्त तीर्थ-क्षेत्र, "शक्तीपीठ"
सक्षम स्त्रियांसाठी आधारप्रणाली - सपोर्ट सिस्टीम
८ मार्चला सारीकडे महिला दिनाचे वातावरण असते.प्रत्येकजण आपापला दृष्टिकोन मांडत ससतो. बहुतेकांचे दृष्टीकोन आपापल्या परीने बरोबर असतातही. या दिनाच्या निमित्ताने मी सहज मागे वळून पाहिले की मी स्वतः प्रागतिक चिचारांचा आहे म्हणून मोठ्या गमजा मारतो पण आपण खरेच कसे काय वागलों? अनेक आठवणी जाग्या केल्या, काही आपोआप जाग्या झाल्या, यात एक सुरेख आठवण आली. अबला नसलेल्या कार्यक्षम महिलांपुढे नोकरी करतांना कशी आव्हाने पेलावी लागतात ते आठवले.
17 फेब्रुवारीला पाकिस्तानातल्या रावळपिंडीचे विभागीय आयुक्त असलेल्या लियाकत अली चट्टा यांनी पाकिस्तानातच नव्हे तर आख्ख्या जगात खळबळ उडवून दिली !!! दहा बारा दिवसापासून पाकिस्तानात व्यवस्थेचा नंगा नाच सुरु आहे. राष्ट्रीय निवडणुका झाल्या, त्याची मत मोजणी सुरु झाल्यावर तिकडे धुमाकुळ सुरु झाला. इम्रानखानला आधीच तुरुंगात ठेवले आहे. त्याचा पक्ष मोडीत काढला. चिन्ह गोठवले. पुन्हा कधी निवडणूक लढण्याचे धाडस केले नाही पाहिजे अशी तजवीज करण्याचा प्रयत्न केला. पण प्रत्यक्षात भलतंच घडलं. आम जनतेने त्यालाच डोक्यावर घेतले. त्याचे उमेदवार अपक्ष लढले. आणि सर्वाधिक संख्येने निवडून देखील आले.

नमस्कार मंडळी. आज मी तुम्हाला. एका पुस्तकाची ओळख करून देणार आहे. त्याचं नाव आहे बाईकवरचे बिऱ्हाड. पुस्तकाचे लेखक अजित हरिसिंघानी हे एक वाचाउपचार तज्ञ आहेत. आणि एन्फिल्ड बाईक चे निस्सिम चाहते किंवा भक्त म्हटलं तरी हरकत नाही. त्यांचे एक पेशंट, जेरेमी डिकोस्टा अर्धांगवायूच्या झटक्याने अर्धी बाजू निकामी झाल्यामुळे त्यांच्याकडे उपचाराला येत असत. जेरेमी एका कंपनीचे सीईओ. परंतु त्यांच्या अशा परिस्थितीमध्ये त्यांना एक साधं वाक्य उच्चारणे किंवा काही अंतर चालणे सुद्धा कठीण झाले आहे. त्यांना दोन मुलगे परंतु दोघेही परदेशात स्थायिक आणि. जेरेमीची सगळी जबाबदारी त्यांच्या ६० वर्षीय पत्नीवर पडली आहे.
आपल्या शालेय जीवनात दहावी हा एक महत्वाचा टप्पा असतो . माझ्याही आयुष्यात दहावी आलीच.पण जरा सुस्तच होती . मी क्लास लावलेला जाधव सरांकड पण अभ्यास मात्र जसा जमेल तसा, काय ताण नाही काही नाही . कोण विचारलं दहावी चा अभ्यास कसा सुरु आहे ? उत्तर ठरलेलं असायचं "एकदम निवांत" मला दहावी नंतर काय करायचं हे माहीत नव्हतं . कोण विचारलं डिग्री कुठली करणार हे माहीत नव्हतं. आमच्या वर्गात मात्र ३-४ पोर होती जी म्हणायची मी कोट्याला जाणार आयआयटी ची तयारी करायला. कोण बोलायचं ब्रेन सर्जन होणार. च्यामायला ऐकून भीती वाटायची ओ. एवढ्या कमी वयात एवढी स्पष्टता... कौतुक वाटायचं त्यांचं.