द लेडी ऑफ शालॉट : (भाग १) चित्र, कविता आणि 'आई'चा मराठी तर्जुमा.

चित्रकारः John William Waterhouse. (1888)
Oil on canvas (72 in × 91 in) Location: Tate Britain, London

चित्रकारः John William Waterhouse. (1888)
Oil on canvas (72 in × 91 in) Location: Tate Britain, London
तो दिवस मला आठवतो.शेतात कामकरणाऱ्या
माझ्या सकट इतर कामगारांना एक दुर्गंध येत होता.शोधता शोधता एका पिंपळाच्या झाडाखाली एका झुडपात दुर्गंध तिव्र झाला.
झुडूप विस्कटून पाहिल्यानंतर एक रान-मांजर
मेलेलं आढळलं.
रात्री घरी गेल्यावरही तो दुर्गंध माझ्या नाकात
“वास” करून राहिला होता.
या लेखाचं शीर्षक "चाय पे चर्चा" असं नाही बरं का. मला चाय पे चर्चा करून माझ्या एरियातल्या कोणत्याही समस्या मांडायच्या नाहीत. किंवा कोणतीही राजकीय चर्चा करायची नाही. मला ॲक्चुअल चहा याच विषयावर लिहायचं आहे.
चहाला चाय म्हणतात. चा म्हणतात. च्या म्हणतात. टी म्हणतात. प्रत्येक भाषेत चहासाठी शब्द आहे. यावरूनच त्याची जागतिक लोकप्रियता दिसून येते.
“आई” म्हणजेच AI म्हणजेच आर्टिफिशियल
इंटिलीजन्स
निळा समुद्र, गरम वाळू, छोटे मासे, खारी हवा, समुद्राची झुळूक आणि तो उबदार सूर्य. ह्या माझ्या लहानपणी उपभोगलेल्या वातावरणाची आठवण येऊन परत ते जीवन जगायला कधीच मिळणार नाही असं मनात येऊन खंत होते.माझा समुद्रकिनाऱ्यावर खूप जीव होता..
मला वाटतं की, समुद्रकिनारा आणि माझे खूप खास आणि अनोखे संबंध होते.
मला असं वाटतं की समुद्रकिनाऱ्याकडे मी
त्यावेळी माझं श्रद्धास्थान समजायचो

दरवर्षी रेल्वे सप्ताहात रेल्वेनं एखादा प्रवास करायचा माझा अनेक वर्षांपासूनचा शिरस्ता. यावेळी जरा वेगळ्या पद्धतीनं प्रवास करायचा ठरवलं. त्यानंतर मी माझ्या भाच्याबरोबर परतीसाठी मिरजेहून 12493 दर्शन एक्सप्रेसची निवड केली आणि आरक्षणही करून टाकलं.
आयुष्य कधी कधी गंमतीदार वळण घेतं. पण ज्यावेळेस अशा घटना घडत असतात त्यावेळेस असं काही वळण येईल, किंवा असं काही घडेल जे कदाचित चांगले असू शकेल असे त्यावेळेस वाटत नसतं. दिवस काढणं तर अवघड असतंच पण रात्र सुद्धा अंगावर येत असते. काय करावे, कसे करावे काही म्हणता काही सुचत नसते. फक्त आपल्याच आयुष्याचा आपण मांडून ठेवलेला तमाशा पहायचा आणि जमेल तितकी पडझड थांबवायचा प्रयत्न करायचा. दोन हात थिटे पडतात. आणि अवशेष दणादण डोक्यावर कोसळत पडतात.
मानस - धुळवड
गेल्या आठवड्यात माझ्या बायकोच्या आजी देवाघरी गेल्या. बातमी कळताच आम्ही सर्व तातडीने पुण्याहून छत्रपती संभाजीनगरला निघालो. गाडीमध्ये मी माझी बायको आणि माझे सासु सासरे होते.
पूर्ण प्रवासात सतत आम्ही संभाजीनगरला आजींच्या राहत्या घरी गोळा झालेल्या नातेवाईकांशी संपर्कात होतो. एरवी पुण्याहून निघालो, नगरला पोहोचलो, नगर क्रॉस झालं, जवळ पोहोचलो एवढे अपडेट पुरेसे असतात. अशा प्रसंगी मात्र कोणालाच स्वस्थ बसवत नसतं, सतत बोलत संपर्कात रहावं वाटतं. जवळची एक व्यक्ती गेलेली असताना इतर जवळच्या व्यक्तींच्या सहवासात रहावं वाटतं.
काल पोराने ऑनलाईन मागवलेला अँपल चा एअरपोड आला. चेक करू म्हटले तर काय तंत्रज्ञान प्रगत झाले आहे याचा प्रत्यय आला. त्यात नॉइज कॅन्सलेशन चा पर्याय होता .आता नॉइज कॅन्सलेशन म्हणजे त्या एअरपोड मध्ये अशी काही रचना असेल कि ते कानात फिट बसतील अन बाहेरचा गोंगाट कमी होईल अशी माझी भाबडी समजूत.पण या एअरपोड ने तीला मूठमाती दिली.कारण कानात बसवल्या बसवल्या जेव्हा नॉइज कॅन्सलेशन चे ऑप्शन निवडले अन एकदम प्रचंड शांतता पसरली. बापरे हे मात्र जबरीच होते अन संगीत हि एकदम शुद्ध स्वरूपात ऐकायला मिळत होते.अर्थातच इंग्लिश गाणी..आजूबाजूला असलेला गोंधळ कणभरही जाणवत नव्हता.मी प्रचंड प्रभावित झालो.